पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते सुनील कांबळे (Sunil Kamabale) यांनी पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ समोर आला. त्यानंतर इतर पक्षातील महिला नेत्यांनी आमदार सुनील कांबळे यांच्या हल्लाबोल केला आहे. 'भाजप (BJP) नगरसेवक आणि आमदार सुनील काबंळे (Sunil Kamabale) यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पुण्यातील सर्व महिला सुनील कांबळे यांच्या घराबाहेर त्यांना शिव्यांची माळ घातल्याशिवाय राहणार नाही,' असा इशारा मनसे नेत्या रुपली ठोंबरे पाटील (Rupali Thombare -patil) यांनी दिला. तसेच, यात राजकारण आणायची गरज नाही, सुधरा रे सुधरा काय भाषा आहे तुमची, लायकी नाही तुमची लोकप्रतिनिधी व्हायची.
पुणे शहरात, विद्येच्या माहेरघरात जे संस्कृतीचा नेहमी टेंभा मिरवतात, अशा भाजपचे नगरसेवक आणि आमदार सुनील कांबळे यांनी महापालिका कर्मचाऱ्याला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. बील काढण्यासाठी फक्त संबंधित महिला कर्मचाऱ्याला ही शिवीगाळ करण्यात आली.कुठे चालाली आहे ही प्रवृत्ती, हे लोकप्रतिनिधी पाहणार आहेत की नाही, याबाबत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ आणि महापौर मुरलीधर मोहोळ काय कारवाई करणार असा सवाल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ समोर आला. त्यानंतर त्यांच्या विरोधात विरोधात इतर पक्षाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कांबळे यांच्या टिका केल्यानंतर आता मनसे नेत्या रुपाली ठोंबरे -पाटील यांनीही आक्रमक भुमिका घेतली आहे.
'एकीकडे महिला सुरक्षिततेचा, सक्षमतेचा नारा देताय, आंदोलने करताय, पण दूसरीकडे हेच लोक प्रतिनिधी जर महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत असतील तर अशा लोक प्रतिनीधींवर काय कारवाई करणार हे तुम्ही आम्हाला सांगितल पाहिजे. अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ आम्ही ऐकला. दुसऱ्याच्या आईला इतकं घाण बोलत असताना तो आमदार, आपल्याही घरात आई, बहिण, पत्नी आहेत हे विसरला का, असा संतप्त सवाल रुपाली ठोंबरे - पाटील यांनी विचारला आहे.
पहा व्हिडीओ-
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.