विधिमंडळाच्या सभागृहात एकीकडे ऑनलाइन गेमिंगमुळे युवापिढी बरबाद होत आहे. त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याने यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली असतानाच आता ऑनलाइन रमीवर बंदी घाला अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पत्राद्वारे केली आहे.
राज्यात सध्या हनी ट्रॅपचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या हनी ट्रॅपमध्ये काही आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी असे साधारण 70 पेक्षा जास्त जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची चौकशीही सुरु असल्याचे बोलले जात असून काही अधिकाऱ्यांनी आपले फोन फॉरमॅट केले आहेत. दरम्यान, एकीकडे या हनी ट्रॅपची राज्यभरात चर्चा सुरु असताना आता दुसरीकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी खळबळजनक दावा केला आहे. प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीला हनी ट्रॅपबद्दल सगळे माहिती आहे. तसेच या प्रकरणीच एसआयटीमार्फत चौकशी करावी, असी मागणीही त्यांनी केली आहे.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने शिरसाट यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच त्याने शिरसाट यांच्या घराच्या परिसरात आरडाओरडही केली आहे. सौरभ घुले असे हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार हल्ला करताना हा तरूण मद्यधुंद अवस्थेत होता. ही घटना समोर येताच याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठवाडयातील छावा संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. या राड्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. या मारहाणीत जखमी झालेल्या छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाडगेंची यांची भेट मनोज जरांगे-पाटील घेणार आहेत. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांची कृतीची पक्षाने गंभीर दखल घेतली असून त्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चव्हाण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. लातूरमध्ये कोकाटे यांच्या पत्ते खेळण्याविरोधात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकून निषेध केला म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटाचे प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या आंदोलकांना जबर मारहाण केली होती. त्यामुळे सूरज चव्हाण यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
लातूरमधील मारहाणीच्या घटनेचे पडसाद धाराशिवमध्येही उमटण्याची शक्यता असल्याने सूरज चव्हाणांना दौऱ्यातून वगळण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर धाराशिवमधील छावा संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. या राड्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुरज चव्हाण यांना तडकाफडकी बोलावून घेतल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईचे संकेत देण्याबरोबरच, छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना केलेल्या मारहाणीची दखल घेत, सुरज चव्हाण यांची कृतीची पक्षाने गंभीर दखल घेतल्याचे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. मंत्री कोकाटे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते चव्हाण यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत.
'ज्या पुरावांच्या आधारावर मुंबई (Mumbai) सत्र न्यायालय शिक्षा थोठवतो, तेच पुरावे उच्च न्यायालयात टिकतं नसतील तर चूक कोणाची?', असा सवाल मुंबई साखळी बाॅम्बस्फोटात विशेष सरकारी वकील तथा खासदार उज्ज्वल निकम यांनी केला आहे. कायद्याचे विश्लेषण करताना चूक झाली की यंत्रनेणे चुकीचे पुरावे गोळा केले, याचे पोस्टमार्टम यथावकाश होईल. परंतु आज आरोपीची मुक्तता होणे गंभीर आहे, मला खात्री आहे सरकार सर्वोच न्यायालयात अपिल दाखल करेल, असे उज्जव निकम यांनी म्हटले.
पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरूर बसस्थानकात बसमध्ये सोबत असलेल्या मालासह बसण्याच्या वादातून प्रवासी व वाहक यांच्यात बाचाबाची झाली. बसमध्ये गर्दी असल्याने याच वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन बाप-लेक आणि साथीदार, अशा तिघांनी मिळून चालक-वाहकाला कॉलरला धरून ओढत नेले आणि मारहाण केली. या धक्कादायक घटनेत वाहकाच्या जवळील 21 हजार रुपये गहाळ झाल्याची माहिती असून, याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात सुरू असलेल्या राजकीय मारामाऱ्यांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप (BJP) महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, 'हा त्रिकोण, चौकोन नाही, तर ही सायकल सुरू केली आहे. महाराष्ट्राचा सुसंकृत सभ्यपणा गुंडाळून टाकण्याचा प्रयत्न आहे. वारकरी संप्रदायाची ओळख नष्ट करायची आहे आणि झुंडशाहीचा महाराष्ट्र ओळख निर्माण कराची आहे'.
