
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्याची खास इच्छा पूर्ण केली आहे. एका कार्यकर्त्याने नवीन कार घेतल्यानंतर त्याने राज ठाकरेंच्या हस्ते पूजा व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. ही गोष्ट ऐकताच राज ठाकरे स्वतः पुढे आले आणि कारची विधीवत पूजा केली. विशेष म्हणजे, यावेळी राज ठाकरे स्वतः ड्रायव्हिंग सीटवरही बसले. या क्षणाने कार्यकर्त्याच्या आनंदाला उधाण आलं होतं.
राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यानी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर मंत्रीपदाबाबतची जाहिरपणे इच्छा बोलून दाखविली आहे. जळगावातील पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले माझ्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, पण जाहीर करा असे म्हणणार नाही.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, तेव्हा पहिल्यांदा मंत्रीपद मिळाले. त्यादिवशी 2 जुलै 2023 ची तारीख होती, त्यामुळे काल सुद्धा 2 जुलै ही तारीख होती, मी तटकरे साहेबांसोबत होतो. त्यामुळे तटकरे साहेब आता बोलतील, तेव्हा बोलतील अशी मी वाट पाहत होतो असं आमदार अनिल पाटील म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन घेतले.
VIP दर्शन बंद केल्याने तीनही मंत्र्यांनी सर्वसामान्य भाविकांप्रमाणे दर्शन घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं. पदस्पर्श दर्शन घेतल्यास दर्शन रांग थांबवावी लागते यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुखदर्शन घेतले.
मीरा-भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर परप्रांतीय व्यापारी आक्रमक झाले आहेत. मनसेविरोधात संताप व्यक्त करत व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली असून, कडकडीत बंद पाळत दुकानं बंद ठेवली आहेत. व्यापाऱ्यांनी निषेध मोर्चा काढत पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतलाय. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.
सुनिल बागुल व मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला असताना दुसरीकडे गणेश गिते यांचा मात्र भाजपप्रवेश आज झाला आहे. गिते यांच्यासह शिवसेना (उबाठा) माजी नगरसेवक सचिन मराठे, प्रशांत दिवे, सीमा ताजने, कमलेश बोडके, उबाठा उपजिल्हाप्रमुख कन्नु ताजणे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपने उबाठा व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का दिला आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. यावेळी आमदार राहुल ढिकले, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, ज्येष्ठ नेते बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर, मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.