Sharad Pawar News : शरद पवारांचा राहुरीमधील सभेतून पंतप्रधान मोदी अन् विखे पाटलांवर जोरदार हल्लाबोल!

Sharad Pawar Vs Pm Modi and Vikhe Patil : 50 वर्षे जिल्ह्याचे नेतृत्व करणार्‍यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेल्याचा टोलाही लगावला!
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Loksabha Election 2024 : राहुरी येथील सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जुमलेबाजीचा आरोप केला आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता नगर जिल्ह्यातील त्यांच्या श्रेयवादी राजकारणावर जोरदार हल्ला चढवला. देशाच्या केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून हुकूमशाही पद्धतीने पंतप्रधान मोदी कारभार करत आहेत. तर 50 वर्षे जिल्ह्याचे नेतृत्व करणार्‍यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेल्याचा टोला शरद पवार यांनी मंत्री विखे यांना या वेळी लगावला.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके(Nilesh Lanke) यांच्या प्रचारार्थ राहुरीत सभा झाली. ही सभा नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा सुरू झाली. त्यामुळे भर दुपारी बारा वाजता सभेला सुरुवात झाली. मात्र तरीही सभेसाठी मंडपाबाहेर गर्दी दिसून आली. मंडपाभोवती जिथे सावली मिळेल, तेथे बसून लोक सभा ऐकत होते आणि शरद पवार, उमेदवार नीलेश लंके आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या भाषणाला दाददेखील देत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar
Vishal Patil News : विशाल पाटलांवर कारवाई होणार? नाना पटोलेंनी दिले संकेत

शरद पवार(Sharad Pawar) यांनी भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जुमलेबाजीचा आरोप करत टीका केली. शरद पवार म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांपूर्वी जनतेला लोकसभा निवडणुकीत जी आश्वासने दिली होती. प्रत्यक्षात त्यांची पूर्तता झालेली नाही. देशाच्या भल्यासाठी या सरकारने काहीच केले नाही. केंद्रीय सत्ता, यंत्रणांचा दुरुपयोग करीत विरोधकांचा आवाज दाबला. या देशातील जनता यांच्या हुकूमशाही राजवटीचे सत्तेचे सिंहासन उद्ध्वस्त करण्याच्या तयारी आहेत".

याचबरोबर "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी जनताभिमुख कारभार केला. शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या क्षेत्रात चांगले काम केले. दिल्लीतील जनता त्यांच्यावर खूष आहे. पंतप्रधानांवर त्यांनी टीका केली म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकले. झारखंड येथील आदिवासी मुख्यमंत्री सोरेन यांनी केंद्राने मदत दिली नाही म्हणून पंतप्रधानांवर टीका केली, म्हणून त्यांना अटक केली. सीबीआय, ईडी या केंद्रीय यंत्रणांचा उपयोग विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जात आहे. पश्चिम बंगालमधील तीन मंत्री आज तुरुंगात आहेत. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालू आहे. ही हुकूमशाही उद्ध्वस्त करायची असले, तर वेळीच जनतेने एकत्र आले पाहिजे", असे शरद पवार यांनी म्हटले.

Sharad Pawar
Raju Shetti News : मी तुमच्या शेतातील म्हसोबा, मला...; राजू शेट्टींचं शेतकऱ्यांना साकडं

विखे पिता-पुत्रांच्या डोक्यात सत्तेची हवा -

शरद पवार यांनी मंत्री राधाकृष्ण विखे(Radhakrishna Vikhe) आणि त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे यांच्यावर नाव न घेता टीका केली. पन्नास वर्षे जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्यांनी त्यांनी जिल्ह्यात विकासाची काय कामं केली हे सांगितले पाहिजे. सत्तेची हवा त्यांच्या डोक्यात गेली आहे. निळवंडे धरणाला ज्या उमेदवारांच्या वाडवडिलांनी विरोध केला ते आज त्याचे श्रेय घेत आहेत. मुळाप्रवरा वीज सहकारी संस्था बंद पडली आहे. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना राज्यात आदर्श म्हणून गणला जातो. तो आज यांच्या ताब्यात असताना बंद पडला, अशी टीका शरद पवार यांनी केली.

'ईडी'च्या कार्यालयात जाण्याची का घेतली भूमिका -

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खोट्या केसेस दाखल केल्या जातात. आपल्यावरही अशीच खोटी केस दाखल केली होती. आपण राज्य सहकारी बँकेचे सभासदही नाही. त्या बँकेत कधी गेलेलो नाही. बँकेकडून कधी कर्जही घेतले नाही. 'ईडी'च्या नोटीसला उत्तर देण्यासाठी आपण कार्यालयात जाण्याची भूमिका घेतली. तेव्हा 'ईडी'च्या अधिकार्‍यांनी चुकून नोटीस पाठवली गेली, असे सांगून कार्यालयात न येण्याची आपणास विनंती केल्याची आठवण शरद पवार यांनी या सभेत पुन्हा करून दिली.

महागाई कमी करण्याच्या मोदींच्या आश्वासनाचे काय झाले -

नरेंद्र मोदी यांनी 50 दिवसांच्या आत महागाई 50 टक्के कमी करण्याचं आश्वासन दिलं होते. पेट्रोल त्यावेळेस 71 रुपये लिटर होते. आज ते 106 रुपये लिटर आहे. गॅसचा सिलिंडर त्यावेळी 410 रुपये होता, आज 1160 रुपये आहे. बेरोजगारांना रोजगार देण्याच्या आश्वासनाचीही पूर्तता झाली नाही. जागतिक संघटनेच्या अहवालानुसार शंभरपैकी 87 बेरोजगारांना आज देशात रोजगार नसल्याचे शरद पवार यांनी सभेत सांगून वाढत्या बेरोजगारीचे वास्तव्य सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com