

अन्न व सुरक्षा विभागानं कठोर कारवाई करताना मुंबईतील 5 नामांकित क्लब्सचे FSSAI परवाने निलंबित केले आहेत. या एफडीनं केलेल्या कारवाईत संबंधित क्लबमध्ये स्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन केल्याचं आढळले. एफडीएनं कारवाई केलेल्या क्लबमध्ये द अपर्ना जुहू जिमखाना, एमआयजी क३िकेट क्लब, वांद्रे पूर्व, द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया लिमिटेड, द विलिंग्टन स्पोर्ट क्लब, आरके जुहू जीमखाना या पाच क्लबचा समावेश आहे.
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मंगळवारी (ता.28) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. ते पोस्टमध्ये म्हणाले की, पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरूच राहिला, तर कॉक्रोच जनता पार्टी लवकरच देशभरात मोठ्या प्रमाणावर शांततापूर्ण आंदोलन सुरू करेल. सरकारने विद्यार्थ्यांना लक्ष्य करणे आणि त्यांच्याविरोधातील कारवाई तात्काळ थांबवावी असंही दीपके यांनी त्यांच्या पोस्टमधून म्हटलं आहे.
गुजरातमधील अनंत अंबानी यांच्या वनतारा या रेस्कू सेंटरमध्ये कोल्हापुरातील एका मठातील माधुरी हत्तींणीला ठेवण्यात आलं आहे. या हत्तीणीला परत आणण्यासाठी राजू शेट्टी आता नव्या आंदोलनाची घोषणा करण्याची शक्यता आहे. अंबानींच्या मुंबईतील अँटेलिया निवासस्थानावर मोर्चा काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- नागपूरात मुसळधार पावसाची हजेरी,या मोसमात पहिल्यांदाच मुसळधार पाऊस
- सुमारे एका तासापासून शहरात जोरदार पाऊस
- आज नागपूरला पावसाचा यलो अलर्ट आहे
- मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता
* बनावट शालार्थ प्रकरणातील मुख्य आरोपी भाजप पदाधिकारी असलेल्या संजय गरुड याला सोलापूर मधून नाशिक पोलिसांनी केली अटक...
* सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील फार्महाऊसवरून आरोपीला घेतले ताब्यात...
* नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबारमधील 841 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावांचा गैरवापर...
* आरोपीच्या 15 शैक्षणिक संस्थांतील 177 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बनावट वैयक्तिक मान्यता दिल्याचे तपासात निष्पन्न...
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेरे गावातील एका विद्यार्थिनीने NEET परीक्षेतील अपयशामुळे नैराश्यात विषारी औषध प्राशन केल्याची घटना समोर आली आहे. 23 जुलै रोजी तिने हे टोकाचे पाऊल उचलले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोमवारी तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राज्यात चर्चेत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जळगाव जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक आणि भाजप नेते संजय गरुड यांना सातारा जिल्ह्यातील फलटण येथून ताब्यात घेण्यात आले. जामनेर तालुक्यात त्यांच्या संस्थेच्या 15 ते 20 शाळा व महाविद्यालये कार्यरत असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका महिलेकडून 10.46 लाख रुपये उकळल्यानंतर तिला जबरदस्तीने शरिरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याची तक्रार महिलेने पोलिसांत दाखल केली. महिलेने विरोध केला असता तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे. मोहम्मद शाफत शेख (28) आणि मोहम्मद नावेश शेख (26) अशी आरोपींची नावे आहेत.
सिंधुदुर्ग वेतोरे पालकरवाडी येथे एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पांडुरंग बिराप्पा वगरे (वय 50, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे त्यांचे नाव आहे. वेतोरा पालकरवाडी येथील गोगटे मंगल कार्यालयाच्या मागे सोमवारी हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील व्याघ्र कॉरिडॉरमध्ये वृक्षतोडीसह पर्यावरणावर आघात होईल, असे कृत्य झाल्याचा आरोप करत केंद्र, राज्य प्रशासनातील महसूल आणि वनविभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर ‘वनशक्ती’ संस्थेने अवमान याचिका दाखल केली आहे. कोलझर आणि सरमळे या इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये झालेल्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर ही याचिका आहे.
फसवणूक, बनावट कागदपत्रे किंवा दुसऱ्याची ओळख वापरून सीम कार्ड अथवा कोणतीही दूरसंचार सेवा मिळविणे गंभीर आणि दंडनीय गुन्हा असून, अशा प्रकरणांमध्ये दोषी आढळल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास, 50 लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. शिवाय अशा गुन्ह्याचा प्रयत्न, त्यासाठी मदत करणे किंवा कट रचण्यालाही कायद्यानुसार शिक्षा होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मुंबईतील प्रीमियम रिअल इस्टेट मार्केटमध्ये एक मोठी गुंतवणूक केली आहे. या जोडप्यानं मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा भागात असलेल्या 'गोदरेज स्कायशोर' प्रकल्पात 18.29 कोटी रुपये किमतीचा एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांनुसार, हा व्यवहार साधारणपणे 69,159 रुपये प्रति चौरस फूट या दरानं पूर्ण झालाय. वर्सोवाच्या प्रीमियम रिअल इस्टेट बाजारपेठेत मागणीत मोठी वाढ झाली आहे.
