
नाशिक जिल्हा परिषदेतील 30 हून अधिक महिला कर्मचाऱ्यांच्या शोषण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक, मानसिक छळ विभागप्रमुख आणि इतरांकडून झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाच्या प्रधान सचिवांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
ठाणे शहापूरच्या दमाणी इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थिनींच्या विवस्त्र केल्याने मुख्याध्यापिकेसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाचही आरोपींना कल्याण न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. येथे मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनींना विवस्त्र करून त्यांचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
मुंबईसह उपनगरांत सध्या मराठीचा मुद्दा गाजत असून ठाकरे बंधूही एकत्र आले आहेत. त्यामुळे भविष्यात अनेक मुद्द्यांवरून वाद होण्याची शक्यता आहे. अशातच आता मंत्री शंभूराज देसाईंनी बिल्डर्स यांनाच दम भरला असून मराठी माणसाला भाषा आणि मासांहाराच्या कारणावरून घर नाकारल्यास बिल्डरवर कारवाई केली जाईल असे म्हटलं आहे.
भारतातील टेनिस वर्तुळात खळबळजनक घटना उघडकीस आली असून हरियाणातील गुरुग्राम येथे राज्यस्तरीय टेनिसपटूची तिच्या वडिलांनीच हत्या केल्याचे उघड झाले आहे. राधिका यादव असे टेनिसपटूचे नाव असून वडिलांनी तिची गोळ्या झाडून हत्या केली आहे. पण या हत्येचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.
Param Bir Singh News : CBI कडून परमबीर सिंह यांना क्लीन चिट, नेमकं प्रकरण काय?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांना सीबीआयने (CBI) क्लीन चिट दिली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये परमबीर सिंह आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांवर 5 गुन्हे दाखल झाले होते. तर आयुक्त सिंह यांच्यावर भ्रष्टाचार, खंडणी आणि सत्तेचा दुरुपयोग केल्याचे आरोप करण्यात आले होते. तसेच त्यांच्यावर स्वतंत्रपणे 2 गुन्हे कोपरी आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. ही दोन्ही प्रकरणं आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आली होती. ज्यात कोणतेच तथ्य नसल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगत क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.