
मुंबई भाजपचे अध्यक्ष असल्याने मंत्री आशिष शेलार यांना ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर बोलावं लागत असेल. मंत्री असलो तरी मी पक्षासाठी भांडतोय, बोलतोय, हे त्यांना पक्षाला दाखवून द्यायचे असेल. कालपर्यंत राज ठाकरेंना भेटून त्यांचा राजकारणात सल्ला घेत होते. आज त्याच राज ठाकरेंवर बोलण्याची वेळ त्यांच्यावर का यावी, यातून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली हे दिसून येते. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे भाजप विद्वान नगरसेवकांच्या मतदारसंघावर होणार हे आशिष शेलार यांना माहिती आहे, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी आशिष शेलार यांना लगावला.
पंचाहतरीची शाल जेव्हा अंगावर पडते, तेव्हा आपले वय झाले आहे, आता थांबावे असा त्याचा अर्थ होता. पंचाहत्तरीनंतर माणसाने बाजूला होऊन इतरांना संधी दिली पाहिजे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी केले आहे. मोरोपंत पिंगळे यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रकाशन समारंभात भागवत यांनी हा सल्ला दिला. पण या सल्लामुळे चर्चेला उधाण आले आहे.
राज्यात आता शेतकऱ्यांसोबत शेतमुजरांनाही विशेष विमा योजना आणण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारने घोषणा केली आहे. 1 कोटी 75 लाख शेतमजुरांना याचा थेट फायदा होणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे मीरा रोडला जाणार आहेत. मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाद आणि तणावानंतर ठाकरे येत्या 18 जुलैला मीरा रोडला जाणार आहेत.
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस आलेली नाही, असे म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी घुमजाव केले आहे. मी नोटीस आली असं म्हंटलेलं नाही, असे शिरसाट म्हणाले.
आयकर विभागाची नोटीस आल्याबाबत शिरसाट म्हणाले होते, आयकर विभाग कुणाचीही चौकशी करू शकतो. मला नोटीस आली आहे, तसेच श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस आलेली आहे. त्या नोटिशीला उत्तर देणे आपले कर्तव्य आहे. 9 जुलै रोजी मला उत्तर देण्यास सांगण्यात आले होते. उत्तर देण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे, असे त्यांनी सांगितले होते.
ठाकरे कुटुंबीय हे महाराष्ट्राच्या बाहेरून आले आहेत. हे त्यांच्या पूर्वंजांनी लिहून ठेवलेले आहे. ते मगध प्रांतातून आले आहेत, त्यांना त्यावेळी मराठी येत नसावं, पण त्यांना महाराष्ट्राने स्वीकारले. ठाकरे यांना महाराष्ट्राने एवढं मोठं केलं की ते आज मराठीसाठी लढत आहेत. मगधची मागधी भाषा ते विसरले. महाराष्ट्राने तुम्हाला जे प्रेम शिकवले, ते तुम्ही पुढे का घेऊन जात नाही. जाहीररित्या कानाखाली आजाव काढण्याची भाषा करणाऱ्यांवर आम्हाला बोलावे लागते म्हणजे आम्ही समजू की, देशातील कायदा सुव्यवस्था संपलेली आहे. यावर आम्ही संन्याशांनी बोलण्यापेक्षा सरकारने पाऊल उचलले पाहिजे. मी दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात आम्हाला मराठी शिकवावं, असे आवाहन शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव तथा शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना प्राप्तीकर विभागाची नोटीस आली आहे. त्याबाबतची माहिती राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. याबाबत ते म्हणाले, प्राप्तीकर विभागाचे कुणाचीही चौकशी करू शकतो. मला नोटीस आली आहे, तसेच श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस आलेली आहे. त्या नोटिशीला उत्तर देणे आपले कर्तव्य आहे. नऊ जुलै रोजी मला उत्तर देण्यास सांगण्यात आले होते. उत्तर देण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे.
Nishikant Dubey : निशिकांत दुबे पुन्हा बरळले, ‘पटक पटक के मारेंगे...’
भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी ‘पटक पटक के मारेंगे’ या विधानाची दुरुक्ती केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे, याबाबत कोणतेही दुमत नाही. महाराष्ट्र जो टॅक्स देत आहे, त्यात आमचेही योगदान आहे. त्याचा ठाकरे परिवाराशी आणि मराठी माणसाशी काही देणंघेणं नाही. तुम्ही (मराठी माणसं) उत्तर प्रदेशातच नाही तर तामिळनाडू, केरळ, कर्नाटकात गेला तरी तुम्हा आपटून आपटून मारतील आणि त्या विधानावर मी आजही कायम आहे, अशा शब्दांत दुबे पुन्हा बरळले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.