

सिल्लोड तालुक्यातील एका शाळेतील विद्यार्थिनींनी त्यांच्या शिक्षिकेची बदली रद्द करण्यासाठी थेट आमदारांनाच साकडं घातल्याचं दिसून आलं. शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनता दरबारात शिक्षिका सी. पी. शिरसाट यांची बदली रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी सत्तारांकडे केली. यावर विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेत आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचं समोर येत आहे.
माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या आमदार निवासातील रूममध्ये करण्यात आलेल्या पीओपी कोसळल्याचं धक्कादायक प्रकार समोर येत आहे. ही घटना घडल्यावेळी मोठी दुर्घटना टळली असली तरी नुकसान झालं आहे. मात्र, पीओपी कोसळण्याच्या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धती चर्चेत आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाची वाशिम-नालासोपारा ही एसटी बस वैजापूरच्या वाटेवर असताना गारज याठिकाणी बसप्रवाशांनी थांबवली. यावेळी प्रवाशांकडून एसटी चालकावर मद्यधुंद अवस्थेत बस चालवण्याचा गंभीर आरोप करण्यात आला. तसेच हा प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा प्रकार असल्याची टीका केली. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
कुंभमेळ्यातील कामे मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट वर्क ऑर्डर देऊन फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी जामनेरमधील दोघांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून, आणखी पाच ते सात जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी राज ठाकरेंच्या उपस्थितीत शहर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता पुण्यातील पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बीड : बीडच्या इमामपूर रोड परिसरात रात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेवेळी सुमारे ३० ते ३५ जणांची टोळी उपस्थित होती. याच वादातून वाल्मिक कराड समर्थक सफान खान याने चार राऊंड फायर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुणे : महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठरणाऱ्या निर्णयात राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला पाच हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवली कर्ज मंजूर केले आहे. एनसीडीसीकडून एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर होणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील पहिली सहकारी बँक ठरली आहे. या निधीचा वापर बँकेच्या सभासद सहकारी संस्थांना पुढील कर्जपुरवठा करण्यासाठी करण्यात येणार आहे.
विरार : आचोळे येथील नियोजित डम्पिंग ग्राउंड मध्ये बांधलेल्या अनधिकृत 246 इमारतींबाबत पाठवलेल्या एमआरटीपी नोटीशि बाबत महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा अर्ज करूनही दीर्घकाळ माहिती न दिल्याप्रकरणी राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठाने वसई-विरार शहर महानगरपालिकेला चांगलेच धारेवर धरले आहे. आरटीआय अर्जदार अजय किशोरलाल शर्मा यांना माहिती मिळविण्यास झालेल्या त्रासाची भरपाई म्हणून महापालिकेने ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश आयोगाने दिला आहे. तसेच माहिती देण्यात कसूर केल्याप्रकरणी दोन तत्कालीन जनमाहिती अधिकाऱ्यांवर प्रत्येकी २५ हजार रुपये शास्ती लादण्यात आली आहे.
विधिमंडळ पक्षाचा एक गट फुटतो, स्वतःला स्वतंत्र पक्ष म्हणवून घेतो आणि निवडणूक आयोगाकडे जातो. असेच सुरू राहिले तर ही परिस्थिती वादळाप्रमाणे होईल. विधिमंडळ पक्ष एखाद्या सत्ताधारी पक्षाला विकला जातो, त्याच व्यक्तीला मुख्यमंत्री बनविले जाते. या घटनेला आपण जिवंत लोकशाही म्हणू शकत नाही. असेच घडत राहिले तर कोणतेही सरकार पाडता येईल, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला. दरम्यान, आजची सुनावणी संपली असून गुरूवारीही सिब्बल युक्तिवाद करणार आहेत.
मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंकडे लोकांचा ओढा वाढला. त्याआधारेच ते आपला पक्ष मोठा असल्याचा दावा करत असल्याचे कपिल सिब्बल यांनी कोर्टात नमूद केले.
निवडणूक आयोगाचा आधीच निर्णय झाला होता. काही तथ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून निर्णय घेण्यात आला. आयोगाला एका विशिष्ट निष्कर्षाप्रत पोहोचायचे होते, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला.
शिवसेना पक्षातील नियुक्त्या आणि निवडींची माहिती निवडणूक आयोगाला वेळोवेळी दिली. कायद्यानुसार आवश्यक सर्व बाबींची पुर्तता केली. पण आयोगाने त्या कागदपत्रांची दखलच घेतली नाही. कागदपत्रे न बघताच आयोगाने घटना एकाधिकारशाही असलेली ठरविल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला.
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष-चिन्हावर सुनावणी सुरू झाली आहे. आजही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठने विधिज्ञ कपिल सिब्बल युक्तीवाद करत आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकारांबाबत ते युक्तीवाद करत आहेत.
