Maharashtra Politics: पुढाऱ्यांसमोर तीनच प्रश्न... कबर, कुत्रा अन् कामरा!

Political controversy Maharashtra : सर्वांत गहन आणि जगण्या-मरण्याशी संबंधित तीनच प्रश्न आपल्या पुढाऱ्यांना सतावत आहेत. या प्रश्नांनी त्यांना रात्रीची झोप येत नाही अन् त्यांनी जनसामान्यांची झोप उडवली आहे.
Political controversy Maharashtra
Political controversy MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

मंडळी, सांप्रतकाळी आपल्या महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत. मात्र, त्या सर्व ज्वलंत प्रश्नांपेक्षाही सर्वांत गहन आणि जगण्या-मरण्याशी संबंधित तीनच प्रश्न आपल्या पुढाऱ्यांना सतावत आहेत. या प्रश्नांनी त्यांना रात्रीची झोप येत नाही अन् त्यांनी जनसामान्यांची झोप उडवली आहे. या प्रश्नांची तड लावल्याशिवाय प्रसारमाध्यमे शांत बसणार नाहीत असे ते तीन गहनगंभीर प्रश्न म्हणजे... कबर, कुत्रा अन् कामरा!

महाराष्ट्रासमोर तीनच प्रश्न :

कबर, कुत्रा अन् कामरा!

बहिणींना कधी मदत वाढ?

कधी शेतकरी कर्जमाफी?

- काहीही विचारणे आवरा

अहो महाराष्ट्रासमोर तीनच प्रश्न

कबर, कुत्रा अन् कामरा! - १

शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शिक्षकांचीही आत्महत्या

धक्क्यांतून तुम्ही सावरा

आता महाराष्ट्रासमोर तीनच प्रश्न

कबर, कुत्रा अन् कामरा! - २

महाराष्ट्र अवघा तापला

चारा नि पाणीप्रश्न पेटला

मिळेना मदतीचा आसरा

पण महाराष्ट्रासमोर तीनच प्रश्न

कबर, कुत्रा अन् कामरा! - ३

मराठवाड्यात हत्याकांड

नागपूरला दंगलीचे कांड

चाल कुणाची, कोण मोहरा

इथे महाराष्ट्रासमोर तीनच प्रश्न

कबर, कुत्रा अन् कामरा! - ४

Political controversy Maharashtra
Mahayuti Politics: महायुतीतीलच दोन पक्षांत रस्सीखेच; फडणवीसांनाच लक्ष घालावे लागणार!

मुंबईत मराठीच पाहुणी

मराठी एकीला विसरून

जातीयतेचा लावला धोसरा

अन् महाराष्ट्रासमोर तीनच प्रश्न

कबर, कुत्रा अन् कामरा! - ५

नाले-ओढे कोरडेठाक

बहुतेक नद्या गटारगंगा

कुंभ होईल कसा साजरा

तरी महाराष्ट्रासमोर तीनच प्रश्न

कबर, कुत्रा अन् कामरा! - ६

पालिका निवडणुका ठप्प

विकासप्रश्नी प्रशासन गप्प

नागरी सेवांना जरी हादरा

अहो महाराष्ट्रासमोर तीनच प्रश्न

कबर, कुत्रा अन् कामरा! - ७

महिलांवरील अत्याचार

बालकांवरील अत्याचार

समस्या सगळ्या विसरा

कारण महाराष्ट्रासमोर तीन प्रश्न

कबर, कुत्रा अन् कामरा! - ८

श्रीमंत होताहेत मालामाल

गरिबांचे मात्र कायम हाल

सामान्य माणूस कावरा बावरा

पण महाराष्ट्रासमोर तीनच प्रश्न

कबर, कुत्रा अन् कामरा! - ९

अस्वस्थ ‘एमआयडीसी’

गावगुंडांचा धुमाकूळ

खंडणीचा लोभ हावरा

पण महाराष्ट्रासमोर तीनच प्रश्न 

कबर, कुत्रा अन् कामरा! - १०

तपासाची ‘दिशा’ गवसेना

खून होता की आत्महत्या

भयभीत पित्याचा प्रश्न कापरा

तरी महाराष्ट्रासमोर तीनच प्रश्न

कबर, कुत्रा अन् कामरा! - ११

माणूस झाला कवडीमोल

त्याचे अस्तित्व मातिमोल

त्यापेक्षा मोल आले जनावरा

अन् महाराष्ट्रासमोर तीनच प्रश्न

कबर, कुत्रा अन् कामरा! - १२

आश्वासनांनी सत्ता काबीज

मोफत रेवड्यांची बरसात

जनता भुलली वचनांच्या ‘गाजरा’

तरीही महाराष्ट्रासमोर तीनच प्रश्न 

कबर, कुत्रा अन् कामरा!  - १३

अस्वस्थ वर्तमानामुळेच

भूतकाळ भासे रमणीय

इतिहास साजिरा गोजिरा

अन् महाराष्ट्रासमोर तीनच प्रश्न

कबर, कुत्रा अन् कामरा! - १४

सतावतील जरी अनेक प्रश्न

झाली जरी तुझी कुचंबणा

नागरिका ठेव चेहरा हासरा

आता महाराष्ट्रासमोर तीनच प्रश्न

कबर, कुत्रा अन् कामरा! - १५

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com