

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले आहे. याचदरम्यान, डोंबिवलीकरांनी दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख 11 हजार 710 रुपयांचा मोठा निधी गोळा केला आहे. हा निधी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सूपूर्द केला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टोरंट पॉवर प्रकल्प वृक्षतोडीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी विकासाला आमचा विरोध नाही मात्र तो शाश्वत आणि स्थानिकांच्या हिताचा असला पाहिजे अशी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी विकासाच्या नावाखाली लाखो झाडांची कत्तल करून महाराष्ट्राचे वाळवंट करायचे आहे का? तुम्ही मेगावॅट निर्माण करत आहात की महाराष्ट्राची मेगा वाट लावत आहात? अशी जोरदार टीका आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.
पुणे : खडकवासला धरणसाखळीत २५.६६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. पुण्यात सध्या १३ टक्के पाणीकपात सुरू असून, त्यामाध्यमातून ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत कायम ठेवता येईल. त्यामुळे पाणीकपात २० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची आवश्यकता नाही, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे दिले आहे.
राज्याच्या दौरा करा, लोकांच्या समस्या जाणून घ्या आणि त्यावर काम करा. दुष्काळग्रस्तांना सर्वतोपरी मदत करा, अशा सूचना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांना केली आहे, अशी माहिती आहे.
मोदीच नाही तर मोदींचा बापसुद्धा जाईल, असे विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केले होते. त्याविरोधात भाजपकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतील दादरमध्ये खरगे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
अकोला येथून किसान मोर्चाला सुरुवात झाली आहे. दुष्काळी मदत, कर्जमाफीसह विविध मुद्यांवर लाँग मार्च काढण्यात येत आहे. शेतकरी, महिला कामगार मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले आहेत. शेकडो वाहनांमधून हजारो आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. हे लाल वादळ मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या ठिकाणी धडकणार आहे. पोलिसांनी मात्र या आंदोलकांना नोटिसा बजावलेल्या आहेत, त्यामुळे अहिल्यानगर पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा आणि एसआयआर प्रक्रिया तातडीने थांबविण्यात यावी, यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत रामलीला मैदानावर ‘व्होट बचाव; देश बचाव’ महारॅली होणार आहे. त्या रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केले आहे. खरगे यांनी केलेल्या विधानावरून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले जात असताना त्यांनी नव्याने एक व्हिडिओ जारी केला आहे.
500 कोटींच्या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या एसआयटीकडून निष्पक्ष आणि सखोल तपास व्हावा, अशी अपेक्षा मनोज जरांगे यांनी व्यक्त केली. तपासाच्या नावाखाली कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न होता कामा नये, असेही जरांगे म्हणाले. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडी आणि विकासाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. बिल्डरांशी जवळीक ठेवून केवळ डेव्हलपमेंट प्लॅन आखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरात मैदानं आणि बागाच नसतील, तर 7.8 टक्के GDP चाटायचा का, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ प्रकरणावरून चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
मजुरीवाढीच्या मागणीसाठी राज्यातील सुमारे 5 लाख ऊसतोड मजूर उद्यापासून संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. ऊसतोड आणि वाहतुकीच्या दरात वाढ करावी, अशी मजूर संघटनांची मागणी आहे. मागील कराराची मुदत संपूनही दरवाढीवर तोडगा न निघाल्याने यंदाच्या साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष तपास पथकाकडून शिंदे यांची वारंवार चौकशी सुरू आहे. पूर्णेकर कुटुंबीयांनी काही व्हिडिओ सादर करत हत्येच्या कटाबाबत गंभीर आरोप केले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेत थित 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावर भाष्य केलं आहे. या प्रकरणाचा तपास करून सत्य जनतेसमोर आणण्याचं आव्हान त्यांनी दिलं. या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचंही जरांगे म्हणाले.
मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.सिग्नल यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली असून वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. कांजूरमार्ग, भांडुप तसेच मुलुंड ते ठाणे दरम्यान अचानक सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या आणि जलद गाड्यांची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे
पुण्यातील स्वारगेट चौकात बसने पेट घेतला. बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी होते. मात्र, मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यात आली.
