Maharashtra News Update: दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 28 May 2026: बकरी ईदनिमित्त किल्ल्यावर हिंदुना बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या दोन्ही शिवसेनेने दुर्गाडी किल्ला परिसरात आंदोलन केली आहे, यासह राज्यासह देशभारातील राजकीय घडामोडी एका जाणून घेऊया.
Eknath Khadse Fraud Case
Eknath Khadse Fraud CaseSarkarnama
Published on
Updated on

विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे अन् त्यांच्या मुलीला न्यायालयानं दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीला न्यायालयानं दिलासा दिला आहे. भुसावळ न्यायालयाकडून खडसेंसह त्यांची मुलगी शारदा खडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. भुसावळमधील मानपूरच्या महार वतन जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी पार पडलेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला आहे.

'राष्ट्रवादीच्या कोट्यातून आनंद परांजपेंना म्हाडाचं उपाध्यक्ष पद देऊ नये..'; सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

विधान परिषदेसाठी डावलल्यानंतर माजी खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला होता. याचसंदर्भात, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून परांजपेंना म्हाडाचं उपाध्यक्ष पद न देण्याची मागणी या पत्रात केली आहे. त्यांच्याऐवजी नवं नाव पक्षाकडून सुचवण्यात येईल, असंही पत्रात सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे,अशी माहिती समोर येत आहे.

नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी अपडेट; सीबीआयच्या पथकानं पुन्हा नांदेड गाठलं 

देशभरात खळबळ उडवलेल्या नीट पेपर फुटीप्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. सीबीआयचं पथक पुन्हा एकदा नांदेड गाठलं असल्याची माहिती आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं यावेळी नांदेडमधील दोन विद्यार्थी आणि एका कुटुंबाची कसून चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच दोन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्याची सूत्रांनी सांगितलं आहे.

मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी,1 जून ते 31 जुलै 2026 या कालावधीत मासेमारीवर बंदी

ठाणे-पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्य सरकारकडून 1 जून ते 31 जुलै 2026 या कालावधीत पावसाळी मासेमारीवर अधिकृत बंदीबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. हा निर्णय वादळी हवामानापासून मच्छीमारांना जीवितास धोका व समुद्रातील मासळीच्या साठ्याचे जतन करण्यासाठी घेण्यात आल्याची माहिती ठाणे-पालघर जिल्हा मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त (तांत्रिक) दिनेश पाटील यांनी दिली आहे.

नाशिकमध्ये पोलीस निरीक्षकाचा पोलीस ठाण्यातच गोळीबार; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीमधील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलीस निरीक्षकाने पोलीस ठाण्यातच गमतीत सरकारी पिस्तुलातून गोळीबार केल्याची खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही घटना घडल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवेंनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे. त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत दोषी अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी.’  असं म्हटलं आहे.

Shrikant Shinde : नांदेड दौऱ्यावेळी झालेल्या अपघातात गाड्यांचे नुकसान

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा अपघात झाला आहे. श्रीकांत शिंदे हे नांदेडच्या दौऱ्यावर होते. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु अपघातामुळे गाड्यांचे नुकसान झाले आहे. ते नांदेडमध्ये शिवसंवाद यात्रेवर होते. यावेळीच त्यांच्या ताफ्यात असलेल्या गाड्यांच्या अपघात झालेला आहे.

बेटिंगप्रकरणी कोल्हापुरात भाजपच्या नगरसेवकाला अटक

आयपीएलमधील बेटिंगचा ‘राजस्थान’ कनेक्शनच्या संदर्भाने सध्या तपास केला जात आहे. बेटिंग प्रकरणी कोल्हापुरात आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातच भाजप नगरसेवक नीतेश पवार याचा समावेश आहे

सिद्धरामय्या यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नवे मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

राजकीय भेटीसाठी मी दिल्ली आलो नव्हतो : एकनाथ शिंदे

राजकीय भेटीसाठी मी दिल्ली आलो नव्हतो, तर कांदा, ऊस उत्पादक, जलजीवनच्या संदर्भात काही विषय होते, त्यासंदर्भात भेटण्यासाठी मी दिल्लीला आलो होतो. बैठका सरकारात्मक झाल्या आहेत. महाराष्ट्रातील समस्यांवर, प्रश्नावर बोलण्यासाठी दिल्लीत बोलायचं नाही तर कोणाशी बोलायचं, असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

डिझेल नसल्याचे सांगून गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारली; बाळाचा पोटातच मृत्यू

डिझेलचे कारण सांगून गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारण्याचा प्रकार हिंंगाली जिल्ह्यातील जवळा बाजार आरोग्य केंद्रात घडला आहे. रुग्णवाहिकेअभावी संबंधित महिलेला दोन तास ताटकळत ठेवण्यात आले होते. याचदरम्यान बाळाचा महिलेच्या पोटातच मृत्यू झाला.

रायगड-रत्नागिरी मतदारसंघाच्या बदल्यात राष्ट्रवादी पालकमंत्रिपद शिवसेनेला देणार?

