Maharashtra Breaking News LIVE: पुणे मुंबईसह ठाण्याला आज पावसाचा ऑरेंजअलर्ट

Marathi Breaking Live Headlines Updates : राज्यातील राजकीय घडामोडीसह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Sarkarnama breaking news
Sarkarnama breaking newssarkarnama

Mumbai Rain:मुंबईच्या पश्चिम उपनगरात पुन्हा जोरदार पाऊस सुरु

मुंबईच्या पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून पश्चिम उपनगरात रिप रिप पाऊस सुरूच आहे. आता जोर वाढला आहे. मात्र मागील 20 मिनिटांपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये पावसाचे पाणी रस्त्यावर साचले

सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे. पहिल्या पावसा पासून आजही हि परिस्थिती कायम आहे. रस्त्यावर साचलेल्या या पाण्यामधुन मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. महामार्गावर साचत असलेल्या या पाण्याकडे आणि येथे निर्माण होणाऱ्या परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

मुंबई शहरासह उपनगरांत पावसाची रिपरिप सुरुच आहे. रात्रभर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. नवी मुंबई, ठाण्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे मुंबईसह ठाण्याला आज पावसाचा ऑरेंजअलर्ट देण्यात आला आहे..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com