

शेतकऱ्याच्या शेतात सपाटीकरण करायचं असेल, तर शेतकऱ्यांना माती आणि मुरूम लागणार असेल तर आता कुठलीही रॉयल्टी लागणार नाही, तहसीलदार, तलाठी,पोलीस कुठलीही कारवाई करणार नाही असे आदेश देण्यात आले आहे आणि म्हणून माती सपाटीकरण करण्याकरता कुठून माती आणण्यात आली यासाठी मंजुरीची गरज राहणार नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य प्रवक्ते राम माधव यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. राम माधव यांची पाकिस्तानी गुप्तचर संघटना 'आयएसआय'सोबत श्रीलंकेतील कोलंबो येथे तीन दिवस गुप्त बैठक झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नेमक्या कोणत्या मुद्यांवर ही चर्चा झाली? याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी देशातील जनतेसमोर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
साखरेच्या दराने घेतलेली उसळी ही संशयास्पद असून साखर कारखानदारांनी आम्ही आधीच साखर विकून टाकलेली आहे. आमच्याकडे आता फारशी साखर शिल्लक राहिलेले नाही, असा कांगावा करायला सुरुवात केली आहे. साखरेचे दर वाढवायचे हे दोन महिने आधीच ठरलं होतं. आता केंद्र सरकारने कारखानादारांकडे किती साखर शिल्लक आहे, याची माहिती घ्यावी आणि अचानक छापेमारी करून साखरस्थिती जाणून घेतली पाहिजे, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील केसरेकर दांपत्याच्या हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिकांसोबत भाजपचे आमदारही सहभागी झाले होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबई महापालिकेतील नगरसेविका तथा उपनेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द केले आहे. पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने हा निर्णय दिला आहे. त्यांना तीन महिन्यांचा कालावधी याविरोधात याचिका दाखल करण्यासाठी देण्यात आलेला आहे. या तीन महिन्यांत त्यांना प्रभागातील आरक्षणासाठी आपण पात्र आहोत, हे सिद्ध करून दाखवावं लागणार आहे
दिल्लीत जंतर मंतर आंदोलनावेळी ‘पॅलेट गन’चा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे संसद मार्ग पोलिस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राहुल गांधी यांनी तब्बल ६ तास ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात ‘पॅलेट गन’चा वापरात जखमी झालेले विद्यार्थीही सहभागी झाले होते. अखेर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याची एफआयआर कॉपी राहुल गांधी देण्यात आली. त्यानंतरच त्यांनी मागे आपले आंदोलन मागे घेतले.
जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पॅलेट गनच्या वापरावरून राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाले. पॅलेट गन पीडित साहिल लोहचब याला घेऊन राहुल गांधी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याची राहुल गांधी यांची मागणी मान्य केली आहे. एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे. राहुल गांधी जखमी तरुणासोबत गेल्या साडेपाच तासांपासून पोलीस ठाण्याबाहेर ठाण मांडून बसले आहेत.
जळगावचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताबाई मंदिरात हा भव्य सोहळा पार पडणार आहे. खडसेंच्या अमृतमहोत्सव सोहळ्यासाठी राज्यासह केंद्रातील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं असून, हा सोहळा केवळ अमृतमहोत्सव न राहता सर्वपक्षीय कृतज्ञता सोहळा ठरणार असल्याची माहिती अमृतमहोत्सवी समितीचे स्वागताध्यक्ष तथा माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चांदवड तालुक्यातील वाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता असतानाही एका शिक्षिकेची प्रतिनियुक्ती करण्यात आल्याने पालक आणि विद्यार्थी संतप्त झाले. प्रतिनियुक्ती तातडीने रद्द करावी किंवा त्यांच्या जागी कायमस्वरूपी शिक्षकाची नियुक्ती करावी, या मागणीसाठी पालकांनी शाळेला चक्क कुलूप ठोकून आंदोलन केले. विशेष म्हणजे, तब्बल दोन तास आंदोलन करूनही शिक्षण विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने पालकांचा संताप आणखी वाढला. शाळेला कुलूप असल्याने विद्यार्थ्यांना चक्क रस्त्यावरच वर्ग भरवून शिक्षण घ्यावे लागले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या
राष्ट्रवादी काँग्रेस च्या २ नगरसेवकांचा निधी अडवल्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक
पुणे महापालिकेत राष्ट्रवादी चे नगरसेवक आक्रमक
भाजपच्या मनमानी कारभार असा आरोप करत राष्ट्रवादीचे आंदोलन
पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय... निधी रोखल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झालेत, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडणार असल्याचं नगरसेवकांनी म्हटलंय... यासंदर्भात पुणे महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची तातडीची बैठक पार पडली... राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा निधी शून्य करण्याचा ठराव दोन दिवसांपूर्वी भाजपने बहुमताच्या जोरावर मान्य केला. त्यानंतर आता नगरसेवक सुहास टिंगरे यांच्या प्रभागासाठी असलेले १२ कोटी रुपयांच्या निधीचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याही प्रभागाला शून्य निधी झाला आहे...
जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पॅलेट गनच्या वापरावरून राहुल गांधी चांगलेच आक्रमक झालेयत...पॅलेट गन पीडित साहिल लोहबच याला घेऊन राहुल गांधी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचलेत...हे प्रकरण कुठवर आलं याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधींनी पोलीस ठाणं गाठलं...या प्रकरणात अद्याप पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी जखमी तरुणासोबत गेल्या 4 तासांपासून पोलीस ठाण्याबाहेर ठाण मांडून बसलेयत...
साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय...निकृष्ट पोषण आहाराचा पर्दाफाश करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवरील निलंबन मागे घेण्यात आलंय...अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांच्यावरील निलंबनाची कारवाई अखेर मागे घेण्यात आलीय...चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराचा दर्जा दाखवल्याने निलंबन केलं होतं...मात्र, साम टीव्हीवर ही बातमी दाखवताच निलंबन मागे घेतलंय...
पुण्यात काँग्रेसकडून रोजगार न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या यात्रेत सहभागी झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यासमोर सपकाळ यांच्यासह तरुणांनी आंदोलन सुरू केले आहे.
स्वतःला विद्यार्थ्यांचे कैवारी म्हणवणारे राहुल गांधी, पुण्यात गर्दी जमवण्यासाठी आता २५ हजारांची लाच देत आहेत?, असा गंभीर आरोप भाजपने केला आहे. विद्यार्थ्यांच्या नावावर केवळ राजकीय पोळ्या भाजणाऱ्या राहुल गांधींचा खरा चेहरा आता उघडा पडला आहे. विद्यार्थ्यांच्या लक्षात हा डाव आल्यामुळेच, काँग्रेसला आता पैशांच्या जोरावर 'Paid PR' ची नौटंकी करावी लागत आहे, असे भाजपने सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
खासदार सुप्रिया सुळे या निलंबनाची नोटीस बजावण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकेच्या बाजूने उभ्या राहिल्या आहेत. सत्याचा आवाज दाबू नका, असे आवाहन त्यांनी प्रशासनाला केले आहे. सरकारकडून मिळणारा वाटाणा शिजत नसल्याचा व्हिडिओ केल्याप्रकरणी सेविकेला नोटीस बजावण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत शुक्रवारी काळ्या जॅकेटवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं. शिवसेनेचे नगरसेवक काळे जॅकेट परिधान करून महासभेत दाखल झाल्याने विरोधकांकडून हंगामा करण्यात आला. शिवसेना नगरसेवकांच्या काळ्या जॅकेटवर आक्षेप घेत महापौर सुजाता पाटील यांनी सर्व शिवसैनिकांना काळे जॅकेट काढण्याचं आवाहन केलं. मात्र, महापौरांच्या आवाहनानंतरही नगरसेवकांनी जॅकेट काढण्यास नकार दिला. यानंतर सभागृहातील परिस्थिती पाहता महापौर सुजाता पाटील यांनी काही काळासाठी महासभा तहकूब केली
धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाविरोधात धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस आक्रमक झाली असून, काँग्रेस कार्यकर्त्यांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धुळे-सोलापूर मार्गावरील तामलवाडी टोलनाका परिसरातील दुकाने हटवण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी त्यांनी दोन दिवसांपूर्वी बैठकही घेतली होती. सरनाईक यांचा हा निर्णय दुकानदारांवर अन्याय करणारा असून, हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
सांगलीत शक्तिपीठ विरोधी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सांगलीच्या विश्रामबाग क्रांतिसिंह नाना उद्यानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जात आहे. या मोर्चासाठी सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यासह राज्यातील अनेक बाधित शेतकरी या शक्तिपीठ महामार्ग विरोधी मोर्चा मध्ये सहभागी झाले आहेत. महामार्ग विरोधी समितीचा भव्य मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चात राज्याचे माजी मंत्री आ. जयंत पाटील, खा. विशाल पाटील, आ. विश्वजीत कदम, मा. खा. राजु शेट्टी, कॉ. धनाजी गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चाला सुरुवात झाली आहे.
