Parli Municipal Election : सरकारच्या सुरक्षेवर भरवसा नाही, मला स्ट्राँग रूमजवळच झोपायचं, अंथरूण-पांघरूण घेऊन येतो; परळीतील उमेदवार पतीच्या मागणीपुढं प्रशासन आवाक

Parli Election NCP Candidate Sandhya Deshmukh husband Deepak Deshmukh Demands to Stay Near EVM : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे परळीमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार पतीने दीपक देशमुख यांनी स्ट्राँग रूममध्ये झोपण्यासाठी बीड प्रशासनाकडे मागणी केली आहे.
Deepak Deshmukh Demands
Deepak Deshmukh DemandsSarkarnama
Published on
Updated on

EVM Strong Room Security : राज्यात पहिल्या टप्प्यात काल नगरपालिकांसाठी मतदान झालं आहे. आता या मतदानांची मोजणी थेट 21 डिसेंबरला होणार आहे. तोपर्यंत या ईव्हीएम मशिन स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या कडेकोड बंदोबस्तात स्ट्राँग रूममध्ये राहणार आहेत. मतमोजणीला तब्बल 16 दिवस जाणार असल्याने अन् ईव्हीएम मशिनमधील मताच्या सुरक्षितेसाठी आता उमेदवारच पुढं सरसावले आहेत.

तशी त्यांना धाकधूक देखील आहे. यातूनच परळी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचे पती दीपक देशमुख यांनी सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवर भरवसा नसून, ईव्हीएम मशिन ठेवलेल्या स्ट्राँग रूमजवळ झोपण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. दीपक देशमुख यांच्या या मागणीपुढं बीड प्रशासन आवाक झालं आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी 21 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे काल झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला तब्बल 16 दिवस जाणार आहेत. तोपर्यंत ईव्हीएममधील (EVM) मत सुरक्षित राहतील का या विचारानं उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

बीडमधील (BEED) परळी नगरपालिकेची निवडणूक चांगलीच गाजली. मतदान झालेल्या ईव्हीएम मशिन आता कडक बंदोबस्तामध्ये स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या गेल्या आहेत. यासाठी बीड प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. परंतु या सुरक्षा यंत्रणेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवाराच्या पतीने दीपक देशमुख यांना भरवसा नाही. लोकांनी आम्हाला केलेली मत सुरक्षित ठेवण्याची आमची देखील जबाबदारी आहे. त्यामुळे मला स्ट्राँग रूमजवळ झोपण्याची परवानगी मिळावी. तशी त्यांनी बीड प्रशासनाकडे देखील मागणी केली आहे.

Deepak Deshmukh Demands
Amol Khatal audio clip : समोर ये, तुला सांगतो, तुला आमदार कळतो का? संतापलेल्या खताळांची ऑडिओ क्लिप व्हायरल

दीपक देशमुख म्हणाले, "आम्हाला इथं अंथरून-पांघरून घेऊन येत, राहण्याची मुभा द्यावी. तशी आमची व्यवस्था देखील करावी. कारण आमचं भविष्य या स्ट्राँग रूममध्ये आहे. स्ट्राँग रूममधील आमचा कोणावरही भरोसा नाही." स्ट्राँग रूमकडे जाण्या-येण्याची आमची व्यवस्था होत नाही. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना मी पत्र देणार, असेही दीपक देशमुख यांनी म्हटले.

Deepak Deshmukh Demands
जीवंतपणी अनाथांचा आधार अन् मृत्यूनंतर देहदान : संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यसाठी वाहून घेणाऱ्या पन्नालाल सुराणा यांचा जीवनप्रवास

'आमची इथंच व्यवस्था करा, 24 तासाची. उमेदवारांसह मी या स्ट्राँग रूमच्या परिसरात थांबणार आहे. मी सकाळी झोपेतून उठून स्ट्राँग रूमकडे आलो आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी करणार आहे. मला इथं कशी व्यवस्था करायची, हे त्यांनी सांगावं मी माझं अंथरूण-पांघरूण घेऊन इथं येऊन बसेल. मला इथेच थांबायचं आहे आणि या स्ट्राँग रूमचं रक्षण करायचा आहे. जाण्या येण्यामुळे दमछाक होत आहे. दुसरीकडे माझे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यांच्यासाठी वीस तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यांचा प्रचारही मला करायचा आहे,' असे दीपक देशमुख यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com