Kalyan Dombivli Municipal Corporation
ठाणे जिल्ह्यातील दोन महत्त्वाची शहरे म्हणून कल्याण आणि डोंबिवलीची (KDMC) ओळख आहे. या महानगरपालिकेवरही सुरुवातीपासूनच शिवसेनेचा प्रभाव दिसून येतो. 2015 मधील निवडणुकीत 122 पैकी शिवसेनेने तब्बल 52 जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. तर भाजपनेही जोरदार मुसंडी मारून 42 जागा जिंकल्या होत्या. 2010 मध्ये 28 जागा जिंकणाऱ्या मनसेला केवळ 9 जागाच जिंकता आल्या. यंदा तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा निवडणूक होत आहे. भाजप, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष इथल्या प्रमुख लढतीत असणार आहेत.