Maharashtra Political Live Update: 'राज्याची बदनामी तुमच्या भ्रष्टाचारानं केली...'; काँग्रेसच्या नाना पटोलेंची फडणवीसांवर टीका

Marathi Breaking Live Headlines Updates : पुण्यात आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा मुक्काम आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहेत, यासह आजच्या दिवसभरातील विविध राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

'राज्याची बदनामी तुमच्या भ्रष्टाचारानं केली...'; काँग्रेसच्या नाना पटोलेंची फडणवीसांवर टीका

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, मिसिंग लिंकसंदर्भात आज पण सांगितलं आहे की, निसर्गाने पाप उघडं केलं आहे. 540 कोटी प्रति किमी खर्च केले आहेत. इतका खर्च केला तर मिसिंग लिंक प्रोजेक्ट फुलप्रुफ असला पाहिजे ना. पण राज्याची बदनामी तुमच्या भ्रष्टाचारानं केल्याची जळजळीत टीका पटोलेंनी केली आहे.. 

महिला डॉक्टरला मारहाण प्रकरण, शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अडचणीत वाढ

कल्याण डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टरला मारहाण केल्याच्या प्रकरणात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोर्टानं या प्रकरणात रमेश म्हात्रे आणि इतर तीन आरोपींना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेकडून ज्येष्ठ नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांच्याकडे नवी जबाबदारी 

बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी ज्येष्ठ नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांच्याकडे बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दामले यांना विश्वस्तपदावर नियुक्ती केल्याचं पत्र दिलं आहे. या नव्या जबाबदारीमुळे दामले हे आता मुंबई महापालिकेच्या कला विषयक कारभारात सहभागी असणार आहे.

high court News : चेक बाऊन्स प्रकरणात हायकोर्टाचा मोठा दणका

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी न्यायालयाने या प्रकरणातील त्याची शिक्षा कायम ठेवत त्याला दोषी ठरवले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना राजपाल यादवला पुन्हा तुरुंगात पाठवण्याचे निर्देशही दिले आहेत. न्यायालयाने त्यांच्या वर्तनावरही ताशेरे ओढत ते 'संशयास्पद' असल्याचे निरीक्षण नोंदवले.

asembly session : पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. जवळपास तीन आठवडे हे अधिवेशन चालले. या अधिवेशनाची सांगता होताच पुढील हिवाळी अधिवेशन कधी होणार याची घोषणा करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागूपरमध्ये होणार आहे.

पाकिस्तानी गँगस्टरसोबत लिंक!  दहा तरुणांना नागपूर ATS नं घेतलं ताब्यात 

पाकिस्तानी गँगस्टर शहाबाज भट्टीसोबत दहा तरुणांना नागपूर ATS नं ताब्यात घेतलं आहे. यात नागपूर शहरातून पाच आणि उर्वरित तरुण विदर्भातील काही जिल्ह्यांमधून आहेत. त्यांना एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणावरून कारवाईत ताब्यात घेण्यात आली आहे. शहबाज भट्टीसोबत सोशल मीडियावरून हे तरुण संपर्कात असल्याची माहिती मिळते आहे. ते भट्टीसाठी कसल्या प्रकारचे काम करणार होते, त्यांना पुढील टास्क काय देण्यात आले होते आणि त्यांना कसा मोबदला मिळणार होता याची माहिती घेणे सुरू आहे.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका

मिसिंग लिंकच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला फडणवीसांनी आज विधानसभेत प्रत्युत्तर दिले. माझ्या भाषणामुळे काहींना मिरची लागली. मिमिर्की आर्टिस्ट म्हणाले मी हिंदीत बोललो. मी काही सुपारीबाजांविषयी बोललो, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

Kokan news : कोकणात तटकरेंकडून शिवसेनेला धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कोकणात शिवसेनेला धक्का दिला. रोह्याचे माजी तालुकाप्रमुख मनोजकुमार शिंदे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिंदे हे मंत्री भरत गोगावले यांचे विश्वासू सहकारी मानली जात होते.

Eknath Shinde : बाळासाहेबांना एकटं सोडून फाईव्हस्टार हॉटेलमध्ये कोण गेलं?

विधानपरिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. पावसात काही राजकीय बेडकं डराव डराव करत होते. पावसात झालेल्या दुर्घटना वेदना देणाऱ्या आहेत. विरोधकांनी त्याचे राजकारण केले, अशी टीका शिंदेंनी केली. बाळासाहेबांना एकटं सोडून फाईव्हस्टार हॉटेलमध्ये कोण गेलं?, असा सवाल करत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

Pune news : वारकऱ्यांचे पैसे, मोबाईल चोरीला

पुण्यात चोरट्यांनी वारकऱ्यांचे मोबाईल आणि पैसे लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका वारकऱ्याच्या अंगावर खाजेची पावडर टाकून पाच हजार चोरून नेले. तर एका महिला वारऱ्याचा मोबाईल चोरीला गेला.