सरकारने जारी केलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार, 6वर्षांपर्यंत जुन्या असलेल्या 'बीएस-6' (BS6) खाजगी वाहनांसाठी पीयूसीची वैधता 1 वर्षावरून थेट 3 वर्षे करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. हा नवीन नियम लागू झाल्यास वाहनधारकांना दरवर्षी प्रदूषण चाचणी केंद्रांवर जाण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे.
नीट पेपरफुटीवरून देशभरात गोंधळ निर्माण झाला. सीजेपीने दिल्लीत मोठे आंदोलन उभा करून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला. दरम्यान, आता पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकार आज नवीन विधेयक आणणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या पुढाकाराने आणि सर्व पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर, सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक, 2026 वर चर्चा करण्याबाबत एकमत झाले आहे. यामुळे संसदेच्या रखडलेल्या कायदेविषयक कामकाजाला पुन्हा गती मिळण्याची शक्यता वाढली आहे.
नीट (NEET) परीक्षेत अपयश आल्याने कराड तालुक्यातील शेरे येथील समीक्षा दीपक पवार या विद्यार्थीनीने आपलं आयुष्य संपवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीक्षाने मागील वर्षी नीट परीक्षा दिली होती. मात्र, निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्यामुळे ती काही काळापासून मानसिक तणावाखाली होती. या नैराश्याच्या अवस्थेत तिने २३ जुलै रोजी उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी औषध प्राशन केले. सुरुवातीला तिने ही बाब कुटुंबीयांपासून लपवून ठेवली होती. मात्र, घटनेनंतर दोन दिवसांनी तिची प्रकृती अचानक बिघडू लागली आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर तिने विषारी औषध घेतल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. नातेवाईकांनी तातडीने तिला कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली.
सर्व शालेय बस व विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस विथ पॅनिक बटण, फायर डिटेक्शन अँड अलार्म सिस्टिम , सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टिम, डिजिटल उपस्थितीची नोंद जतन करणे बंधनकारक असणार आहे. तीन महिन्यांत अंमलबजावणी बंधनकारक असेल.
महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बस नियमन) (प्रथम सुधारणा) नियम, २०२६ लागू करण्यात आले आहेत. सुधारित नियमानुसार मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यातील इतर भागात शालेय बस व शालेय व्हॅनच्या परवान्यासाठी वाहनाची नोंदणी दिनांकापासूनची वयोमर्याद १५ वर्षांवरून २० वर्षांपर्यंत वाढविण्यात आली आहे. शालेय बसच्या शुल्काचे निर्धारण करण्याचे अधिकार संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांना प्रदान करण्यात आले आहेत.
काही होमिओपॅथी डॉक्टर MMC (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) यांच्याकडे ठिय्या आंदोलन करून नोंदणी घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा IMA चा आरोप आहे. या दबावाला बळी पडून BHMS चिकित्सकांना एकही नोंदणी देण्याच्या सरकारने प्रयत्न करू नये, अशी IMAची मागणी आहे. यासाठी आय एम ए महाराष्ट्र राज्य, MARD, तसेच इतर समविचारी वैद्यकीय संघटनांनी सरकार ने असा कोणताही निर्णय पुढे नेल्यास, या संघटनाचे सदस्य डॉक्टर तात्काळ सेवा बंद आंदोलन सुरू करतील, असा इशारा इंडिया मेडिकल असोसिएशनने दिला आहे.
पुण्यातील बहुप्रतिक्षीत उच्च द्रूतगती वर्तुळाकार मार्गासाठी (एचसीएमटीआर) शासकीय जागा महापालिकेची अडवणूक न करता मोफत हस्तांतरण करा, रिंगरोडसाठी रोख मोबदला द्या, पाताल लोक प्रकल्पासाठी बोगद्यांच्या अलाईमेंट तज्ज्ञांकडून तपासून घ्या असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाच्या विविध विभागाला दिले आहेत. या तिन्ही प्रकल्पाच्या उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक झाल्याने या प्रकल्पांना बुस्ट मिळाले आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पाच बोगदे, पीएमआरडीए रिंगरोड आणि एचसीएमटीआर या तीन प्रकल्पांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे जुलैच्या अवघ्या सहा दिवसात 144 तालुक्यात 100 टक्के पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण 355 पैकी 144 तालुक्याने जुलैची पावसाची शंभर टक्के सरासरी गाठली आहे. 95 तालुक्यात 50 टक्के तर 39 तालुक्यात 25 ते 50 टक्के इतका पाऊस झाला आहे. जुलैमध्ये एकही तालुका रेड झोन मध्ये नाही मुंबई आणि कोकण मध्ये महाराष्ट्राने सरासरी गाठली आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाने सरासरीखूप कमी असल्याची हवामान विभागाची माहिती आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकर यांनी केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनावणे हे अमित शहांच्या भेटीला पोहोचले यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उदाहरण आलं आहे.
दिवे घाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगसाठी रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. आज दुपारी १२ पासून वाहनचालकांसाठी घाट राहणार बंद असेल तर या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार असल्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाने आवाहन केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.