BJP Political News : बडगुजरांसमोरच सलीम कुत्तावर प्रश्न अन् बावनकुळेंचे उत्तर, महाजनांनीही दिला शब्द, ठाकरेंना चॅलेंज...

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
BJP Political News : बडगुजरांसमोरच सलीम कुत्तावर प्रश्न अन् बावनकुळेंचे उत्तर, महाजनांनीही दिला शब्द, ठाकरेंना चॅलेंज...
Published on
Updated on

Girish Mahajan News : बावनकुळेंना दिला शब्द 

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांना मोठा शब्द दिला. तसेच नाशिक महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी टार्गेटही फिक्स केले. नाशिकसाठी त्यांनी 'अब की बार १०० पार'चा नारा दिला. निवडणुकीमध्ये नगरसेवकांचा तिहेरी आकडा गाठू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याचे सांगत महाजन यांनी नाशिकसह जळगाव, धुळे, नगर अशा सर्व महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये भाजपची एकहाती सत्ता आणू, असा शब्दही बावनकुळे यांना दिला.

Chandrashekhar Bawankule News : टीका करणारेच जेलमध्ये जाऊन आले

 सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांना सलीम कुत्तावरून होत असलेल्या आरोप व टिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बावनकुळे म्हणाले, न्यायालय जोपर्यंत दोषी ठरवत नाही, तोपर्यंत आपण कुणावरही टीका करू नये. अनेक लोकं जेलमध्ये जाऊन आले आहेत. टीका करणारेच जेलमध्ये जाऊन आले आहेत. तेवढ्यावेळ हे जेलमध्ये नव्हते. जोपर्यंत न्यायालय कुठलीही शिक्षा देत नाही, तोपर्यंत कुणीचाही आरोप होऊ शकतो, पण आरोपांवर अंतिम निर्णय न्यायालय करते, असे विधान बावनकुळे यांनी केले आहे.

Sudhakar Budgujar Update : ठाकरेंना चॅलेंज

उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी केलेले नेते सुधाकर बडगुजर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर बोलताना बडगुजर यांनी चॅलेंज दिले. ते म्हणाले, मी खरंच निष्पाप आहे. समाजाची सेवा करतो. पक्षासाठी खूप काम केले. पण अचानक नियतीने घाला घातला आणि माझ्यावर कारवाई केली. ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीत दूध का दूध पानी का पानी होईल.

BJP Political News : बडगुजर यांना बावनकुळेंनी दिला प्रवेश

मागील अनेक दिवसांपासून पक्षप्रवेशाची चर्चा असलेल्या सुधाकर बडगुजर यांनी आज अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे सकाळी त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत माहिती नाही, असे म्हणणारे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बडगुजर भाजपमध्ये दाखल झाले. यावेळी मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. माजी आमदार बबन घोलप यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

Sudhakar Budgujar News : भाजपच्या प्रदेश कार्यालयात दाखल

नाशिकमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात दाखल झाले आहेत. मोठे शक्तीप्रदर्शन करत ते मुंबईत आले आहेत. भाजपचे नेते रविंद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे विधान केले होते. तसेच भाजप आमदार सीमा हिरे यांचाही विरोध कायम होता. त्यामुळे बडगुजर यांचा प्रवेश होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर काही वेळापूर्वीच तो संभ्रम दूर झाला आहे.

Ajit Pawar News : अजित पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठं विधान केले आहे. संधीसाधूपणा करणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही. तसेच भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेणार नाही, असे पवार म्हणाले आहेत. पिंपरी चिंचवडमधील पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही प्रतिक्रिया आली आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असल्याचे अजितदादा म्हणाले आहेत.

Sharad Pawar News : शरद पवारांनी थेट सांगितलं...

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणावर उलटसुलट चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच थेटपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही. संधीसाधू करण्यांसोबत जाऊ शकत नाही, असे विधान शरद पवार यांनी केले आहे. त्यांनी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या मुद्द्यावर पडदा टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com