Municipal Elections
Municipal ElectionsSarkarnama

Local Body Election : नगपरिषद निवडणूक स्थगितीने उलटफेर : अपात्रतेच्या नव्या कारणाने उमेदवारांच्या पोटात गोळा

Municipal Election : महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुका स्थगित झाल्याने उमेदवारांमध्ये खर्च मर्यादा ओलांडण्याची भीती वाढली आहे. नव्या तारखेसह प्रचार पुन्हा सुरू करावा लागणार असून अपात्रतेची शक्यता अधोरेखित केली जात आहे.
Published on

Municipal Election Postponed : राज्यातील 24 नगराध्यक्षपदाच्या आणि काही नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अचानक घेतलेल्या या निर्णयाने उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मूळ खर्च मर्यादा कायम असताना नव्याने करावा लागणारा प्रचार आणि त्यासाठीचा वाढीव खर्च विजयी उमेदवारांनाही अपात्र ठरवू शकतो, अशी भीती उमेदवारांना सतावत आहे.

मूळ कार्यक्रमानुसार 1 डिसेंबर रोजी प्रचार संपताच 1 डिसेंबरला मतदान होणार होते; मात्र ऐनवेळी मतदान स्थगित करून आता 20 डिसेंबर ही नवी मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली. या अचानक बदलामुळे उमेदवारांना पुन्हा नव्याने प्रचारात उतरावे लागणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून तातडीने स्पष्ट भूमिकेची मागणी केली जात आहे.

नगरसेवकपदासाठी पाच लाख आणि नगराध्यक्षपदासाठी 15 लाख अशी खर्च मर्यादा निश्चित आहे. 1 डिसेंबरपर्यंत झालेला सगळा प्रचार खर्च आयोगाकडे नोंदवला गेलेला असताना, नव्याने वाढणारा खर्च या मर्यादेच्या बाहेर गेला तर तांत्रिक कारणास्तव निवडून आलेल्या उमेदवारालाही अपात्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Municipal Elections
Parli Municipal Election : सरकारच्या सुरक्षेवर भरवसा नाही, मला स्ट्राँग रूमजवळच झोपायचं, अंथरूण-पांघरूण घेऊन येतो; परळीतील उमेदवार पतीच्या मागणीपुढं प्रशासन आवाक

स्पष्ट मार्गदर्शन नाही :

निवडणुकीच्या एक दिवस आधी मतदान रद्द केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आता पुन्हा नव्याने प्रचाराची तयारी करावी लागणार आहे. परवानग्या, खर्च मर्यादेबाबत अधिकाऱ्यांकडून कोणतेही स्पष्ट मार्गदर्शन मिळालेले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार विशाखा मौर्य यांनी म्हटले.

Municipal Elections
Maharashtra local body polls : 'बंड'खोरांच्या वादळात महायुतीची परीक्षा; स्थानिक निवडणुकीत विरोधकांना सुटणार घाम

सूचना नाही :

तर अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी व निवडणूक उपअधिकारी उमाकांत गायकवाड यांनी सांगितले, की निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही. निर्देश मिळताच खर्च मर्यादा व इतर सर्व बाबींची माहिती उमेदवारांना तातडीने दिली जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com