Maharashtra Political Live Updates: मुंबईत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंदोलन करणार

Sarkarnama Headlines : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी....वाचा एका क्लिकवर...
Uddhav Thackeray Raj Thackeray
Uddhav Thackeray Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

मुंबईत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंदोलन करणार

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची चर्चा सुरु आहे. याचदरम्यान, आता बुधवारी (ता.17) मुंबईत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंदोलन करणार आहे. हे आंदोलन अजाईल कंपनीच्या विरोधात असणार आहेत.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची नियुक्ती

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती, मात्र आता पुन्हा त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वपूर्ण मानली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट

पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरात असलेल्या कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना रविवारी घडली. त्यात चार लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच 40 ते 45 पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते. त्यांना वाचवण्यात यश आले. सुमारे 38 जण जखमी झाले होते. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जखमींची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. जखमींच्या प्रकृतीची चौकशी करत रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक आमदार सुनील शेळके व अधिकारी उपस्थित होते.

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुख्मिणी महापूजेचं मुख्यमंत्र्यांना सपत्नीक निमंत्रण 

येत्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल रुख्मिणी संस्थानकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महापूजेचं सपत्नीक निमंत्रण देण्यात आलं आहे.

पंशनिशिंगणापूर देवस्थानच्या निर्णयाविरोधात तृप्ती देसाई आक्रमक,थेट आंदोलनाचा इशारा 

शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टकडून 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह 167 जणांना तडकाफडकी कामावरून हटवण्यात आलं आहे. यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. आता या निर्णयाविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेवरही बोट ठेवले आहे.

मोठी बातमी: येत्या 24 तासांकरिता रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे. अशातच हवामान विभागाकडून येत्या 24 तासांकरिता रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

'लाडकी बहीण योजना चांगली आहे, पण...'; शिवसेनेच्या आमदाराचं धक्कादायक विधान 

महायुतीमधील एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे आमदार आमश्या पाडवी यांनी ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली आहे, पण योजनेमुळे आदिवासींचं नुकसान झालं’ असं विधान केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com