Maharashtra Political Live Update : मागण्या मान्य करण्यासाठी जरांगेंची सरकारला 90 दिवसांची मुदत, धोका दिल्यास मुंबईत येण्याचा इशारा

Political Breaking Live Headlines Updates : मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं उपोषण स्थगित केलं आहे, यासह राज्यातील विविव राजकीय घडामोडी जाणून घेऊयात..
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

जरांगे यांनी उपोषण मागे घेतले मात्र नाशिकमध्ये समाज एकजुटीचा निर्धार कायम

मुंबईकडे निघालेले मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण आज मागे घेतले. मात्र या प्रश्नावर शासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय वज्रमूठ करण्यात आली आहे. या संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बुधवारी नाशिक रोडला झाली. यावेळी विविध पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. आरक्षणाच्या प्रश्नावर एकजूट करण्यासाठी जिल्हाभर प्रयत्न केले जाणार आहेत.

कळंबा कारागृहातील तुरुंग अधिकाऱ्यावर कैद्यांचा हल्ला

कळंबा कारागृहातील सहा कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये शिरून दगडाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले

मनोज जरांगे पाटील यांची आज सकाळी सहा वाजता सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी मागण्या मान्य करण्याचे शिष्टमंडळाने आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आहे. ते पुन्हा आंतरवाली सराटीकडे जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com