LPG cylinder price hike : LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, पण 'या' ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही; सरकार देणार 300 रुपयांचा दिलासा!

LPG Cylinder price Hikes : देशात एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली असली तरी उज्ज्वला योजनेतील पात्र ग्राहकांना सरकारकडून 300 रुपयांची सबसिडी दिलासा मिळणार आहे. कोणाला मिळणार फायदा ते जाणून घ्या.
LPG Cylinder price Hikes
LPG Cylinder price HikesSarkarnama
Published on
Updated on

जागतिक राजकारणातील तणावाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर दिसू लागला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. त्याचा परिणाम भारतासह राज्यातही जाणवू लागला असून घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे घरगुती बजेट पुन्हा एकदा कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या कुटुंबांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. दुसरीकडे हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेवरही परिणाम झाला आहे. काही भागात सिलिंडर मिळण्यात अडचणी येत असून गॅस एजन्सींकडून पुरवठा मर्यादित केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

LPG Cylinder price Hikes
Government Schemes for Women : महिलांच्या आयुष्यात क्रांती घडवणाऱ्या टॉप 5 सरकारी योजना; कोणाला आणि कसा मिळणार लाभ? वाचा सविस्तर

या परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात गॅस किंवा इंधनाचा तुटवडा निर्माण होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सरकारकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, घरगुती एलपीजीच्या किमतींमध्ये तातडीने पुन्हा वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचेही सरकारी सूत्रांकडून सांगितले जात आहे. सध्या अस्तित्वात असलेली दरपद्धती कायम ठेवण्याचा सरकारचा विचार आहे, जेणेकरून सामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये. विशेष म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या कुटुंबांना अद्यापही प्रति सिलिंडर सुमारे 300 रुपयांची अनुदानाची मदत मिळत आहे. देशभरातील कोट्यवधी कुटुंबांना या योजनेमुळे दिलासा मिळत आहे.

LPG Cylinder price Hikes
Women MLAs Maharashtra : 'ती'ची गर्जना! विधिमंडळात महिलांचा आमदारांचा दरारा; पाहा कोण आहेत या 'फायरब्रँड' नेत्या...

मात्र, भारतामध्ये एलपीजीची मागणी झपाट्याने वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात देशात सुमारे ३१ दशलक्ष टन एलपीजीचा वापर झाला, तर देशांतर्गत उत्पादन त्यापेक्षा खूपच कमी होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस आयात करावा लागतो. आयात होणाऱ्या एलपीजीपैकी मोठा हिस्सा पश्चिम आशियातील देशांकडून येतो. त्यामुळे त्या भागात निर्माण होणारा कोणताही तणाव भारतातील इंधनाच्या किमतींवर थेट परिणाम करू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com