लोकसभेत बुधवारी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी वादग्रस्त 'FCRA' विधेयक सादर केले. हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. मात्र, विरोधकांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला. या गोंधळातच हा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
गडचिरोली येथे अनुदानित आश्रमशाळेत अतिशय दुर्दैवी आणि गंभीर घटना घडली. तीन मुलींचा मृत्यू झाला असून, तीन मुलींवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी नागपूर मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या मुलीची भेट घेणार असून, त्यानंतर गडचिरोली येथे शाळेला भेट देणार आहे. १९९२ पासून अनुदानित आश्रमशाळा सुरू असताना आतापर्यंत मुलींसाठी झोपण्याच्या बेडची व्यवस्था नसणे, ही चिंतेची बाब आहे. याबाबत चिंता आणि चिंतन करण्याची गरज आहे. गडचिरोलीचे खासदार आणि राज्यमंत्री पदभार स्वीकारलेल्या आश्रमशाळेच्या संचालकांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता, असं अशोक उईके यांनी म्हटलं आहे.
नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि अपघातांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून, खड्ड्यांमुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याचा दावा शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आदित्य ठाकरे १३ ऑगस्ट रोजी नाशिक दौऱ्यावर येणार असून, ते शहरातील खड्ड्यांची पाहणी करणार आहेत. तसेच १७ ऑगस्ट रोजी संजय राऊत यांच्या आदेशाने नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. शालिमार येथून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होऊन महापालिकेवर धडक देण्यात येणार असल्याचे केशव पोरजे यांनी सांगितले.
मुंबईतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी गेल्या तीन वर्षांत तब्बल 839 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, एवढा मोठा निधी खर्च होऊनही शहरातील खड्ड्यांची समस्या कायम आहे. महापालिकेकडे 3,500 हून अधिक खड्ड्यांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, मुंबईकर खड्डेमुक्त रस्त्यांची प्रतीक्षा करत आहेत.
“संजय राऊत हे फेकूचंद आहेत. त्यांनी आजपर्यंत किती गौप्यस्फोट केले आहेत. मी त्यांना नेहमी उत्तर देतो, त्यामुळे त्यांचा माझ्यावर राग आहे. त्यांचा राग मी समजू शकतो. त्यांना तिकीट जाहीर करत नव्हते, तेव्हा रश्मी वहिनींबाबत राऊत किती शिव्या घालत होते, हे सगळ्या शिवसेनेला माहीत आहे भावाला मंत्री केले नाही, माझे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पारदर्शकपणे घ्या, असे म्हणत कोण पवईच्या हॉटेलमागे बैठक घेऊन कुभांड रचत होते, हे मी पाहिले आहे. मी जिल्हाप्रमुख होतो आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिलो.”, अशी टीका खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर केली.
- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बदनामीप्रकरणी कारवाईची मागणी.
- भाजप नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन.
- त्रिशूल पाटील आणि मनोज जरांगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
- सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील, आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप.
- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा निवेदनात दावा.
- आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्सची तपासणी करण्याची मागणी.
- संबंधितांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी.
- सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ हटविण्याचीही मागणी.
- अशा वक्तव्यांमुळे सामाजिक वातावरण दूषित होण्याची शक्यता असल्याचा निवेदनात उल्लेख.
गोकुळ दूध संघातील अवसायानातील सर्व संस्थांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. कोल्हापूर सर्किट बेंचने हा निकाल दिला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आवसायानतील 1320 संस्थांविरोधात अदृश्य शक्तीसह भाजप नेत्यांचा सुरु होता लढा.
-डॉ. अमोल कोल्हे यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आग्रही मागणी
-पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे जुन्याच मार्गाने व्हावी
-चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर आणि सिन्नर मार्गेच रेल्वे करण्याची डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी
-पुणे-नाशिक रेल्वेसाठी झालेल्या जनआंदोलनाची डॉ. अमोल कोल्हे यांनी रेल्वेमंत्र्यांना दिली माहिती
-पुणे-नाशिक रेल्वेचा प्रकल्प जुन्याच मार्गावर राबवण्याची डॉ. अमोल कोल्हे यांची आग्रही मागणी
-चाकण विमानतळाच्या प्रस्तावित जागेवर पीएम गतिशक्ती योजनेंतर्गत टर्मिनल उभारण्याची डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी
'धनुष्यबाण पेलण्याची ताकद एकट्या एकनाथ शिंदेंसाहेबांकडे आहे. कोर्टालाही हे माहिती आहे की, यांच्याशिवाय कोणी पेलू शकत नाही. शेवटी कोर्ट देखील शिंदेसाहेबांच्या बाजुने निकाल देईल.'
