Maharashtra Police recruitment : खुशखबर! तयारीला लागा; महाराष्ट्र पोलिस दलात 15000 जागांवर भरतीस मंजुरी

Maharashtra Police Recruitment 2025 15000 Vacancies Approved in Cabinet Meeting Chaired by CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र पोलिस दलात भरतीला मंजुरी देण्यात आली.
Maharashtra Police recruitment
Maharashtra Police recruitmentSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra cabinet meeting : गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस दलात भरतीच्या तयारीत असलेल्या युवकांना भाजप महायुती सरकारने खुशखबर दिली आहे. महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15000 हजार जागांवर भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र पोलिस दलात 15000 जागांवर भरतीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकी गृहविभाग, अन्न, नागरी पुरवठा विभाग, विमानचालन विभाग आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाशी निगडीत निर्णय घेण्यात आले.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभाग आहे. या विभागात, महाराष्ट्र पोलिस (Police) दलात 15,000 जागांवर भरतीचा निर्णय घेत, त्यास मंजुरीही देण्यात आली. ही भरती प्रक्रिया लांबली होती. पण आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती समोर येताच, भरतीची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

Maharashtra Police recruitment
BJP Ramesh Karad controversial statement : फडणवीसाच्या शिलेदारांचं विधान, रोहित पवारांनी हेरलं; म्हणाले, 'तमाम जनतेचा अपमान...'

याशिवाय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढीचा निर्णय झाला. सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णयाला देखील मंजुरी देण्यात आली.

तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल करण्याबरोबरच सरकारी हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढीचा देखील निर्णय बैठकीत झाला.

राज्य मंत्रिमंडळाची बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाही. ते श्रीनगरमध्ये होते. त्यामुळे ते बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहिले. मंत्री भरत गोगावले बैठकीला उपस्थित नव्हते. ते नाराज होऊन दिल्लीला गेल्याची चर्चा आहे. परंतु त्यांचे दिल्लीला महत्त्वाचे काम असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगण्यात येत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com