मंत्री उदय सामंत हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दौऱ्यापूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख रुपेश कुथे यांच्यावर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला चढविला होता. या हल्ल्यानंतर युवा सेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी हल्ला करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. युवा सेनेचे गोंदिया जिल्हाप्रमुख ऋषभ मिश्रा, युवा सेनेचे शहर प्रमुख आशु मक्कड, गोंदिया जिल्हा युवा सेना उपाध्यक्ष राजा खान या तिघांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
जालन्यात बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, तसेच आदिवासी समाजाच्या सर्व सवलती तात्काळ लागू कराव्यात, यासह विविध मागण्यांसाठी बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बंजारा समाजाचे आंदोलक एकनाथ चव्हाण गेल्या ८ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. मात्र, प्रशासन आणि सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत बंजारा समाजाचे आंदोलक आक्रमक झाले आहेत.
राज्यामध्ये सगळ्या गोष्टींचे केंद्रीकरण सुरू आहे. विकेंद्रीकरण होत नाही. महापालिकेने कोणता दिवा घ्यायचा, हे महापालिका ठरवू शकत नाही. या राज्यात महापालिकेचे दिवेसुद्धा राज्य शासन खरेदी करून देणार आहे. शहरांमध्ये अंधार पडला की, मुंबईकडे बघायचे आणि उजेड कधी पडणार, अशी अवस्था झाली आहे. राज्यात पाचशे रुपयांचा बल्ब खरेदी करण्याचा अधिकारसुद्धा महापालिकेला नाही, असा टोला लगावत डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने १,५५० दिवे महापालिकेला वाटप करत आहोत, असं काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी जाहीर केले.
माजी आमदार वैभव नाईक यांनी निलेश राणे यांच्या ट्विटवरून त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. सत्ता गेल्यानंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्यांनी आपल्याला निष्ठा शिकवू नये, असा टोला वैभव नाईक यांनी लगावला.
दिवाळीपर्यंत पुरेल इतका साखरेचा साठा यंदाच्या हंगामातील आहे. आणि पुढील उत्पादन देखील देशाला पुरेल इतकं असताना अचानक दर कसे काय वाढले असा प्रश्न माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे उद्या पुण्यात येणार आहेत. त्यांचा छात्रो की गुंज कार्यक्रम आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील बॅनर सर्वांचं लक्ष आकर्षून घेत आहे. राहुल गांधी यांच्या छात्र की गुंज या कार्यक्रमात राहुल गांधी मुलींची संवाद साधणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बँनरवर राहुल गांधी यांचा भावी पंतप्रधान असा उल्लेख करण्यात आला आहे.
ठाणे आणि मिरा भाईंदरला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो १० मार्गिकेच्या कामाला राज्य सरकारने मान्यता दिली. त्यानुसार आता ही संपूर्ण ९.६७६ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उन्नत स्वरूपात उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ८,५३५ कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य सरकारने मंजुरी दिली.
नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीवेळी याचिका सुनावणीच्या अनुक्रमांकापर्यंत पोहोचू शकली नव्हती
भंडारा येथील काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी, जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या असता तिथेही अस्वच्छता आणि निकृष्ट दर्जाचा मध्यान्ह भोजनाचा आहार विद्यार्थ्यांना दिला जात असल्याचा प्रकार उघडकीस आणला. हा आहार शिजवण्यासाठी जे मसालायुक्त किंवा अन्य साहित्याचा जो पुरवठा करण्यात आला आहे, ते कालबाह्य झालेली आढळली. या साहित्याची मध्यान्ह भोजन शिजवण्यासाठी वापर होत असल्याचा संतापजनक प्रकार खासदार पडोळे यांनी उघडकीस आणला. अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य शाळेच्या किचन रूममध्ये आढळून आल्याने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, निकृष्ट दर्जाचे भोजन साहित्य पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी खासदर प्रशांत पडोळे यांनी केली आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापक समितीची 2026-31 या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यमान संचालक मंडळाची मुदत 21 नोव्हेंबरला संपणार असून, जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागवले आहेत. त्यासाठी 2 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. सलग 10 वर्षे संचालक राहिलेल्या व्यक्तींना पुन्हा संचालक होता येणार नाही, असा रिझर्व्ह बँकेचा नियम होता. मात्र, इतर जिल्हा बँकांच्या निवडणुकांमध्ये या नियम लागू झाला नाही.
