Maharashtra MLC election : भाजपच्या एका निर्णयाने विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट! पाच जागेंसाठी पुन्हा 'सरप्राईज' नावं, दिल्लीचा पत्ता गुलदस्त्यात!

BJP core committee News : पाच जणांच्या नावाची घोषणा दिल्लीतून करण्यात येणार आहे. मात्र, दिल्लीचा पत्ता गुलदस्त्यात असतानाच भाजपच्या एका निर्णयाने विधान परिषदेत निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील नऊ जागेसाठी 12 मे रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून सुरु आहे. 30 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सध्या जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. महायुतीमधील भाजपच्या वाट्याला सर्वाधिक पाच जागा आल्या आहेत. या पाच जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. राज्यातील कोअर कमिटीची मुंबईत बैठक पार पडली. या मध्ये जवळपास 30 जणांची यादी फायनल करून दिल्ली दरबारी पाठविण्यात आली आहे. त्यामधून पाच जणांच्या नावाची घोषणा दिल्लीतून करण्यात येणार आहे. मात्र, दिल्लीचा पत्ता गुलदस्त्यात असतानाच भाजपच्या एका निर्णयाने विधान परिषदेत निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे.

मुंबईत गेल्या तीन दिवसापासून भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक सुरु आहे. त्यामध्ये प्रत्येक विभागवार बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे पाच जागांसाठी भाजपकडून (BJP) 30 जणांची नावे दिल्लीला पाठविण्यात अली आहेत. मात्र, प्रदेश कमिटीकडून जी नावे दिल्लीला पाठविली त्यापेक्षा वेगळेच नाव दिल्लीहून दिले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोअर कमिटीने दिलेल्या नावांमधूनच पाच नावे येतील याची शाश्वती नाही. मात्र, पाचपैकी तीन नावे ही प्रदेशाने सुचविलेल्यांतून असू शकतील, अशी चर्चा रंगली आहे.

BJP Flag
Maharashtra Live Update: त्र्यंबकेश्वरमध्ये देवदर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक फसवणूक, विश्वस्ताला अटक

भाजपच्या एका निर्णयाने विधान परिषदेत निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहावयास मिळत आहे. येत्या काळात संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना आणि जातीय समीकरणे साधणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याचे भाजपने निश्चित केल्याचे समजते. भाजपच्या या निर्णयामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेल्यांना मोठा धक्का बसणार आहे. जे लोक लोकांमधून निवडून येत नाहीत, त्यांचे मागच्या दाराने राजकीय पुनर्वसन करण्यात येणार नाही, असे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या प्रस्थापित आणि बड्या नेत्यांच्या अपेक्षांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे.

BJP Flag
Maharashtra bypoll trends : कुठे माणुसकी जिंकली, तर कुठे राजकीय ईर्षा! महाराष्ट्रातील 12 वर्षांतील पोटनिवडणुकांचा 'ग्राफ' नेमका काय सांगतो?

दुसरीकडे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी तर एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्याने एक जागा रिक्त झाली होती. त्या जागी भाजपकडून प्रज्ञा सातव यांची उमेदवारी फायनल मानली जात आहे.

दुसरीकडे भाजपने या पाच जागांसाठी संजय केणेकर (Sanjay Kenekar), दादाराव केचे, संदीप जोशी, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, संजय पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, अर्चना पाटील-चाकूरकर, संजय भेंडे अशी जवळपास ३० जणांची नावे दिल्ली दरबारी पाठवण्यात आली आहेत.

BJP Flag
Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी सुनेत्रा पवारांचा 'मास्टरस्ट्रोक'! एका जागेसाठी 'या' नावांची जोरदार चर्चा; राष्ट्रवादीतून कोणाला आमदारकीची लॉटरी?

नव्या नियमामुळे अनेक नेत्यांची अडचण होण्याची शक्यता असल्याने प्रदेश कोअर कमिटीकडून नावे पाठवण्यात आली असली तरी त्यांची धाकधूक वाढली आहे. विशेषता विधानपरिषदेची टर्म संपत असलेल्या संजय केणेकर, दादाराव केचे, संदीप जोशी, रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पैकी किती जणांना संधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 30 एप्रिलला शेवटचा दिवस आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसातच दिल्लीतून उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

BJP Flag
Vidhan Parishd Election : विधान परिषदेसाठी भाजपची जुन्यांनाच लॉटरी की पुन्हा धक्कातंत्र? 14 महिन्यांसाठी आमदारकीची संधी मिळालेल्या 'त्या' तिघांची धाकधूक वाढली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com