

मंचर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे गेल्या पावणे पाच महिन्यांपासून बंद असलेले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर सोमवार (ता.१५)पासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. मंदिरात दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी व्यवस्था सुरू करण्यात आली असून दररोज एक हजार भाविकांना दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
NEET आणि CBSE परीक्षा प्रक्रियेमधील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या प्रश्नांवर आज काँग्रेसच्या वतीने कोल्हापुरात कॅन्डल मार्च काढण्यात आला... काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या सह काँग्रेसचे अन्य नेते सहभागी झाले होते... हा कॅन्डल मार्च राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी चौक येथे समाप्त झाला. या वेळी जोरदार घोषणा बाजी करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत फूट पडल्याचे दिसत असून भाजपचे नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर झाली असताना देखील शिंदेंच्या शिवसेनेकडून दोघांचे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याच्या मुदतीच्या शेवटच्या दहा मिनिटात हे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिवसेनेच्या नगरसेविका रेश्मा कुंदन काळे आणि भुसावळ शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपक धांडे यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
अब्दुस सत्तार यांनी भाजपच शिवसेना संपवत असल्याचा आरोप करत दोन्ही शिवसेना एकत्र असायला हव्या अशी खंत व्यक्त केली होती. ज्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी, तुम्ही आणि तुमचे नेते भाजप बरोबर का गेलात? आज तुम्ही आणि तुमचे नेते भाजपचे घरगडी म्हणून काम करत आहात. ही भूमिका का स्विकारली अशा प्रश्नांची सरबती करत यावर आधी भाष्य करा आणि तुमच्या नेत्यांनाही सांगा असा सल्ला दिला आहे. तसेच अब्दुल सत्तार यांनी आधी त्यांच्या नेतृत्वावाला सांगावा असेही आवाहन केलं आहे.
महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज संस्थेची द्विवार्षिक निवडणूक 2026 रायगड तथा रत्नागिरी तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी आजअखेर एकूण 6 उमेदवारांची 12 नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. जुईली महेंद्र दळवी (अपक्ष) यांनी 30 मे रोजी 1 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुरेंद्रनाथ यशवंत माने (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी 4, अरविंद पुंडलिक म्हात्रे (पींझट्स ॲण्ड वर्कस् पार्टी ऑफ इंडिया) यांनी 1, मानसी संतोष म्हात्रे (पींझट्स ॲण्ड वर्कस् पार्टी ऑफ इंडिया) यांनी 1, अनिल रमेश चोपडा (अपक्ष) यांनी 1 आणि अनिकेत सुनिल तटकरे (नॅशलिस्ट काँग्रेस पार्टी) 4 असे 5 उमेदवारांची आजच्या दिवशी 11 अशी एकूण 6 उमेदवारांची एकूण 12 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. उद्या मंगळवारी दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे.
महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज संस्थेची द्विवार्षिक निवडणूक 2026 ठाणे तथा पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी आजअखेर एकूण 2 उमेदवारांची 5 नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. अभिजित अंकुश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) आणि रवींद्र फाटक (शिवसेना) यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. एकूण 2 उमेदवारांची आजच्या दिवशी एकूण 5 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. उद्या मंगळवार,दि.2 जून रोजी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे.
पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे समोर आले आहे. शिरूर तालुक्यातील करडे घाट परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी एका कुख्यात गुन्हेगारावर गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जळगावमध्ये भाजपचा मोठा विजय होणार! गिरीश महाजनांचा दावा नाशिक दौऱ्याबाबत बोलताना ते म्हणाले की, “मी नाशिकला जात आहे, तिथे कुठलीही नाराजी नाही.” तसेच शिवसेनेच्या काही आमदारांच्या अनुपस्थितीवर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, “नाराजी नाही, सर्वजण आपापल्या उमेदवाराच्या अर्ज दाखल प्रक्रियेत व्यस्त आहेत.” गुलाबराव पाटील यांच्या चिरंजीवांना तिकीट मिळावं यासाठी आग्रह होता, या चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “अशी कोणतीही नाराजी नाही, सर्व काही सुरळीत आहे,” असं महाजन म्हणाले.
विधानपरिषद निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुणे मतदारसंघातून विक्रम काकडे तर रायगड मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. थोड्याच वेळात ते उमेदवारी अर्ज दाखल कऱणार आहेत ..यावेळी सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत महायुतीत राष्ट्रवादीच्या वाटेला 2 जागा आल्या आहेत
त्र्यंबकेश्वरमध्ये एकाच दिवसात २० लाख रुपयांची तिकीट विक्री झालीय. व्हीआयपी दर्शनाचा कोट्यवधींचा काळाबाजार रोखण्यासाठी अती तातडीची सशुल्क दर्शन सुविधा सुरु केलेली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. एकाच दिवसांत 836 भाविकांनी अतीतातडीची दर्शन तिकिटं घेतली. 4 दिवसात एकूण 1400 तिकिटांमधून 35 लाखांचं संस्थानाला उत्पन्न मिळालंय. संस्थांनच्या 2500 रुपयांच्या अती तातडीच्या दर्शन योजनेला उदंड प्रतिसाद मिळालाय.
गोकुळ दूध संघाशी संलग्न 997 दूध संस्थांचा आज निर्णय होणार आहे. गोकुळशी संलग्न सभासद संस्थांना ठरावाचा मसुदा पाठवण्याचा आज अखेरचा दिवस आहे. रविवार पर्यंत 3112 दूध संस्थांना पत्रे पाठवण्यात आली असून करवीरमध्ये 432 तर पन्हाळ्यातील 411 संस्थांना आज पाठवली जाणार आहेत.
यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेनेचा उमेदवार अद्याप अनिश्चित असून आता पालकमंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शीतल राठोड यांचे देखील नाव अचानक चर्चेत आले आहे
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी त्यांच्या अंगरक्षकाचे बंदूक काढून माझ्या डोक्याला लावत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक आरोप करत समाधान खिंडकर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, आता धनंजय देशमुख यांच्या विरोधात जीवे मारण्याची दिलेली तक्रार खोटी असल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं आहे.
पुणे विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर आी आहे. राष्ट्रवादीच्या पुण्यातील कार्यालयात काल रात्री 8.30 वाजता उमेदवार निश्चित करण्या संदर्भात ही बैठक बोलावली होती. या बैठकीत काकडेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. कल्याणपूर यांना केंद्र सरकारने 2023 साली त्यांना 'पद्मभूषण' या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले असून त्यानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.