आंबेगावमध्ये अंगणवाडीतील लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणाऱ्या अंगणवाडी सेविकेवरच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. देवयानी पारधी यांनी पोषण आहाराच्या कच्च्या मालाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला होता.
अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील अपघात आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी बेकायदा ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक अतिक्रमणांवर धडक कारवाईची तयारी सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून महामार्गालगतच्या अतिक्रमणांचे सर्वेक्षण व माहिती संकलन सुरू करण्यात आले आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली-जतच्या विकासाबाबत केलेल्या घोषणांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार राष्ट्रवादीचे नेते तमनगौडा रवी पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर याच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या नेत्यानेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केल्याने खळबळ उडाली आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचं अबकडनुसार उपवर्गीकरण करावे, या मागणीसाठी धाराशिवमध्ये मातंग समाज रस्त्यावर उतरत शहरातून मोर्चा काढला. गेली अनेक वर्षांपासूनची आमची मागणी असून लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी मान्य करून वर्गीकरण करावे. अन्यथा मुंबई बंद करण्याची तयारी आम्ही करतोय, याची तारीख देखील लवकरच जाहीर करणार, असा थेट इशारा धाराशिवमधील मोर्चातून आमदार अमित गोरखे यांनी दिला आहे. त्यामुळे उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाज देखील मुंबईत धडकणार असल्याचे गोरखे यांनी सांगितले.
आमदार, खासदार, मंत्री आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची मुले खासगी शाळांमध्ये अद्ययावत शैक्षणिक सुविधा घेत असताना गोरगरिबांची मुले मात्र जिल्हा परिषद शाळांमध्ये मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत. शाळेत पिण्याचे पाणी नाही, बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही, छत गळके, खिडक्या तुटलेल्या, स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि मध्यान्ह भोजनाच्या दर्जाबाबतही तक्रारी आहेत. त्यामुळे ‘मंत्र्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिकू द्या; मग गोरगरिबांच्या मुलांची परिस्थिती कळेल’, अशी टीका कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केली.
सीएसएमटी येथील मोटरमन लॉबीतील कॅन्टीनमध्ये दररोज सुमारे 500 मोटरमन आणि गार्ड नाश्ता-जेवण करतात. या कर्मचाऱ्यांसाठी तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांत मानवी सेवनासाठी नाही, असे नमूद असलेले तूप वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार मध्य रेल्वेच्या तपासणीत उघडकीस आले. देवपूजा, दिवे आणि हवनासाठी वापरण्याच्या सूचना असलेले हे उत्पादन खाद्यपदार्थांत वापरल्याचे आढळल्यानंतर रेल्वेने संबंधित ‘साई कॅटरर्स’चे कॅन्टीन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे दर प्रतिकिलोला 75 रुपयांवर गेल्यामुळे केंद्र सरकारने साठेबाजीसंबंधीचे नियम अधिक कठोर केले आहेत. कच्चा माल म्हणून साखरेचा वापर करण्यासह इतर सर्व कामांसाठी घाऊक व्यापारी आणि साठाकर्त्यांना दहा मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर पंधरा दिवसांपेक्षा अधिककाळ स्वत:कडे ठेवता येणार नाही. यापूर्वी ही मर्यादा एक महिना इतकी होती. साखर साठ्याच्या बाबतचा हा निर्णय 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू असेल.
जंतरमंतर येथे 20 जुलैला झालेल्या आंदोलनादरम्यान छर्रे किंवा गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तींची माहिती देण्यास दिल्लीतील ‘एम्स’ने नकार दिल्याची तक्रार माजी राज्यसभा खासदार साकेत गोखले यांनी केली. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवलेली ही माहिती वैयक्तिक गोपनीयतेचे कारण देऊन नाकारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.