
मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राणे यांनी, टायगर आणि उद्धव ठाकरेंचा काडीचाही संबंध नाही याला ऑपरेशन पेंग्विन हेच नाव योग्य असा टोला लगावला आहे.
पुण्यातील हगवणे प्रकरणानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असतानाच कोल्हापूमध्ये देखील अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दहा लाख रुपयांच्या मागणीसाठी गर्भवती महिलेच्या छळ करण्यात आला असून पैसे न मिळाल्यास पोटावर लाथ मारून ठार मारण्याची धमकी नवऱ्याने दिली आहे. ही घटना कोल्हापूरच्या वरणगे पाडळीतील असून करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रोहित दुधाने असे पतीचे नाव असून तो एसटी कर्मचारी आहे.
भारतामध्ये राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्या प्रकरणी तीन दिवसांपूर्वी ठाण्यातील रवी वर्माला अटक करण्यात आली होती. त्याची आज पोलीस कोठडी आज संपत असल्याने पुन्हा एकदा ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने रवी वर्माला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मुंबईतील धारावी प्रकल्पासाठी अदानी समूहाला मुंबईतील जमीन देण्यात आली आहे. ही मोक्याची जागा फक्त धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली अदानीला दिली जात असून यात अटी व शर्ती शिथील केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
पंढरपूर येथील संभाव्य कॉरिडोरला मंत्री नितेश राणे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी हिंदूंच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या कॉरिडॉरची गरज असून स्थानिक लोकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे. तसेच उज्जैन, काशी विश्वेश्वर या ठिकाणी कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. ज्यामुळे या ठिकाणच्या हिंदू लोकांचे आर्थिक सक्षमीकरण झालेले आहे. त्यामुळे पंढरपुरात देखील कॉरिडॉर व्हावा ही सर्वसामान्य लोकांची इच्छा असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सदैव विरोध करणारे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना आता उपनेता पदावर बढती देण्यात आली आहे. त्यांच्यावर रावेर लोकसभा मतदारसंघ आणि नंदुरबार जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण झाला आहे. यामुळे ईगतपुरी ते कसारा हे अंतर आता फक्त 8 मिनिटांवर आले आहे. ईगतपुरी ते आमने 76 किलोमीटरच्या भागात ‘समृद्धी’वर 5 बोगदे असणार आहे. नागपुरातून मुंबईच्या वेशीवर 8 तासांत पोहोचता येणार. आतापर्यंत 625 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (5 जून) 'समृद्धी महामार्ग' (मुंबई-नागपूर एक्सप्रेस वे) च्या 76 किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे थाटात उद्धघाटन झाले. यावेळी फडणवीस यांनी, पोस्ट करत यांची माहिती दिली आहे. त्यांनी, राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासगाथेतील एक मुकुटमणी, 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा'चा अंतिम टप्पा (इगतपुरी ते आमणे -76 किमी) लोकार्पणासाठी सज्ज.... असे म्हटलं आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनोतील व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकारण चांगलेच ढवळले होते. तर हा व्हिडिओ व्हायरल करण्याचे काम शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी केले होते. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी काल पक्षविरोधी कारवाया केल्याने बडगुजर यांना बडतर्फ केले. आता त्यांनाच आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजपचे नेते आतुर झालेले दिसले.
सध्या कोकणात विरोधातील राजकीय पक्षांना गळती लागली आहे. विशेष: रत्नागिरी जिल्ह्यात. याआधी ठाकरे गटाला येथे गळती लागली होती. ती अद्याप थांबलेली नसतानाच आता मनसे समोर पक्षातील खदखद चिंतेचा विषय बनला आहे. येथे राज ठाकरेंचे शिलेदार वैभव खेडेकर पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. पण त्याआधी त्यांनी राज ठाकरेंकडे भेटीची वेळ मागितली आहे. पण राज ठाकरे त्यांना वेळ देतात का? याची उत्सुकता येथे लागली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (5 जून) 'समृद्धी महामार्ग' (मुंबई-नागपूर एक्सप्रेस वे) च्या शेवटच्या टप्प्याचे थाटात उद्धघाटन झाले. या महामार्गातील 76 किमी लांबीच्या भागाचे (इगतपुरी-आमाणे) उद्घाटन झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.