कर्जतमधील वृक्षतोडीला सह्याद्री देवराईच्या माध्यमातून पर्यावरणासाठी काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी विरोध केला आहे. "भारताच्या जंगलांच्या एकूण क्षेत्रापैकी पाच टक्के जंगल आपल्या सह्याद्रीत आहे. तिथून सगळ्या नद्या वाहतात आणि त्यावरच संपूर्ण महाराष्ट्र जगत आहे. शिवाय झाडांमुळेच पाऊस येतो आणि डोंगरांमुळे तो अडवला जातो. अशा ठिकाणी प्रकल्प येत आहेत. त्यातील पहिला प्रकल्प म्हणजे टोरेंट प्रकल्प. यासाठी ६०० एकर जमीन दिली जाते आणि त्यातील झाडे तोडली जातात. माझी मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांना विनंती आहे की, नियम बदला, कायद्यात बदल करा; पण झाडे तोडू नका. अशा शब्दांत सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीला कडाडून विरोध केला आहे.
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी कर्जत भीमाशंकर प्रकल्पावरून सरकारवर टीका केली आहे. एका बाजूला एल निनोचा परिणाम तुम्ही सांगत आहात, पाऊस कमी आहे म्हणून तुम्ही सांगता, दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचे सगळे नियम धाब्यावर बसवून आता असे प्रकल्प यायला लागलेत. निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प दुर्दैवाने महाराष्ट्रात यायला लागलेत. आता ते म्हणतील की आमच्या राज्यात येणाऱ्या प्रकल्पाला आम्ही विरोध करतो, आमचा विरोध नाही. तुम्ही जिथं निसर्गाची हानी होणार नाही, असे प्रकल्प यायला हवेत, असं म्हणत त्यांनी सरकावर निशाणा साधला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या 500 कोटींच्या आरोपानंतर खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहीत हे प्रकरण पीएमएलए अंतर्गत येत असून यात तपास ईडी कडे सोपवण्याची मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे तिथे कुठून झाडे लावली जाणार आहेत? ते 90 हजार झाडे लावण्याचे म्हणत आहेत, तिथे जागा तर हवी आहे ना? दोन गुजरात्यांसाठी हे सगळं सुरू आहे. गिफ्ट सिटीसारखे प्रोजेक्ट जिथ वरपायची संधी आहे ते गुजरातला आणि प्रदूषण करणारे प्रोजेक्ट महाराष्ट्राला, हे चालणार नाही. राज ठाकरे 28 तारखेला सकाळी त्या ठिकाणी जातील पाहणी करतील आणि संध्याकाळी सभा घेतील, असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कर्जमधील वृक्षतोडीवरून सरकारवर निशाणा साधला.
कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या वृक्षतोडीचा भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याशी थेट संबंध जोडणे चुकीचे आहे. वृक्षतोडीच्या घटनेचा संदर्भ देताना भौगोलिक परिस्थितीची अचूक माहिती घेणे आवश्यक आहे. चुकीच्या माहितीमुळे भीमाशंकर अभयारण्याची प्रतिमा मलिन होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असं वकतव्य दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.
पुण्यातील कात्रज-कोंढवा रोडवरील सुखसागरनगर परिसरात एक व्यक्ती १८ वर्षीय तरुणीची छेड काढून तिला जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीला उचलून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव जितू किशोरीलाल सरोज असे असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. शनिवारी सायंकाळी समर्थ डेअरीसमोर मैत्रिणीची वाट पाहत थांबलेल्या तरुणीला आरोपीने अयोग्य ठिकाणी स्पर्श केला. त्यानंतर त्याने तिला थेट उचलून नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
कोकणातील शिवसेनेचे नेते, आमदार आणि मंत्र्यांकडून सुनील तटकरेंविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार करण्यात आली आहे. “सुनील तटकरेंना तुम्हीच आवरा,” अशी नेते आणि मंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना विनवणी.
जळगाव जिल्ह्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख निलेश पाटील यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीमध्ये सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठा बदल होणार असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले की , खर्गेजी ही चांगली गोष्ट झाली की, आवेशात येऊन तुम्ही सार्वजनिक मंचावरून अशी भाषा वापरली, जी सहसा केवळ काँग्रेस पक्षाच्या बंद दारांआडच ऐकायला मिळते. आता देशाला कळून चुकले आहे की काँग्रेस पक्ष नक्की काय आहे.
मोदी-जींच्या दिवंगत वडिलांबद्दल वापरलेली असभ्य भाषा काँग्रेस पक्षाच्या निर्लज्जपणाची पराकाष्ठा दर्शवते.मी पुन्हा सांगतो: पुढची निवडणूकही तुम्हीच हरणार आहात. याचे एक कारण नक्कीच मोदी-जींबद्दल लोकांच्या मनात असलेली आपुलकी हे असेल, परंतु तुमच्या स्वतःच्या द्वेषपूर्ण शब्दांमुळेही तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागेल.
एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. खर्गे यांच्या विरोधात देशभर भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.