Maharashtra Live Updates : म्हाडाकडून 5 हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर, अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama
Published on
Updated on

Mhada Lottery News : मुंबईतील घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाकडून 5 हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर

मुंबईत हक्काचे घर मिळणवण्याची मोठी संधी चालून आली असून म्हाडाकडून 5 हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने 5 हजार 285 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढली ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.

Dhule News : कलमाडी ग्रामपंचायतीत उपसरपंच व ग्रामस्थांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी ग्रामपंचायमध्ये उपसरपंच व ग्रामस्थांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. तर ही हाणामारी गटारीच्या कामावरून उफाळलेल्या वादानंतर झाली. तर उपसरपंच जाणीवपूर्वक खासगी मालकीच्या जागेतून अतिक्रमण असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Nanded Crime News : नांदेड गुरुद्वारा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात 9 आरोपींविरुद्ध 12 हजार कागदपत्रांचे दोषारोपपत्र

नांदेडच्या गुरुद्वारा परिसरात चार दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात रवींद्रसिंघ दयालसिंघ राठोड यांचा मृत्यू झाला होता. तसेच जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेला गुरुमितसिंघ सेवालाल हा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी 9 आरोपींविरुद्ध आज नांदेड न्यायालयात दहशतवाद विरोधी पथकाने दोषारोपपत्र दाखल केले. हे दोषारोपपत्र 12 हजार कागदपत्रांचे आहे.

Devendra Fadnavis News : मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार; फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नावं बदलण्यासह येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा का नाही अशी विचारणा विधानसभेत आज करण्यात आली. या बाबतचा प्रश्न शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी विचारला होता. तसेच त्यांनी, रेल्वे स्थानकाचं नाव बदलून जगन्नाथ नाना शंकरशेठ असं करण्याबाबतच्या प्रस्तावाबाबत आला आहे का? असाही सवाल केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली आहे. फडणवीस यांनी, रेल्वे स्थानकाच्या पूर्नविकासाच्या प्रकल्पाबाबत काम सुरू असून आराखडा तयार करण्यात आलेला आहे. याच आरखड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असल्याचे सांगिलतलं आहे.

Uddhav Thackeray News : शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह सुणावणीबाबत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह सुणावणीबाबत सुनावणी सुरू झाली असून या प्रकरणात ऑगस्टमधील तारीख देण्याचा प्रयत्न करू असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यानंतर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, न्यायालय जर ऑगस्टमध्ये निकाल देणार असेल तर हे नक्कीच समाधानकारक गोष्ट असेल. आमची शेवटची आशा ही सर्वोच्च न्यायालयच असून तेथेच चोरीच्या प्रकरणाचा न्याय निवाडा होईल.

mumbai airport plane accident averted : मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला; मालवाहू ट्रकची विमानाला धडक, उड्डाण रद्द

गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले होते. या घटनेत 241 विमान प्रवाशांसह 19 इतरांचा मृत्यू झाला होता. यानंतर विमान अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. आजही मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात टळला. टेकऑफपूर्वी एका मालवाहू ट्रकने अकासा एअरलाइन्सच्या (QP1410) विमानाला धडक दिली. यामुळे विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले असून विमानाचे नुकसान झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com