Mahapalika Election : महापालिका निवडणुकीबाबत मोठी अपडेट; आयोगाकडून 6 दिवसांतच उमेदवारांच्या शपथपत्रात महत्वाचा बदल...

Maharashtra municipal elections : उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत शपथपत्राचे नमुने सुधारीत करुन उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश निवडणूक आयोगाने सर्व महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
Local Body Elections
Local Body Electionssarkarnama
Published on
Updated on

Election rules update : राज्य निवडणूक आयोगाकडून 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. आयोगाने 12 डिसेंबरला उमेदवारी अर्ज व शपथपत्राचा नमुना प्रसिध्द केला होता. त्यानंतर सहा दिवसांतच त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

आयोगाकडून सर्व महापालिका आयक्तांना आदेश जारी करण्यात आले असून सुधारित बदलानुसारच उमेदवारांना उमेदवारी अर्ज उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. आयोगाच्या या आदेशामध्ये म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाच्या दि. २६ सप्टेंबर, २०२३ च्या आदेशान्वये अनधिकृत बांधकाम केल्याचे सिध्द झाल्यास उमेदवार अनर्ह ठरु शकतो.

याअनुषंगाने दि. १३ ऑगस्ट, २०१८ च्या आदेशासोबतच्या शपथपत्रातील मुद्दा क्र. १६.५ मध्ये सुधारणा केली आहे. सदर सुधारणा अंतर्भूत करण्याकरीता राज्य निवडणूक आयोगाने दि. १२ डिसेंबर, २०२५ काढलेल्या आदेशातील मुद्दा क्र.४ मध्ये "यथास्थिती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम १०/मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम १६ मधील तरतुर्दीचे मी वाचन केले असून त्यानुसार मी महानगरपालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी अपात्र नाही." असे नमूद करण्यात आले होते. त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे.

Local Body Elections
Nitin Gadkari News : ...तर लोक म्हणतील बहिणीचे काम केले नाही! गडकरींनी शब्द पाळला, प्रियांका गांधींना खास 'पदार्थ'ही खायला दिला...

सुधारित शपथपत्रात काय असेल?

शपथपत्रात आता "यथास्थिती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम १०/मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम १६ मधील तरतुदींचे मी वाचन केले असून त्यानुसार मी महानगरपालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी अपात्र नाही. मी स्वतः अथवा माझी पत्नी/माझे पती/माझे अवलंबित यांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम १०/१७)/मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम १६ (१८) मधील तरतुदीनुसार जर मी निवडून आल्यावर अनधिकृत बांधकाम केले असल्याचे सिध्द झाल्यास मी नगरसेवक पदावर राहण्यारा अनर्ह उरेन, वाची मला जाणीव आहे.’’ असे नमूद केले जाणार आहे.

Local Body Elections
IAS Swapnil Wankhade : नेत्यांची कामे करणारा तलाठी नको! धडाकेबाज जिल्हाधिकारी वानखडेंनी लोकांसमोरच दिले निलंबनाचे आदेश, होतेय कौतुक

त्यामुळे दि. १२ डिसेंबर, २०२५ घ्या आदेशासोबत जोडलेल्या शपथपत्रातील मुद्दा क्र. १६.५ सुधारीत करुन शेवटचे पृष्ठ या सुधारणेसह राहील. त्यानुसारच उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत शपथपत्राचे नमुने सुधारीत करुन उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश निवडणूक आयोगाने सर्व महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com