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना आणखी प्रतीक्षा; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांंची माहिती

शेतकरी कर्जमाफीबाबतची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून त्याला आणखी वेळ लागू शकतो. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत माहिती दिली. सरकारकडून आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागविण्यात आली असून, पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भिवंडीत घराचा स्लॅब कोसळला

अन्सार मोहल्ला परिसरातील एका घराचा स्लॅब अचानक कोसळल्याने खळबळ उडाली. या दुर्घटनेत एक मुलगी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बचाव पथकाने तत्काळ मदतकार्य करत घरातील 3 ते 4 जणांना सुरक्षित बाहेर काढले.

महाराष्ट्र प्रशासनात मोठा फेरबदल; 8 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य सरकारने प्रशासनातील कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी ८ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध विभागांमध्ये नव्या नियुक्त्या करण्यात आल्या असून विकास योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर नितीन गडकरींचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्याजवळ दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर तीन तरुण अचानक आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी ताफा थांबवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली असून, वेगवान वाहतुकीमुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला.

नोटीसशिवाय शिक्षकांची मान्यता रद्द करता येणार नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत शिक्षकांची मान्यता रद्द करण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच भरती प्रक्रियेदरम्यान जाहिरातीतील अटी बदलून करण्यात आलेल्या नियुक्त्या वैध नसल्याचे नमूद केले. 2018 पासून प्रलंबित असलेल्या 11 याचिकांवरील या निर्णयामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मिथेन,क्लोरीन वायूमुळे मोशी कचरा दुर्घटनेच्या बचावकार्यात अडथळे

मोशी कचरा डेपो दुर्घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरु आहे. या कामात कचऱ्याचा प्रचंड ढिगारा, पाऊस आणि मलब्याखाली निर्माण झालेल्या मिथेन आणि क्लोरीन वायूमुळे मोठे अडथळे येत आहेत. आज कचऱ्याच्या दुसऱ्या बाजूने मार्ग मोकळा करून दुर्घटनाग्रस्त इमारतीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा यंदा उडणारच नाही?

ग्रामीण भागातील राजकारणातील महत्त्वाची आणि गावगाड्याचा कारभारी ठरवण्याची निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. प्रभाग आरक्षण जाहीर झालं खरं, पण एका कारणामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूक थेट पुढच्या वर्षावर जाण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदारयादी पडताळणीच्या 'एसआयआर' (विशेष सखोल पुनरीक्षण) प्रक्रियेमुळे हा मोठा पेच निर्माण झाला असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. त्यामुळे आता थेट नव्या वर्षातच (२०२७) निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अपहरण झालेल्या तीन वर्षीय मुलीची तीन महिन्यांनी सुटका

तीन महिन्यांपूर्वी वाशिम शहरातून अपहरण झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीची वाशिम पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. आरोपी राम लांडकर याला अटक करण्यात आली आहे

रमेश म्हात्रे यांना आज कोर्टात हजर करणार

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज कल्याण कोर्टात हजर करणार येणार आहे.

मोशी दुर्घटनास्थळी प्रकाश आंबेडकरांची पाहणी

मोशी दूर्घटना स्थळी वंचित विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पाहणी केली. मृत व्यक्तीच्या नातेवाईंकाशी संवाद साधला.

एफडीएची बुलढाण्यात कारवाई, गुटक्याची वाहतूक करणार ट्रक पकडला

बुलढाणा अन्न व औषध प्रशासनाने मध्यप्रदेशातून बुलढाणा जिल्ह्यात येणारा प्रतिबंधित गुटक्याचा ट्रक मोठ्या सीताफिने पकडला. गुटका माफियांच्या विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईने मध्य प्रदेशातून गुटख्याची तस्करी करणाऱ्या घटका तस्करांचे धाबे दणाणले.

मोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या कठीण प्रसंगी प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून इमारतीत अडकलेल्या व्यक्तींना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी यंत्रणांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. बचावकार्य पूर्ण होईपर्यंत धीर धरा, यामध्ये निश्चितपणे अडकलेल्या व्यक्ती सुखरुपपणे बाहेर येतील असा दिलासा देखील नातेवाईकांना त्यांनी दिला.

शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीची प्रसूती

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. मोहनदरी येथील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिला आहे.पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या अत्याचारामुळे ही विद्यार्थिनी गरोदर राहिली होती. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली.

आम्ही महाविकास आघाडीसोबतच - जयंत पाटील

शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चांबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, एनडीएसोबत जाण्याच्या चर्चा आहेत त्याबाबत मी ऐकलेले नाही. आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली म्हणजे ते राममंदिरातील दानचोरीवर भूमिका घेतली, सर्वच पक्ष दानचोरीवर बोलतायेत, असे देखील त्यांनी सांगितले.

तुळजाभवानी देवस्थानच्या इनामी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी समितीची स्थापना

तुळजाभवानी देवस्थानच्या इनामी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समीतीची स्थापना करण्यात आली आहे. समितीला 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. चौकशी समितीच्या अध्यक्षपदीपदी अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांची नियुक्ती तर उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख व शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांचा समितीमध्ये समावेश आहे.

भाजप नगरसेवकाची गुंडगिरी, मुख्याधिकाऱ्याला मारहाण

रायगड जिल्ह्यातील महाडमध्येही एका सत्ताधारी नगरसेवकानं थेट मुख्याधिकाऱ्यालाच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी थेट पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर सर्व कर्मचारी आक्रमक झाले होते. नगरसेवकाला अटकेची मागणी करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com