Maharashtra Political Live Update : 20 दिवसात तुरीच्या दरात तब्बल 1 हजार रुपयांची वाढ....

Political Breaking Live Headlines Updates : महाराष्ट्रातील दुष्काळाच्या झळांमुळे शेतकरी त्रस्त झाला असून, मदतीसाठी सरकारकडे मागणी करत आहे. यावरून राज्यातील राजकारण पेटले आहे. सरकारने देखील लवकर दुष्काळ जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. यासह राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊयात...
Live Update
Live UpdateSarkarnama

Farmer News : 20 दिवसात तुरीच्या दरात तब्बल 1 हजार रुपयांची वाढ....

वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या 20 दिवसात तुरीच्या दरात तब्बल 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. कारंजा बाजार समितीत 1 सप्टेंबरला तुरीला 7305 ते 8500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. 21 सप्टेंबरला हा दर वाढून 8252 ते 9600 रुपये झाला. म्हणजेच कमाल दरात 1 हजार रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Crime News : उल्हासनगरच्या सुभाष टेकडी हत्याकांडाचा छडा; पाच आरोपींना पोलिसांकडून अटक

उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात पूर्ववैमनस्यातून रोहित जगदाळे या युवकाच्या झालेल्या हत्येचा विठ्ठलवाडी पोलिसांनी छडा लावला असून पाच आरोपींना अटक केली आहे. प्रथम बनकर, अतिश मनोहर, अनिकेत खरात उर्फ टॉम, साहिल म्हस्के आणि प्रतीक क्षेत्रे अशी आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी मध्यरात्री रोहितवर आरोपींनी पेव्हर ब्लॉक आणि चाकूने हल्ला झाला होता.

Amravati Update : पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास थेट फौजदारी गुन्हा...

अमरावती जिल्ह्यासह निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अंतर्गत परिपत्रक जारी करून पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास थेट फौजदारी गुन्हा करण्याचा इशारा दिला आहे.

Buldhana Politics : चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांना राहुल गांधींचा फोन अन् भाजप पक्ष प्रवेशाबाबत ट्विस्ट?

गेल्या दोन महिन्यापासून चिखली मतदारसंघातील राजकारण हा चर्चेचा विषय राज्यभरात ठरला आहे. चिखलीचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काल फेसबुक लाईव्ह करत भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज हा पक्षप्रवेश होऊ शकतो, असे चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी सुद्धा दुजोरा दिला. मात्र काल सायंकाळी या संपूर्ण घटना क्रमात एक मोठा ट्विस्ट आला. राहुल गांधींनी थेट राहुल बोंद्रेंना व्हाट्सअप कॉल करत त्यांची मनधरणी केली, शिवाय "हार के बाद ही जीत है" असा कानमंत्रही दिला. या संपूर्ण घटनाक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थी केल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com