Maharashtra Phase 2 Elections : विदर्भात लग्नांच्या मुहूर्ताने निवडणुकीवर अक्षता ?, उमेदवारांचा जीव टांगणीवर !

Maharashtra Phase 2 Elections Voting : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात कमी झालेले मतदान ही चिंतेची बाब असताना उद्या (26 एप्रिल) दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. या मतदानात किती टक्के मतदान होणार याकडे उमेदवार डोळे लावून बसले आहेत.
Prataprao Jadhav, Ramdas Tadas, Prakash Ambedkar, Navneet Rana, Rajshree Patil
Prataprao Jadhav, Ramdas Tadas, Prakash Ambedkar, Navneet Rana, Rajshree PatilSarkarnama

2024 Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील पाच आणि मराठवाड्यातील तीन लोकसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. 204 उमेदवार रिंगणात असून, या उमेदवारांपैकी दिग्गज उमेदवारांना उद्यांचा लग्नाचा मुहूर्त सर्वात अडचणीचा वाटत आहे. या सर्व परिस्थितीत विदर्भातील पाच मतदारसंघांत उमेदवारांचा जीव मात्र लग्न मुहूर्ताने टांगणीवर आहे. मतदारांनी लग्नाला प्राधान्य देत मतदानावर अक्षता फेकल्या तर मात्र निवडणुकीचा प्रत्येक राजकीय पक्षाला असलेला अपेक्षित निकाल लागणार नाही.

दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी या 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी एकूण 16,589 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, या निवडणुकीत 1 कोटी 49 लाख 25 हजार 912 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 204 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prataprao Jadhav, Ramdas Tadas, Prakash Ambedkar, Navneet Rana, Rajshree Patil
Sharad Pawar News : शरद पवारांचा राहुरीमधील सभेतून पंतप्रधान मोदी अन् विखे पाटलांवर जोरदार हल्लाबोल!

आठही लोकसभा मतदारसंघांत दहा वर्षांत प्रत्येकी दोन ते सव्वा दोन लाख मतदार वाढले आहेत. हे मतदार कोणाला आपला कल देतात याकडे उमेदवारांचे लक्ष आहे. पण, सर्व उमेदवारांना शुक्रवार (26 एप्रिल) एप्रिल रोजी लग्नाच्या मुहूर्ताचा फटका बसण्याची चिन्हं आहे. मतदार हे लग्न समारंभात मतदारसंघाच्या बाहेर निघून गेले तर मतदानाची टक्केवारी घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत एक एक मत हे मोलाचे असून त्यासाठी कार्यकर्ते आणि नेत्यांना कष्ट घ्यावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मतदान केले नाही तर उमेदवारांबरोबर राजकीय पक्षांना समोर मोठी अडचण निर्माण होणार आहे.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघ (Buldhana Lok Sabha Election 2024 Voting)

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकूण 17,82,700 मतदार आपल्या मतदानाचा प्रयोग करतील. या मतदारसंघात 2014 मध्ये 15,95,435 मतदार होते. 2019 मध्ये एकूण मतदार हे 17,62,918 होते. तर 2024 मध्ये यात मोठी वृद्धी होत एकूण मतदारांची संख्या थेट 17,82,700 इतकी झाली आहे. बुलडाणा मतदारसंघात 2014 मध्ये 61 टक्के व 2019 मध्ये 63 टक्के मतदान झाले होते. असे असताना यंदा उन्हाळा आणि लग्नसराई पाहता ही टक्केवारी कायम राहिल असा अंदाज आहे. पण, यापेक्षा कमी मतदान झाल्यास त्याचा फटका कोणाला बसतो हे पाहण्यासारखे ठरेल. मतदानाची घसरणारी आणि वाढणारी टक्केवारी उमेदवाराचा जीव खाली वर करतो. बुलडाणा येथे दुरंगी लढत होत असून वंचित येथे किती मतांचा डल्ला मारतो हे पाहण्यासारखे असेल.बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत आहे. शिवसेना (शिंदे गट) प्रतापराव जाधव विरुद्ध शिवसेना (उध्दव ठाकरे ) नरेंद्र खेडेकर यांच्यात लढत होणार आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघ (Akola Lok Sabha Election 2024 Voting)

अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित नेते प्रकाश आंबेडकर, काँग्रेस नेते डाॅ. अभय पाटील तर भाजप युवा नेता अनुप धोत्रे यांच्यात थेट लढत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण 18,90,814 मतदार आपल्या मतदानाचा प्रयोग करतील. या मतदारसंघात 2014 मध्ये 16,72,643 मतदार होते. 2019 मध्ये एकूण मतदार हे 18,65,169 होते. तर 2024 मध्ये यात मोठी वृद्धी होत एकूण मतदारांची संख्या थेट 18,90,814 इतकी झाली आहे. अकोला मतदारसंघात 2014 मध्ये 58 टक्के व 2019 मध्ये 60 टक्के मतदान झाले होते. अकोल्यात मतदानाची टक्केवारी ही इतकीच राहिली तर मतदार मात्र कोणाला कौल देतात हे पाहण्यासारखे असेल. यंदा अकोल्याकडे संपूर्ण राज्याचे नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अकोल्यात मतदानाची टक्केवारी ही महत्त्वाची ठरणार आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघ (Amravati Lok Sabha Election 2024 Voting)

