
खासदार बजरंग सोनवणे यांच्या समर्थकांनी चक्क हॉटेलमध्ये बंदुकीसोबत फोटोसेशन केलं आणि ते फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकून मिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, हे 'शो ऑफ' सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांना चांगलंच अंगलट आलं आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश मुंडे, रामदास मुंडे, पांडुरंग मुंडे, रामचंद्र ओमासे असे या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, फोटो, आणि मोबाईल डिटेल्सच्या आधारे तपास सुरू आहे. चारही आरोपींवर याआधी देखील सावकारी, जीवे मारण्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या चारही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते मुंबईतील वरळी येथे राहत होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
देशमुख हे अजित पवारांकडे मागील दहा वर्षांपासून जनसंपर्क अधिकारी (PRO) म्हणून काम करत होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात शोक पसरला आहे. देशमुख यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी साडेआठ वाजता मुंबई दादर येथे अंत्यविधी होणार आहे.
संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या चार नेत्यांची नावे घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. या चारही मंत्र्याचे घोटाळे समोर आले असून चौकशीसाठी त्यांची एकत्रित एसआयटी स्थापन केली पाहिजे. एक मोठी न्यायालयीन चौकशी शिंदे गटाच्या मंत्र्यांची केली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
राऊत म्हणाले, संजय राठोड यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप भाजपचे नेते परिणय फुके यांनीच केलेला आहे. संदिपान भुमरे यांनी दीडशे कोटीची जमीन ड्रायव्हरच्या नावावर केली. मला पण त्यांचे ड्रायव्हर व्हायला आवडेल. संजय शिरसाट यांच्या प्रकरणावरुनही राऊतांनी टीका केली. संजय शिरसाट, उदय सामंत या मंत्र्यांचे घोटाळे समोर आले आहेत असं राऊत म्हणाले.
तेलुगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
कोटा श्रीनिवास राव हे केवळ अभिनेते नसून भाजपाचे माजी आमदार देखील होते. तीन दिवसांपूर्वी (10 जुलै) ला त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या तीन दिवसांनी त्यांचे निधन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कोटा श्रीनिवास राव हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.