पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवीन अपडेट आली आहे. वैष्णवीचा मृत्यू हा कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठीचा अत्याचार यामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महिला व बालहक्क समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालातून ही माहिती समोर आली आहे.ती फक्त आत्महत्येची घटना नाही तर तो हुंडाबळीचा प्रकार असूनया दिशेने पोलिसांनी तपास करावा, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल मीरारोड येथे झालेल्या सभेवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. मीरा रोडची सभा घेण्याऐवजी ही सभा नया नगरमध्ये घ्यायला हवी होती. त्याठिकाणी चुकून पण कोणी मराठी बोलत नाही. ते संविधान मानत नाही. नया नगरमध्ये थेट धमकी देतात, मराठी नाही बोलणार. गरीब हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा जे खुलेआम धमक्या देत आहेत, त्यांना मराठी शिकवा, अशा शब्दात नितेश राणे यांनी राज ठाकरेंना सुनावलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खासदार संजय राऊतांच्या घराकडे रवाना झाले आहे.संजय राऊत यांच्या आईला भेटण्यासाठी ते जात असल्याची माहिती आहे. ही खासगी भेट असल्याचे सांगण्यात आले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल मीरारोड येथे झालेल्या सभेवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. मीरा रोडची सभा घेण्याऐवजी ही सभा नया नगरमध्ये घ्यायला हवी होती. त्याठिकाणी चुकून पण कोणी मराठी बोलत नाही. ते संविधान मानत नाही. नया नगरमध्ये थेट धमकी देतात, मराठी नाही बोलणार. गरीब हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा जे खुलेआम धमक्या देत आहेत, त्यांना मराठी शिकवा, अशा शब्दात नितेश राणे यांनी राज ठाकरेंना सुनावलं.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे नेते, बच्चू कडू यांनी येत्या 24 तारखेला चक्काजामचा इशारा सरकारला दिला आहे. कर्जमाफी संदर्भात सरकार जोपर्यंत ठोस भूमिका घेत नाही, कर्जमाफीची तारीख सांगत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन हे सुरूच राहणार, असे बच्चू कडू यांनी ठामपणे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांच्या निवासस्थानी चोरी झाली आहे. मोलकरणीने कपाटातून एक लाख रुपये चोरल्याची प्राथमिक माहिती आहे. नाशिक रोड पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोलकरणीला अटक करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना पुण्यात डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे. पुण्यातील अलका चौक येथे लावलेल्या बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेनं आदित्य ठाकरे यांना चिडवण्याचा प्रयत्न केला आहे. 'ही बॅटरी लवकरच संपणार, कारण ही घराणेशाहीवर चालते,'असा मजकूर या बॅनरवर आहे.
निशिकांत दुबे याने 'मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी ?' असे ट्विट केले आहे. ट्विट करताना राज ठाकरे जाहीर सभेतून त्यांना उत्तर देत असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. राज ठाकरेंना हिंदी शिकवली असे म्हणत दुबे यांनी ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी ? https://t.co/5YpM1SrzDt
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) July 18, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. सकाळपासून त्यांनी बारामतीमधील विविध विकासकामांची पाहणी केली. शहरातील सिद्धेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीच दर्शन घेतल्यानंतर त्यांनी विकासकामांची पाहणी सुरु केली असून आज ते बारामतीमधील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणेंवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला, पण मेरिटवर आपला पराभव झाला नाही. नोट घ्या मतदान करा, असं करत विरोधकांनी 120 कोटी रुपेय वाटले म्हणून ते विजयी झाले. पण आम्ही आर्शिवाद मागितले आणि मतदारांनी चार लाख मते दिली. पुन्हा निवडणुका येतील पुन्हा उभे राहू पुन्हा जिंकू कारण इथला खासदार कोण आहे हे कुणाला माहिती देखील नाही, अशा शब्दात राऊतांनी नारायण राणेंवर टीकास्त्र डागलं.
दौंड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढलेले रमेश थोरात शरद पवारांची साथ सोडण्याची शक्यता आहे. लवकरच बैठक घेत कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते प्रवेश करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत थोरात यांना भाजप उमेदवार राहुल कुल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
निशिकांत दुबे याने 'मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी ?' असे ट्विट केले आहे. त्याने ट्विट करताना राज ठाकरे जाहीर सभेतून त्याला उत्तर देत असलेल्या व्हिडिओ देखील रिट्विट केला आहे. राज ठाकरेंना हिंदी शिकवली असे म्हणत दुबे यांनी ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
सामनाच्या मुलाखतीत भाजपला स्वबळावर इतक्या जागा मिळतील असं तुम्हाला वाटलं होतं का? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, मला सोडा पण त्यांनाही स्वप्नात असं कधी वाटलं नसेल. भाजप सोडा, शिंदे गटालाही पन्नासच्या वर जागा मिळाल्या. हा जादूटोणा आहे की काय? यावर बोलताना, कदाचित त्यांनी डायनासोर कापला असेल, असा टोलाहू उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लगावला.
निवडणूक आयुक्तांना शिवसेना हे नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकारच नाही, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. संजय राऊतांनी शिवसेना चिन्ह आणि नावा संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ठाकरे म्हणाले, कदाचित निवडणूक आयोग आमचं निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो किंवा गोठवू शकतो, पण ‘शिवसेना’ हे नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाहीत. त्यांना तो अधिकारच नाही. कारण हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का? या धोंड्याला पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही वेडंवाकडं वागलो असू तर गोष्ट वेगळी, पण संविधानानुसार आम्ही काही चूक केली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाहीत. मतांची टक्केवारी वगैरे जे काही असेल ते चिन्हापुरतं आहे मात्र, नाव दुसऱ्याला देऊ शकत नाहीत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे.
परिचरिकांचा राज्यव्यापी संप सुरू असताना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने एक पत्र जारी केलं आहे. त्यामध्ये प्रोबेशनवर असलेल्या अधिपरिचारिका संपात सहभागी झाल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल असा इशारा राज्य सरकारच्या वैद्यकीय संचलनालयाने दिला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या त्रुटी आणि इतर मागण्या संदर्भात शासकीय रुग्णालयातील परिचरिकांचा 18 जुलैपासून बेमुदत संप सुरू आहे. त्यामुळे ज्या प्रोबेशनवर असलेल्या परिचारिका या संपात सहभागी असल्याचे निदर्शनास येणार त्यांची सेवा विना चौकशी समाप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी मिरा भाईंदरमधील भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यात त्रिभाषासूत्री लागू केल्यास दुकानच नाही तर शाळाही बंद करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. शिवाय भाजचा मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीआधीपासून आहे. आताही भाजपच्या डोक्यात तेच आहे, असंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, राज यांच्या भाषणावर आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "हिंदी विरुद्ध मराठी असा संघर्षच नाही. मात्र, राज ठाकरे तो जाणीवपूर्वक दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठी सक्तीची आहे, मात्र हिंदी सक्तीची नाही हे देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलं आहे. महापालिका निवडणुका जवळ आल्या की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न आहे, अशी भाषणं काही नेते वर्षानुवर्षे करत असतात. राज ठाकरेंनी तीच री ओढावी, हे दुर्दैवी आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.