Sanjay Kakade News : काही काय..., काकडेंच्या फेसबुक पोस्टमुळे मोदी, शाह अन् फडणवीस 'अण्णां'ची उमेदवारी कापणार?

Pune Loksabha Constituency : जाणून घ्या, संजय काकडे यांनी असं काय म्हटलं आहे त्यांच्या पोस्टमध्ये?
Sanjay Kakade and Murli Anna
Sanjay Kakade and Murli AnnaSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : लोकसभा निवडणुकीसाठी आता सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत. अनेक ठिकाणी तर प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे, तर काही ठिकाणच्या जागांवरील उमेदवारीबाबतचा पेच फसलेला आहे, त्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आहेत.

असे असताना आता महाविकास आघाडीबरोबरच महायुतीमधीलही काही ठिकाणच्या जाहीर झालेल्या उमेदवारांना बदलण्याची मागणी समोर येताना दिसत आहे. मात्र, काकडेंच्या भूमिकेमुळे भाजप श्रेष्ठी पुण्याची उमेदवारी बदलणार का? असाही सवाल उपस्थित होत आहे.

पुण्याच्या भाजप उमेदवाराबाबतही तसेच काही घडताना दिसत आहे. अद्याप उघडपणे तशी मागणी झालेली जरी नसली तरी, मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली जाऊ नये, यासाठी अगोदर पक्षातूनच झालेला विरोध दुर्लक्ष करण्यासारखा नाही. भाजपने जरी मुरलीधर मोहाेळ यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले असले, तरीही पक्षाने अजूनही विचार करावा अशी चर्चा असल्याचे समोर येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Kakade and Murli Anna
Loksabha Election 2024 : लोकसभेला एकही जागा न मिळाल्याने 'आरपीआय'ची उद्याची पुण्यातील बैठक वादळी होणार?

याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी फेसबुकवर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. किंबहुना त्यांच्या या पोस्टमुळे आता माढा आणि अमरावतीपाठोपाठ पुण्यातही भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी होत असल्याचे जाणवत आहे.

संजय काकडे नाराज असल्याच्या चर्चांमुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुण्यात त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या प्रसंगी संजय काकडे यांनी आपले म्हणणे चव्हाण यांच्यासमोर मांडून, आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहाेचतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे माझ्या वेदना व पुणे लोकसभेचे वास्तव मांडले. या मथळ्याने लिहिलेल्या पोस्टमध्ये संजय काकडे यांनी म्हटले की, 'पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते आणि माझे मित्र माननीय रवींद्र चव्हाण यांनी आज माझ्या निवासस्थानी माझी भेट घेतली. या वेळी मी माझ्या मनातील सर्व वेदना आणि माझ्या आयुष्यातील उमेदीची 10 वर्षे पक्षासाठी देऊन या काळात काय काय कामे केली हे त्यांना सविस्तराने सांगितले. तसेच, पुणे लोकसभा मतदारसंघातील वास्तव स्थितीदेखील मी त्यांना सांगितली.'

याशिवाय 'मी त्यांना सांगितलेल्या माझ्या वेदना आणि पक्षहिताच्या सर्व गोष्टी आमचे वरिष्ठ नेते, मार्गदर्शक व केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी मला या भेटीदरम्यान दिला. पक्षाचे वरिष्ठ नेते मला योग्य तो न्याय देतील आणि पुणे शहरासाठी योग्य तो निर्णय करतील ही आशा आहे,' असंही काकडे म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Sanjay Kakade and Murli Anna
Lok Sabha Election 2024 : साताऱ्यासाठी चढाओढ! उदयनराजेंनी दंड थोपटले, पण अजित पवार गटाची भूमिका काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com