अमरावती लोकसभा मतदार संघात यंदाची निवडणुक वर वर पाहता तिरंगी वाटत आहे. पण, आतुन ती दुरंगी आहे. काँग्रेस आणि भाजप आमने सामने आहे. त्यात बच्चू कडू यांची प्रहार जनशक्ती कोणाचे मते गिळंकृत करते हे पाहण्यासारखे असेल. काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे विरुद्ध भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यात थेट लढत आहे. नवनीत राणा यांनी भाजपत प्रवेश करण्यापुर्वीच त्यांना पक्षाने तिकिट दिले होते. तर यापुर्वी अपक्ष म्हणून त्यांनी युतीच्या शिवसेना उमेदवाराला धक्का दिला होता. अशा परिस्थितीत अमरावती लोकसभा निवडणुकीत 18,36,078 मतदार कोणाला कौल देतात हे पाहण्यासारखे असेल. या मतदारसंघात 2014 मध्ये 16,12,739 मतदार होते. 2019 मध्ये एकूण मतदार हे 18,33,091होते. तर 2024 मध्ये यात मोठी वृद्धी होत एकूण मतदारांची संख्या थेट 18,36,078 इतकी झाली आहे. अमरावती मतदारसंघात 2014 मध्ये 62 टक्के व 2019 मध्ये 60 टक्के मतदान झाले होते. भाजप विरोधात काँग्रेस अशी थेट लढत अमरातवी येथे आहे. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभेला आलेल्या व्यापक यश आणि बच्चू कडू यांना सायन्स स्कोअर मैदानावरून प्रशासनाने हुकूमशाही पद्धतीने हुसकावून लावण्याचा काय परिणाम अमरावतीत होतो हे पाहण्यासारखे असेल. प्रहार निवडणुकीत कोणाला दणका देतो हे चित्र उद्या स्पष्ट होईल.

वर्धा लोकसभा मतदारसंघ (Wardha Lok Sabha Election 2024 Voting)

वर्धा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार भाजप नेते रामदास तडस विरोधात राष्ट्रवादीचे अमर काळे यांच्या विरोधात लढत होत आहे. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव उमेदवार अमर काळे आहे. अशा वेळी या जागेवर महाविकास आघाडी काय चमत्कार करते हे पाहण्यासारखे असेल. या मतदारसंघात भाजपच्या प्रचार सभांची घटलेली गर्दी नागपूरचा इफेक्ट इथे पण दाखविणार काय, असा प्रश्न उपस्थित होतो. नागपूर येथे कमी झालेले मतदान पाहता वर्धा येथे काय परिस्थिती उद्या निर्माण होते याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशा परिस्थितीत वर्धा लोकसभा निवडणुकीत 16,82,771 मतदार कोणाला कौल देतात हे पाहण्यासारखे असेल. या मतदारसंघात 2014 मध्ये एकूण मतदार 15,64,552 होते. 2019 मध्ये एकूण मतदार 17,43,283 होते. तर 2024 मध्ये यात मोठी वृद्धी होत एकूण मतदारांची संख्या थेट 16,82,771 इतकी झाली आहे. वर्धा मतदारसंघात 2014 मध्ये 65 टक्के व 2019 मध्ये 62 टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानाच्या टक्केवारी घट होते की वृध्दी हे पाहण्यासारखे असेल.

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघ (Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024 Voting)

या ठिकाणी विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकीट महायुतीतमध्ये शिवसेना (शिंदे गट) ने कापले. या ठिकाणी राजश्री पाटील या आयात उमेदवाराला शिवसेना (शिंदे गट) ने तिकीट दिले. या मतदारसंघात शिवसेना विरोधात शिवसेना अशीच लढत होत आहे. शिवसेना (ठाकरे गट) यांनी येथे संजय देशमुख यांना उमेदवारी दिली. बुलडाणा मतदारसंघाप्रमाणे येथे स्थिती आहे. महायुती विरोधात महाविकास पण, शिवसेना विरोधात शिवसेना अशी लढत रंगेल. यवतमाळ वाशीम लोकसभा निवडणुकीत यंदा 19,40,916 मतदार कोणाला कौल देतात हे पाहण्यासारखे असेल. या मतदारसंघात 2014 मध्ये एकूण मतदार 17,55,292 होते. 2019 मध्ये एकूण मतदार 19,16,185 होते. यवतमाळ वाशिम मतदारसंघात 2014 मध्ये 58 टक्के व 2019 मध्ये 61 टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानाच्या टक्केवारी घट होते की वृद्धी हे पाहण्यासारखे असेल. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदार नेमक्या कोणत्या शिवसैनिकाला कौल देतो हे यावर विधानसभेचे गणित निश्चित होईल.

R

Prataprao Jadhav, Ramdas Tadas, Prakash Ambedkar, Navneet Rana, Rajshree Patil
Ajit Pawar : 'कॉमन मॅन'साठी नियम, दंड सर्व काही, उलट्या दिशेने जाणाऱ्या अजितदादांना मात्र चक्क सूट; दिमतीला पोलिसही

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com