'राज्याच्या विधिमंडळ लोकांचे प्रश्न, जनसामान्यांची प्रश्नावर चर्चा करणारे सभागृह नव्हे, तर मवाली, गुंडाचा अड्डा झाल्याचे अधोरेखित झाले आहे. हा काळू-बाळू-निळूचा तमाशा आहे. एकाने 'डब्ल्यूडब्ल्यूएफ'चा आखाडा, तर दुसऱ्याने 'क्लब' बनवला आहे', असा घणाघात काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर केला. या सर्व विषयांची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे 135 आमदार निवडून आल्यावरही एवढा दुबळा, लाचार मुख्यमंत्री असल्याचं वारंवार अधोरेखित होत आहे, अशी टीका सपकाळ यांनी केला.
अहिल्यानगर इथं शनिशिंगणापूर इथं शनिदर्शन घेतल्यानंतर शिवसेना (Shivsena) मंत्री संजय शिरसाट यांनी नाशिकच्या चांदवड तालुक्यातील मालसाने इथल्या नमोतीर्थकार इथं जैन धर्मियांचे मोठ्या तीर्थक्षेत्रां काम चालू असून तिथं भेट दिली. यावेळी जैन धर्मगुरूंचं मंत्री शिरसाट यांनी आशीर्वाद घेतले. 'मी साकडे वैगरे घालत नाही. पण आशीर्वाद सर्वांचा असला पाहिजे. मी त्या जोरावरच इथंपर्यंत आलो आहे. त्यामुळे साकडे घालणे, नवस करणे हे मी करत नाही. आशीर्वाद मी नेहमी सर्वांचा घेत असतो', असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी केलेल्या बेदम मारहाणीनंतर त्याचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. छावा संघटनेचे कार्यकर्ते राज्यभर आक्रमक झाले आहेत. धाराशिवमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते उडवले आहेत. तसेच कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजीसह बॅनर फाडले, बॅनरवर कार्यकर्त्यांकडून दगडफेक केली. यामुळे तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात आहे. जुगाऱ्याचा राजीनामा झालाच पाहिजे, सुरज चव्हाण याची हकालपट्टीची मागणी छावा संघटनेने केली.
उज्वल निकम यांनी आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निकालावर बोलताना सांगितले की, सरकारला पुन्हा निकालचा चाचपणी करून सुप्रीम कोर्टात अपिल दाखल करावे लागेल. जर सुनावनीत शिक्षेवर स्टे मागितला असेल तर आरोपी लगेच तुरुंगाबाहेर येणार नाहीत. सरकारला निकालपत्राचे मुल्यमापण करावे लागले.
मुंबई हायकोर्टाकडून 2006 मध्ये झालेल्या साखळी बाॅम्बस्फोटमधील 12 आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 12 पैकी पाच आरोपींना पाच जणांना फाशीची शिक्षा झाली होती. तर, सात जणांना जन्मठेप सुनावण्यात आली होती. मात्र, आता सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
मुख्यमंत्री देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात, महाराष्ट्रात हनीट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले मी दिलेल्या फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊद्या! दुध का दूध पानी का पानी होईल! ४ मंत्री अनेक अधिकारी अडकले आहेत! शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार (तेंव्हा )याच ट्रॅप मुळे पळाले, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज धारशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तुळजाभवानी देवीचे आशीर्वाद घेऊन करणार धाराशिव दौऱ्याला सुरुवात करतील. लातूरच्या राड्यानंतर धाराशिवमधील शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. मारहाणीच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण यांच्याकडून छावाचे प्रदेशाध्यक्षांना मारहाण झाली. त्याच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक देण्यात आली आहे. मारहाण करणार्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
आजपासून (सोमवार) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. सर्वपक्षीय बैठक रविवारी पार पडली. या बैठकीत विरोधकांकडून ऑपरेशन सिंदूर, अमेरिकेकडून लादलेले टॅरिफ, बिहारमधील मतदारयाद्या पुनरावलोकन आदी मुद्यांवर चर्चा करण्याचे मुद्दे माडंले. या सर्व मुद्द्यांवर चर्चेची तयारी असल्याचे सरकारने बैठकीत स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्यासमोर पत्ते टाकण्यात आले. ‘छावा’ संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांच्या या कृतीनंतर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी त्यांना मारहाण केली. या मारहाणीनंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. लातूर शहरात रात्री उशिरापर्यंत या मारहाणीचे तीव्र पडसाद उमटले. छावा संघटनेच्या कार्यकर्ते लातूर शहरात रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर फाडत संताप व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.