Maharashtra Politics Live Update : मयत विलास घुले हत्या प्रकरणातील एका संशयताला SIT ने घेतले ताब्यात

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 28 June महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) प्रशासकीय, आर्थिक, शैक्षणिक तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

समृद्धी महामार्गावर काळाचा घाला चंद्रपूरातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर आज भीषण अपघातात चंद्रपूर शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अकोल्याकडे जात असताना धामणगाव रेल्वे तालुक्यातील चॅनल क्रमांक १०६ जवळ भरधाव वॅगनार कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर जोरदार आदळली. या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला. मृतांमध्ये भास्कर जीवने, महादेव जीवने, लता जीवने, आरती जीवने आणि १२ वर्षीय त्रिशा जीवने यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल.

मयत विलास घुले हत्या प्रकरणातील एका संशयताला SIT ने घेतले ताब्यात

आमदार धनंजय मुंडे टाकळी गावात येऊन आक्रमक होत पोलिसांवरती गंभीर आरोप करत दहावा आरोपी का अटक होत नाही असा सवाल उपस्थित केल्यानंतर SIT ने आपल्या तपासाची चक्र फिरवत तपासाला गती देत या प्रकरणात धागेद्वारे कुठपर्यंत आहेत हे शोधण्याचे काम सुरू आहे काही वेळापूर्वी हत्या प्रकरणातील एक संशयित SIT ने ताब्यात घेतला असून त्याची चौकशी केली जात आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

टिटवाळ्यात पाणीटंचाई ठरली अपघाताचे कारण, भरधाव कारने तीन चिमुकल्यांना उडवले

कल्याणलगतच्या टिटवाळा ग्रामीण भागातील पाणीटंचाई अद्यापही कायम आहे. पिण्याचे पाणी भरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन अल्पवयीन मुलांना भरधाव कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिन्ही मुले जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

किल्ले रायगडावर शासकीय रोपवे उभारणीसाठी मान्यता

किल्ले रायगडावर जाण्यासाठी आता नवीन रोपवे उभारली जाणार आहे. तशी माहिती रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडियावर पोस्ट द्वारे उघड केली आहे. या रोप वेचा वापर करून केवळ 50 ते 100 रुपयांमध्ये शिवभक्तांना गडावर जाता येणार आहे. दुर्गराज रायगडावर सध्या कार्यरत असलेल्या खाजगी मालकीच्या रोप वेमधून साधारणता 350 रुपये आकारले जात आहेत. मात्र हाच प्रवास आता केवळ 50 ते 100 रुपयांमध्ये करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करताना खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल; का गेले याचे कारणही सांगितलं

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी करणाऱ्या खासदारांविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांच्या मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. नुकताच धाराशिव जिल्ह्यात मोठी सभा घेतली. यावेळी खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली. तसेच ते का सोडून गेले याचे कारण सांगत पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचाही उल्लेख करत ओमराजेंनी वडिलच्या नावानं स्थापन केलेल्या मल्टीस्टेटमध्ये याने कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा दावा केला.

उद्धव ठाकरेंनी मागितली धारशिवच्या जनतेची माफी

ओमराजेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरून जनतेची जाहीर माफी मागितली. ते म्हणाले, "गेल्या चार दिवसांत या लोकांची जी भयानक प्रकरणे माझ्या कानावर येत आहेत, ती ऐकून अंगावर काटा येतो. असा भयानक माणूस आपण इतकी वर्षे पोसला कसा? मला जर यांची ही कृत्ये आधी माहीत असती, तर मी त्यांना उमेदवारीच दिली नसती. मी त्यांना तिकीट दिले म्हणून तुम्ही त्यांना मतदान केले, त्यामुळे या चुकीबद्दल मी धाराशीवच्या जनतेची हात जोडून माफी मागतो,"

