Maharashtra Live Politics Update : मराठा समाजासाठी सरकार सदैव उभे : नरेंद्र पाटील

Political Breaking Live Headlines Updates : नवनाथ बन यांचे निलेश राणेंना प्रत्युत्तर, शिवसेना-भाजप वाद आणखी वाढणार, काँग्रेसकडून दिल्लीत मोर्चाची तयारी, इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज बैठक यासह राज्य आणि देशभरातली घडामोडी एकाच क्लिकवर
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

Narendra Patil : चांगले काम केले ते सांगण्यामध्ये आम्ही कमी पडतो

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे शनिवारी परभणी जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मराठा आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, मनोज जरांगे पाटलांच्या या आरोपावर त्यांना प्रश्न विचारला असता याची आपल्याला कल्पना नाही. मात्र मराठा समाजासाठी सरकार सदैव उभे आहे. मात्र जे चांगले काम केलं ते सांगण्यामध्ये आम्ही कमी पडतो, असे आम्हाला वाटते, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

Bjp News : रॅलीत तिरंगा झेंडा घेऊन काँग्रेस विरोधात घोषणाबाजी

नांदेडमध्ये भाजपाच्या वतीने काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. नांदेड शहरातील वर्कशॉप ते महात्मा फुले चौकापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. लोकशाही बचाव, अराजकता हटाव अभियाना अंतर्गत हे आंदोलन करण्यात आले. या रॅलीत तिरंगा झेंडा घेऊन मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीत काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.महात्मा फुले चौक येथे सभा घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला.

तुम्ही पळून जाऊ शकत नाहीत! राहुल गांधींनी जनमहाभियोगातून दिला इशारा; भाजपनं केली सडकून टीका

विरोधकांनी अर्थात इंडिया आघाडीनं नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज प्रति महाभियोग प्रक्रिया राबवली. यावेळी लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांना "तुम्ही पळून जाऊ शकत नाहीत" अशा शब्दांत इशारा दिला. तर भाजपनं विरोधकांच्या या प्रति संसदेवर सडकून टीका केली आहे.

‘नॅफ्स्कॉब’च्या संचालकपदी विद्याधर अनास्कर यांची बिनविरोध निवड

पुणे : देशातील राज्य सहकारी बँकांचे राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या 'नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक्स लिमिटेड' (नॅफ्स्कॉब) या संस्थेच्या संचालक मंडळावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक आणि ज्येष्ठ सहकार व बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे राष्ट्रीय सहकारी बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.

नाशिकमध्ये 6,500 आदिवासी बांधवांच्या हस्ते गोदावरीची महाआरती

नाशिकच्या सिंहस्थ कुभेळ्याचे ध्वजारोहण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थित पडले. या निमित्ताने या सोहळ्यानंतर महाआरतीचा भव्य सोहळा पार पडला. गोदाकाठी तब्बल ६,५०० हजार आदिवासी बांधवांच्या हस्ते गोदावरीची महाआरती करण्यात आली.या आरतीची गिनिज बुक रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.

संभाजीनगरात पावसाची हजेरी! उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा

राज्यात अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पावसामुळे नागरिकांना काहीवेळासाठी दिलासा मिळाला. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर पावसाच्या सरी कोसळल्या. वाढत्या उन्हाच्या झळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला.

ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा 'जनमहाभियोग' कार्यक्रम; दिल्लीत मॉक पार्लमेंट

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीविरोधात आणि त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीने दिल्लीत ‘जनमहाभियोग’ मॉक पार्लमेंट आयोजित केली आहे.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या या आंदोलनात विरोधी पक्षांच्या विविध नेत्यांनी मॉक पार्लमेंटच्या या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. विरोधी पक्षांचे नेते आपापली भूमिका मांडताना दिसणार आहेत. सुरुवातीचे भाषण खरगे यांनी केले यावेळी त्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. देशातील व्होटचोरी थांबली पाहिजे असे यावेळी खरगे म्हणाले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे या मॉक पार्लमेंटचे शेवटचे भाषण करणार आहेत.

बारामतीत पाडव्याचा सोहळा नाही! शरद पवारांचा मोठा निर्णय

यंदा बारामतीत पवार कुटुंबाची दिवाळी साजरी होणार नाही. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीयांनी हा भावनिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा गोविंदबागेतील पाडव्याचा पारंपरिक सोहळाही होणार नसल्याची माहिती आहे.

दिल्लीत 1 नोव्हेंबरला काँग्रेस आणि भाजपचे स्वतंत्र मोर्चे

मतदारयादीतील कथित अनियमितता, SIR प्रक्रिया आणि मतचोरीच्या आरोपांवरून इंडिया आघाडीचा रामलीला मैदानावर महामोर्चा निघणार आहे. तर भाजपही स्वतंत्र मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन करणार आहे.