विधान परिषदेच्या निवडणुकीत रायगड-सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहेत. इथून सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र, शिवसेनाही या मतदाररसंघासाठी इच्छूक आहे. मात्र, आमदारकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रायगडचे पालकमंत्री शिवसेनेला देणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Hingoli Ambulance Failure |डिझेल अभावी आईनं बाळ गमावलं

हिंगोलीतून आरोग्य व्यवस्थेला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येतेय.रुग्णवाहिकेत डिझेल नसल्यामुळे एका आईनं आपलं नवजात बाळ गमावलंय. वसमत तालुक्यातील मनीषा इंगळे नावाच्या महिलेला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती बिघडल्यानृं डॉक्टरांनी तिला हिंगोलीला हलवण्यास सांगितलं. नातेवाईकांनी तातडीनं 102 आणि 108 नंबरच्या रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र गाडीत डिझेल नाही असं सांगून रुग्णवाहिका नाकारण्यात आली. गरोदर मातेला तब्बल दीड तास ताटकळत ठेवण्यात आलं. अखेर नातेवाईकांनी स्वतः पैसे खर्च करून खासगी गाडी केली. मात्र हिंगोलीत पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. प्रसूती दरम्यान बाळाचा मृत्यू झाला.

Uday Samant On Mahesh Shinde सामंतांनी टोचले महेश शिंदेंचे कान?

फलटण इथल्या शिंदेसेनेच्या मेळाव्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता त्यांचे कान टोचले आहेत.... राजे गट सोबत आल्यानं फलटणचा पुढील आमदार शिंदेसेनेचाच असेल, असा विश्वास सामंतांनी व्यक्त केला... तसंच स्वार्थासाठी पक्ष दुसऱ्यांच्या दावणीला बांधणं खपवून घेतलं जाणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला

Manchar Pandavkalin Barav Dispute मंचरमध्ये पांडवकालीन बारव दर्गा वाद पेटला, पोलिसांचा बंदोबस्त

मंचरमध्ये पांडवकालीन बारव आणि दर्गा परिसरावरून वाद निर्माण झाला आहे. ईदच्या पाश्वभूमीवर नमाज पठणास दिलेल्या परवानगीच्या निषेधार्थ हिंदू जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. आमदार संग्राम जगताप आणि संग्रामबापू भंडारे महाराज यांनी यांची माहिती दिलीये. शहरात तणाव वाढल्याने पोलिसांनी जमावबंदी लागू केली असून मोठा बंदोबस्त तैनात केलाय.

पुणेकरांना पुन्हा महागाईचा झटका; सीएनजी दरात 2.50 रुपयांची वाढ

पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील वाहनधारकांना पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे. आज मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात 2.50 रुपयांनी वाढ करण्यात आली असून नवीन दर 94.85 रुपये प्रति किलो झाला आहे. नैसर्गिक वायूच्या वाढलेल्या खर्चामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, 9 मे रोजीही 1.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे मे महिन्यात दुसऱ्यांदा सीएनजी महागले आहे.

मराठा आरक्षणावरून जरांगेंचा सरकारवर घणाघात; 30 तारखेपासून आंदोलनाचा इशारा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकार मुद्दाम वेळकाढूपणा करून मराठा समाजात मतभेद निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पश्चिम महाराष्ट्रातील मराठे श्रीमंत असल्याचे कारण पुढे करून आरक्षण नाकारले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मराठा समाजाच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत लढणार असल्याचे सांगत, 30 तारखेपासून पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Manoj Jarange Patil :  सरकारकडून अन्याय; मनोज जरांगे पुन्हा उपोषणाच्या भूमिकेत

सरकारकडून सातत्याने मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. समाजाला आरक्षण आणि न्याय मिळत नसल्याने आता उपोषणाशिवाय पर्याय उरला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे समाजात नाराजी वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.

हिंदूंकडून मते मागून हे हिंदूंच्याच मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत-   अरविंद केजरीवाल

पेपरफुटीवरून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. बाभळीचे झाड लावलं तर त्याला आंबे कसे येतील? आज सर्व मोदीभक्तांच्या घरांमध्ये आग लागत आहे. प्रत्येकाच्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. हीच वेळ आहे सावध होण्याची. हिंदूंकडून मते मागून ते हिंदूंच्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत, अशा शब्दात केजरीवालांनी मोदींवर टीका केली आहे.

आमदार चिखलीकरांनी मध्य रात्री घेतली खासदार श्रीकांत शिंदेंची भेट

नांदेड विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही असं वाटतं असं वक्तव्य आमदार चिखलीकर यांनी केलं आहे. शिवाय त्यांनी मध्य रात्री खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

गिरीश महाजनांच्या विरोधात जामनेरमध्ये आज शेतकऱ्यांचा आक्रोश

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह डिझेलच्या टंचाई आणि अन्य प्रश्नांसाठी शेतकरी आज जनअक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप खोडपे यांच्या नेतृत्वात आज चार वाजता जामनेर शहरातून हा मोर्चा निघेल.

चंद्रपूरात रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू

चंद्रपूरात गोंदिया-बल्लारपूर रेल्वे मार्गावर आज पहाटेच्या दरम्यान रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मिरा रोडमधील बकऱ्या इतरत्र हलवल्या

मिरा रोड येथील पूनम इस्टेट क्लस्टर येथील एका सोसायटीत कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पूनम इस्टेट क्लस्टर 3 परिसरातील काही बकऱ्या पोलीसांच्या बंदोबस्तात इतर ठिकाणी हलवण्यात आल्या आहेत.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मालेगावात पोलिसांचे सशस्त्र संचलन

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मालेगाव पोलीस दलाकडून सशस्त्र संचलन करण्यात आले.

दोन्ही शिवसेनेचे दुर्गाडी किल्ला परिसरात आंदोलन

बकरी ईदनिमित्त दुर्गाडी किल्ल्यावर हिंदुना बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या दोन्ही शिवसेनेने दुर्गाडी किल्ला परिसरात आंदोलन केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com