दिल्ली-मुंबई-बडोदरा महामार्गाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून पाहणी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली-मुंबई-बडोदरा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी केली. पालघर ते अंबाडी गावापर्यंतचा रस्ता पूर्ण झाला असून या मार्गाला विरार-अलिबाग कॉरिडॉरसह विविध जोडरस्ते जोडले जात आहेत.या प्रकल्पामुळे ठाणे आणि मुंबई महानगर परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच शहरातील वाहतुकीचा ताणही कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महामार्गाचे काम वेगाने सुरू असून नदीवरील पुलाच्या बांधकामाला काहीसा विलंब झाला आहे. संबंधित पुलाचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

ठाणे जिल्हा बँकेवर सहकार पॅनलची सत्ता

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत आज झालेल्या मत मोजणीत सहकार पॅनलने २१ पैकी १६ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवाल्याने हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाचा करिष्मा अजूनही असल्याचे दाखवून दिले आहे.वसई विरार मधील चारही जागा निवडून अनन्या बरोबरच पालघर जिल्ह्यातील ४ जागा हि निवडून आणण्यात हितेंद्र ठाकूर यांचा मोठा वाटा आहे.

विलास घुले खून प्रकरणाच्या तपासाला वेग; स्कॉर्पिओ अन्‌ चाकूही जप्त

विलास घुले खून प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. कारण एसआयटीने पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आणि चाकू जप्त केला आहे. याच गाडीतून आरोपी घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच ज्या चाकूने वार करण्यात आले, तो चाकूही आरोपीच्या शेतातून जप्त करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंसोबत राहायचं की नाही, हे काँग्रेस ठरवणार : नीलेश राणेंचा टोला

उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष सध्या झिरो झाला आहे, त्यामुळे ठाकरेंसोबत त्यांना राहायचं की नाही, हे काँग्रेस ठरवणार आहे, अशी परिस्थिती आहे. वाईट वाटतं, पण ती वस्तुस्थिती आहे. उद्धवसाहेबांवर हे दिवस आले कारण अगोदर हे समन्वय आणि ताकद टिकवून ठेवली असती तर समन्वय ठेवला पाहिजे, हे सांगायची गरज लागत नाही, असा टोला आमदार नीलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

नागपूरमधील न्यू एरा हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोरअरवर एफडीएची कारवाई

नागपूरमधील न्यू एरा हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरवर ‘एफडीए’ने केलेल्या कारवाईत विना परवाना साठवून ठेवलला तब्बल २० लाखांचा औषधसाठा जप्त केला आहे. रुग्णालयाच्या बेसमेंटमधून हा औषधसाठा जप्त करण्यात आलेला आहे. हॉस्पिटलच्या प्रशासनाला औषध खरेदीची कागदपत्रे सादर करता आली नाहीत, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

राजेश क्षीरसागर यांना अडचणीत आणण्याचे हे षडयंत्र आहे : चंद्रकांत पाटील

राजेश क्षीरसागर यांना नॉर्मल मार्गाने मागे ढकलता येत नाहीत; म्हणून असे प्रयत्न सुरू आहेत. महापालिका निवडणुकीच्या आधी सुद्धा हा प्रयोग झाला होता. मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. लोकांना माहिती आहे हा माणसांमधला खमका नेता आहे. आता जो प्रयत्न चाललाय, त्यातून काहीही हाताशी लागणार नाही. राजेश क्षीरसागर यांना अडचणीत आणण्याचे हे षडयंत्र आहे. अंबाबाई सगळं पाहत आहे तीच क्षीरसागर यांना या संकटातून बाहेर काढेल. आमदार सतेज पाटील यामध्ये आहेत की नाही मला माहित नाही. माझ्या हाती ज्यावेळी पुरावे येतील, त्यावेळी राजेश क्षीरसागर यांच्यापेक्षा स्ट्रॉंगली मी हा मुद्दा मांडेल. राजेश क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर कोणताही प्रस्ताव आणायचा असेल तर विधानसभा अध्यक्षांची परवानगी लागते. संसदीय आयुध कशीही वापरता येत नाहीत, असे खुलासा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

