Maharashtra Politics Live Update: पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्येच संघर्ष

Political Breaking Live Headlines Updates :सीजेपी आंदोलन, शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक यासह राज्य आणि देशभरातील महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर.....
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

हिंजवडी पोलिसांची अमली पदार्थ तस्करांवर कारवाई; दोघांना अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली आहे. वाकड परिसरात एमडी या प्रतिबंधित अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून १२ लाख ४५ हजार रुपये किमतीचे २४९ ग्रॅम एमडी, एक मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण १३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.

दिल्लीतील सेंट्रल पार्क आजपासून 2 दिवस बंद

दिल्लीतील कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क आजपासून दोन दिवस, म्हणजेच १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. नवी दिल्ली महानगरपालिकेने प्रशासकीय कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी याच ठिकाणी ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चाचं आवाहन केलं आहे. CJPच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत.

पीक नुकसानीचे ८० टक्के पंचनामे पूर्ण: जिल्हाधिकारी डुडी

पुणे जिल्ह्यात पीक नुकसानीचे ८० टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली. परिस्थितीच्या 'दुष्काळी पार्श्वभूमीवर, पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.

Mahayuti Update: सानप विरुद्ध गावडे  लढतीकडे लक्ष

पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमधील अंतर्गत संघर्ष समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या पाचही जागा महायुती लढवणार असल्याचा दावा केला असला, तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिंदे यांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्यासमोर सानप यांचे आव्हान उभे राहिले आहे. महायुतीतील घटक पक्षांकडूनच वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सानप विरुद्ध गावडे या लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत १७, १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com