ANC: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बायोगॅस प्रकल्पातून निर्माण होणारा ‘लिक्विड फर्मेंटेड ऑर्गेनिक मॅन्युअर’ म्हणजेच लिक्विड सेंद्रिय खत पाबळ खोऱ्यातील शेतजमिनीत टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेने केला आहे. या वेस्टमुळे शेती, पशुधन तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा करत हा प्रकार तातडीने थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. शिंदे शिवसेनेचे रायगड जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी पाबळ खोऱ्यात पाहणी केली. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून त्यांच्या प्रकल्पाच्या क्षेत्रात वेस्टची विल्हेवाट न लावता तो एका शेतकऱ्याच्या शेतात टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील आठवड्यात नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नांवर आढावा बैठक घेणार आहेत. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी या विषयावर नाराजी व्यक्त केली होती. कुंभमेळा मंत्र्यांसह महापौर देखील रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. आता महापालिका आयुक्त ही जाग्या झाल्या आहेत. त्यांनी तातडीने प्रशासनाची बैठक घेऊन या प्रश्नावर आढावा घेतला. सर्व खड्डे बुजविण्याची मोहीम उघडण्यात आली आहे.
आंबेगाव पोलिसांनी 3 गावठी अग्निशस्त्रांसह जिवंत काडतूस, गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तिघांना अटक केली आहे. जांभुळवाडी पाझर तलावाजवळील मोकळ्या जागेत शनिनगर परिसरात पोलिसांची कारवाई करण्यात आली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बायोगॅस प्रकल्पातून निर्माण होणारा ‘लिक्विड फर्मेंटेड ऑर्गेनिक मॅन्युअर’ म्हणजेच लिक्विड सेंद्रिय खत पाबळ खोऱ्यातील शेतजमिनीत टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिंदे शिवसेनेने केला आहे. या वेस्टमुळे शेती, पशुधन तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा करत हा प्रकार तातडीने थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. शिंदे शिवसेनेचे रायगड जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी पाबळ खोऱ्यात पाहणी केली. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून त्यांच्या प्रकल्पाच्या क्षेत्रात वेस्टची विल्हेवाट न लावता तो एका शेतकऱ्याच्या शेतात टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला.
टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन समोर आले असून, भिवंडी पोलिसांनी पोलिसपूर्व प्रशिक्षण संस्था चालवणाऱ्या प्रकाश धनसिंग पवार याला अटक केली आहे. प्रकाश पवारच्या अटकेनंतर या प्रकरणातील आरोपींची संख्या 16 वर पोहोचली आहे. प्रकाश पवारला भिवंडी न्यायालयात एस. एस. घोडके यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला 15 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारी (ता.12) एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरेंची ही अचानक भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
वणी येथे शिंदे शिवसेना पक्षाच्यावतीने प्रकल्पबाधितांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला आमदार बच्चू कडू उपस्थित होते. वणी परिसरातील कोळसा खाणींसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पात गेल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पबाधित कुटुंबातील तसेच स्थानिक गावांतील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, अशी प्रमुख मागणी बच्चू कडू यांनी केली.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता संभाजी पेठ येथून या तिरंगा यात्रेला सुरुवात होणार असून, क्रांती चौकात यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही तिरंगा यात्रा होणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहनही मंत्री अतुल सावे यांनी केले आहे.
महाराष्ट्रात आणि देशात मुस्लिम विरुद्ध हिंदू हे भांडण पेटवण्याचे काम भाजपवाल्यांनी केले. ते भांडण मिटवता आले नाही, म्हणून राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा वाद निर्माण केला. ते भांडणही मिटवता आले नाही, म्हणून आता एससी विरुद्ध मातंग आणि अठरापगड जातींमध्ये भांडण लावण्याचे काम केले जात आहे. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे देशामध्ये सध्या ‘आरक्षण हटाव’चे काम सुरू आहे. आपण सर्वांनी या आंदोलनाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, एकत्र आले पाहिजे आणि लढले पाहिजे. आता आपण सर्वांनी एकत्र येऊन आरक्षण वाचवले पाहिजे, असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं.
मुंबईतील विलेपार्ले भागात मंगळवारी रात्री एका निवासी इमारतीच्या ११ व्या मजल्याला भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. विलेपार्ले येथील 'शांता भवन' या इमारतीत रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास ही आग लागली. या आगीत अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह एका २३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील, असं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय साताऱ्याच्या राजेंनींच नव्हे तर सर्वच मराठा आमदार, खासदारांनी जातीच्या लेकरांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन देखील पाटलांनी केलं आहे.
मुंबईतील घाटकोपरमध्ये गौसिया चाळीतील ५-६ घरांवर दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून ६ ते ८ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.