आम्ही शेजारी-शेजाारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या- देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरेंसोबतच्या एका विमानातील प्रवाशावीरल प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,सर्व्हिस फ्लाईटमध्ये जर आम्ही योगायोगाने एकत्र बसलो तर त्यावर एवढ्या चर्चा का करायच्या?, असं वाटलं, आपण वेड्यांच्या बाजारात बसलोय का?, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे एका बाजूला बसले होते आणि मी दुसऱ्या बाजूला पण आम्ही शेजारी-शेजाारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या अजून काय...अशी मिश्किल प्रतिक्रियाही देवेंद्र फडणवीसांनी दिली. माझी सवय आहे की, मी विमानात बसल्यावर मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेली वेबसिरीज पाहात होतो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रातील काठमांडूमध्ये अडकलेल्या 200 भाविकांना लवकरच व्हिसा मिळणार

महाराष्ट्रातील काठमांडूमध्ये अडकलेल्या तब्बल 200 भाविकांना लवकरच आता व्हिसा मिळणार आहे... कैलास मानसरोवरावर यात्रेसाठी गेलेले महाराष्ट्रातील पर्यटक चिनी दूतावासाकडून व्हिसा न मिळाल्यानं खोळंबलेत.. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून चिनशी संपर्क सुरू असून सोमवारपर्यंत चिनी दूतावासाकडून आवश्यक सहाय्यता प्राप्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Beed Ghule Case घुले प्रकरणात मोठी अपडेट! घुले कुटुंबाची पोलिसांकडे संरक्षणाची मागणी

बीडच्या केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. मयत विलास घुलेंचे बंधू रमेश घुलेंनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. मुख्य आरोपी रामेश्वर गायकवाडनेच घराशेजारील कारखान्यात या खुनाचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर जिवाला धोका असल्यानं घुलेंनी पोलीस संरक्षणाची मागणी केलीय.

TET Exam Leak : TET पेपरफुटीप्रकरण, 3 आरोपींना अटक, थोड्यावेळात कोर्टात हजर करणार

भिवंडीच्या कोनगावमधून TET चा पेपर 1.5 कोटीला विक्रीसाठी आला होता. पोलिसांनी सापळा रचून बिहारचे राजू शाव, आकाश कुमार 30 आणि हरियानाचे धीरज सिंग 28 या तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून 4 प्रश्नपत्रिका संच जप्त करण्यात आले होते. या तिघांविरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांची रात्रभर केलेल्या चौकशी काय निष्पन्न होतो हे पाहणं गरजेचं असून कोर्ट त्यांच्या पोलिस कोठडीबाबत काय निर्णय देणार आहे हे पाहणं गरजेचं आहे.

Nandurbar Crime News : दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश; 32 दुचाकी जप्त, महाराष्ट्र, गुजरात अन् मध्य प्रदेशातील 19 गुन्हे उघडकीस...

नंदुरबार जिल्ह्यात मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे 30 लाख 30 हजार रुपये किमतीच्या 32 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, तीन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी ही कारवाई केली.

Amravati Congress : NEET अन् TET पेपरफुटीप्रकरण; युवक काँग्रेस अन् NSUI आक्रमक, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

अमरावतीत नीट परीक्षेतील गैरव्यवहाराच्या वादानंतर आता टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून युवक काँग्रेस आणि एनएसयूआय आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करत कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात आंदोलन केले. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Solapur News : पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण; अल्लाहकडे पावसासाठी साकडे...

जून महिना संपत आला तरी सोलापूरसह राज्यातील अनेक भागांत पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असून पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. पाण्याच्या साठ्यात झपाट्याने घट होत असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील मुस्लिम समाजबांधवांनी रविवारी अल्लाहकडे पावसासाठी विशेष प्रार्थना करत ‘सलातुल इस्तिस्का’ ही पावसासाठीची विशेष नमाज अदा केली.

Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांच्या भक्तीगीताची सोशल मीडियावर हवा! 'विठू माऊली तू माऊली जगाची' गीत स्वतः गायलं...

मंत्री गुलाबराव पाटील यांनी 'विठू माऊली तू माऊली जगाची' हे अजरामर भक्तीगीत स्वतःच्या आवाजात गायले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी हे गाणे गातानाचा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत 'Gulabrao Patil Official' या युट्युब चॅनेलवर शेअर केला आहे. त्यांच्या या गाण्याची सध्या सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

Karachi Suicide Attack : पाकिस्तानातील कराचीत सिंध रेंजर्सच्या मुख्यालयाजवळ भीषण आत्मघाती हल्ला

पाकिस्तानातील सर्वात मोठे शहर असलेल्या कराचीमध्ये शनिवार संध्याकाळी एका भीषण आत्मघाती हल्ल्याने आणि अंदाधुंद गोळीबाराने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. कराचीच्या गुलिस्तान-ए-जौहर भागातील 'पाकिस्तान रेंजर्स'च्या मुख्यालयाला लक्ष्य करत हा दहशतवादी हल्ला करण्यात आला. सुरुवातीला एकापाठोपाठ झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटांच्या आवाजाने परिसर हादरला, ज्यानंतर सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू झाली. या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी आहेत.

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; चोरीच्या 30 दुचाकी जप्त

जळगाव जिल्ह्यातील वाढत्या वाहनचोरींना आळा घालण्यासाठी मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत 30 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत दोन आरोपी आणि दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 25 लाख 80 हजार रुपये आहे.

Beed Crime : विलास घुले खून प्रकरणात पीडित पकुटुंबीयांनी घेतली पोलिस अधीक्षकांची भेट...

बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणात आता आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. मृत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी आज बीडचे पोलीस अधीक्षकांची भेट घेत महत्त्वाच्या मागण्या केल्या. खुनाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटी पथकात काही विशिष्ट अधिकाऱ्यांचा समावेश करावा. तसेच मुख्य आरोपी रामेश्वर गायकवाड यांनीच हे खुनाचं षडयंत्र रचलं, त्यामुळे त्यालाही अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच स्वतःवर आणि फिर्यादी उमेश माने यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आई-वडिलांनीच सियाचा खोटारडेपणा आणला समोर 

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सिया गोयलने पोलिसांना खोटी माहिती सांगितल्याचं आता समोर आलं आहे.पोलीस चौकशीत सिया गोयलने तिला केतन अग्रवालसोबत लग्न करायचं नव्हतं आणि हे तिने तिच्या घरच्यांना सांगितल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता सियाचे वडील प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांनी 'केतनशी लग्न करायचं नाही, हे सियानं कुणालाही सांगितलं नव्हतं असं म्हटलं आहे. त्यामुळे आता सियाचा खोटारडेपणा समोर आला आहे.

अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप, उत्तर भारतातील राज्यीह हादरली

भारताच्या शेजारील देश अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. हा भूंकप संध्याकाळी 7 वाजता झाला असून या भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल होती. दरम्यान, या भूकंपाचे हादरे भारतातील काही राज्यांना बसल्याचं सांगितलं जात आहे.

पाथरीत रात्रीत उभारला शिवाजी महाराजांचा पुतळा

परभणीतील पाथरी शहरातील सेलू कॉर्नर येथील नियोजित पुतळ्याच्या जागेमध्ये रात्री शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार सईद खान यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंगेंच्या शिवसेनेत गेलेले खासदार संजय जाधव यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरेंचा आज फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा

ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आज परभणी आणि धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 11 वाजता परभणी येथे उद्धव ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली आहे. तर दुपारी धाराशिवमधील शिवसैनिकांना ठाकरे संबोधित करणार आहेत. परभणी आणि धाराशिवमधील खासदार फुटल्यानंतर ठाकरेंनी या मतदारसंघात आपला दौरा काढत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सुरूवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com