रत्नागिरीत 72 धरणांमध्ये 75 टक्के पाणीसाठा शिल्लक

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे जलसाठ्यावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील 72 धरणांमध्ये सध्या 75 टक्के पाणीसाठा असून, उन्हाळ्यासाठी पाणी जपून वापरण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे.

विमल इलायची जाहिरातप्रकरणी अजय देवगणची हायकोर्टात धाव

पान मसाला जाहिरातप्रकरणी अजय देवगणने FDAच्या नोटिशीला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. तुकाराम मुंढे यांनी तिघा अभिनेत्यांचे उत्तर मिळाल्याचे सांगितले.

मिरा-भाईंदरमध्ये संगीत विद्यालयाला ब्रेक; त्या जागेवर महापौर निवासाला! भाजपच्या निर्णयावर शिंदेंच्या शिवसेनेचा मंत्री संतापला

मिरा-भाईंदरमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत विद्यालय उभारण्यात येणार आहे. पण आता ते रद्द करण्यात आले असून त्या जागेवर महापौर निवास उभारण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे. यावरून आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, शहरात आधीच महापौर निवास असताना दुसरे निवासस्थान उभारण्याची गरज काय, असा सवाल केला आहे. तसेच आयुक्तांना यात लक्ष घालण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

गोकुळकडून दूध उत्पादकांना ११७ कोटींची दिवाळी भेट

दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट देत गोकुळकडून आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील अंतिम दूध दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये दूध संस्थांच्या खात्यावर जमा केले आहेत. म्हैस आणि गाय दुधाच्या दर फरकासह व्याजाची रक्कमही दिली आहे. जिल्ह्यासह सीमाभागातील आठ हजार दूध संस्थांच्या सुमारे पाच लाख दूध उत्पादक सभासदांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी दिली. गोकुळने १९ ऑक्टोबर रोजी ही रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यांवर जमा केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे नागपूरमधील ३४ नगरसेवक गोत्यात येण्याची भीती

रखडलेल्या स्‍थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत घेण्याचे निर्देश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. या निर्णयामुळे डिसेंबर २०२५ मध्ये नागपूरमधील नगर परिषद आणि पंचायतीमध्ये वाढीव आरक्षणात निवडून आलेले ओबीसी प्रवर्गातील किमान ३४ नगरसेवक गोत्यात येण्याची भीती आहे. ओबीसी आरक्षणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी न्यायालयाच्या निर्देशामुळे फेरनिवडणुकीची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

कुरियर घेऊन आलेल्या टेम्पोमध्ये मोठा स्फोट, लातूर शहरात एक जण जखमी

लातूर शहरात धक्कादायक घटना घडली असून उमाटे कुरियर या ठिकाणी कुरियरचे पार्सल घेऊन आलेल्या टेम्पोमध्ये मोठा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, दहशतवादी विरोधी पथक दाखल झाल आहे.

समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या रस्ता रोको; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर ठाकरे सेनेच्या रस्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, एसओपी प्रमाणे बंदोबस्त लावला आहे. यासाठी यासाठी पाच डीवायएसपी दीडशे पोलीस अधिकारी, दीड हजाराच्या जवळपास कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील ठाकरे सेनेच्या 400 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीसी देण्यात आले आहेत. अशी माहिती वाशिमच्या अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांनी दिली आहे.

'नितेश कराळेंना मिळालेली मते भाजपची नव्हती' : भाजपचे आत्मपरीक्षण

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभवानंतर भाजपकडून आत्मपरीक्षण सुरू करण्यात आले आहे. निवडणुकीत पक्षातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊनही अपयश का आले, याचा सविस्तर आढावा घेतला जात असल्याची माहिती राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. तसेच यावेळी भोयर यांनी, 'नितेश कराळेंना मिळालेली मते भाजपची नव्हती', असेही स्पष्ट विधान केले आहे.

'मायक्रो फायनान्सकडून सक्तीची वसुली झाल्यास शिवसैनिक त्यांचा बंदोबस्त करतील', तानाजी सावंत यांचा इशारा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेनेचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. आमदार तानाजी सावंत यांनी दुष्काळ निवारणासाठी मतदारसंघातील सर्व महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही शिवसैनिकांसह शेतकऱ्यांच्या बांधावर जात असून, त्यांना मदत करत आहोत. राज्य सरकारने दिलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत ही अंतिम नसून, ती केवळ दिवाळीसाठी आहे. तसेच, २०१६ मध्ये बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती टप्पा क्रमांक १ राबवण्यात आला. यामध्ये ५ ते ६ टीएमसी पाणी आपल्या भागात वाढले आणि विहिरींची तसेच बोअरवेलची पाणीपातळी वाढली. यंदाही दुष्काळ असल्याने आम्ही मार्चमध्ये शिवजलक्रांती टप्पा २ राबवणार आहोत. मायक्रो फायनान्सच्या संदर्भातही सक्तीची वसुली केली, तर माझे शिवसैनिक त्याचा बंदोबस्त करतील, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला.

समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

नांदूर मधमेश्वर कालव्यात १०० टक्के पाणीसाठा असूनही पाण्याचे आवर्तन सोडले जात नसल्यामुळे वैजापूर व गंगापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. याविरोधात शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली असून सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रुग्णालयाच्या उद्घाटनावरून दोन्ही शिवसेनेत राजकारण तापलं

नांदेडमधील शासकीय रुग्णालयाच्या उद्घाटनावरून दोन्ही शिवसेनेत राजकारण पेटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अधिकृत उद्घाटन होण्यापूर्वीच ठाकरे शिवसेनेने रुग्णालयाचे उद्घाटन उरकून घेतले. तसेच, पूर्वी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन केलेली कोनशीला हटवण्यात आल्यामुळे ठाकरे सेना कमालीची आक्रमक झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त येथे आगमन

जागतिक दर्जाचा उत्सव असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा आज नाशिकला प्रारंभ होत आहे. पुरोहित संघाच्या ध्वजारोहणाने त्याची सुरुवात होईल. त्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेआगमन झाले. आहे.

Maharashtra News Live Update: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नाशिकच्या ओझर विमानतळावर आगमन

आमदार गायकवाडांना निलंबित करा -विजय वडेट्टीवार

दुष्काळात होरपळणाऱ्या बळीराजाच्या तोंडाला पानं पुसायची, कोरडी सहानुभूती फेकायची आणि त्यांच्या मरणाची उघड्या माथ्याने टिंगल उडवायची, हा सत्ताधाऱ्यांचा निर्लज्जपणा आहे! स्वतःच्या घामाने जगाचं पोट भरणाऱ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात अन्नदात्याच्या मृत्यूची चेष्टा करणाऱ्या सत्ताधारी आमदाराला लाज वाटली पाहिजे. अशा संवेदनाहीन व्यक्तीला आमदार म्हणून पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. सत्तेच्या मस्तीत अंध झालेल्या आमदार संजय गायकवाडची अगोदर त्यांच्या पक्षाने तातडीने पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे! या सरकारमध्ये शेतकऱ्यांप्रती जराही संवेदना आणि माणुसकी शिल्लक असेल, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी येत्या अधिवेशनात विधानसभेत तात्काळ प्रस्ताव मांडून त्यांचे निलंबन केलेच पाहिजे, असे मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्क केले.

कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर बंद!

नाशिकमध्ये आज राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होत आहे. या सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नेहमी गजबजणाऱ्या मंदिर परिसरात आज शुकशुकाट आहे. दुपारी १२ वाजता महाकुंभाचा ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे.

२५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान जनगणना

देशभरात २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान जनगणना होणार आहे. जनगणना आयुक्तांनी याबाबतची घोषणा केली आहे. निवडणूक आणि हिमवृष्टीग्रस्त राज्यं वगळता अन्य भागात ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

नारायण राणेंचा फोटो शेअर करत नवनाथ बन यांचे निलेश राणेंचा प्रत्युत्तर

नवनाथ बन याची लायकी काय? अशी टीका करणाऱ्या आमदार निलेश राणे यांना नितेश राणे यांनी नारायण राणे यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. या छायाचित्रात बन हे नारायण राणे यांच्या शेजारी बसलेले दिसत आहेत. मात्र, या पोस्टमधील सर्वाधिक लक्षवेधी ठरले ते त्याचे कॅप्शन! ‘ज्युनिअर नवनाथ बन विथ सिनिअर राणे साहेब’ असे लिहित बन यांनी निलेश राणे यांनी वापरलेल्या ज्युनिअर या शब्दालाच आपल्या उत्तराचे माध्यम बनवले.

वाल्मिक कराडचा मुलगा सुशीलवर गुन्हा दाखल

वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर महिलेच्या घरात घुसून बंदुकीने जीवे मारण्याची धमकी देणे, पोक्सो कलम तसेच महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये एकूण 14 कलामांन्वये गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी सुशील कराड, अनिल मुंडे आणि गोपी गंजेवर या तिघांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय

नाशिमध्ये आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

आज सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी धर्मध्वज फडकवल्यानंतर कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. ध्वजारोहण सोहळ्यासाठी रामकुंड परिसरात भव्य मंडप आणि ऐतिहासिक देखाव्यांची सजावट केलीय. राष्ट्रपती, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ८ मंत्र्यांसह अनेक मान्यवर तसच देशभरातील साधू महंतांच्या उपस्थितीत सोहळा पार पडणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.