
काहीच इराण-इस्रायल युद्धाचा भडका उडाला होता. तो आता कुठं शांत झाला असतानाच आणखी एका युद्धाला सुरुवात झाली आहे. इस्रायलने स्वैदा प्रदेशात हल्ला करत सीरियाशी युद्धाला सुरूवात केला आहे. इस्रायलने स्वैदा प्रदेशातील सैन्यावर थेट हल्ला करत सीरिन रणगाड्यांवर दिवसाढवळ्या बॉम्बचा वर्षाव केला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सुमारे 40 कोटींच्या घोटाळ्याच्या विरोधात भाजपचे आमदार चांगलेच आक्रमक झाले आहेत. तब्बल चाळीस कोटींचा महसूल बुडवणारे सहनिबंधक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सचिव राजेश भुसारी यांना कोण अभय देत आहे? त्यांची पाठराखण का केली जातेय? असा सवाल विधानसभेत आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके आणि आमदार आशिष देशमुख यांनी उपस्थित केला. त्यानंतर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी लाचलुचपत विभागाकडून भुसारी यांच्या संपत्तीची चौकशी, गरज भासल्यास त्यांची पेन्शनसुद्धा थांबविण्यात येईल अशी घोषणा विधानसभेत त्यांनी केली.
लातूरच्या एकुर्गा येथील जिल्हा परिषद शाळेत आठवी वर्गाची मान्यता द्या, या मागणीसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी लातूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळा भरवत ठिय्या मांडला. सकाळी 11 वाजता ठिय्या मांडलेले 150 विद्यार्थी रात्रीचे आठ वाजले तरीही दालना बाहेरच बसून आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे.
धुळ्यात एमआयएमला मोठा धक्का बसला असून धुळे शहराचे माजी आमदार फारुक शहा यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. हा पक्ष प्रवेश मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती पार पडला. यामुळे स्थानिकच्या तोंडवार एमआयएम पक्षाला हा मोठा धक्का मानला जात असून राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळणार आहे.
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा दिला आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली सावकरांवरील याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यांच्याविरोधात अभिनव भारत काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंकज फडणीस यांनी याचिका दाखल केली होती. ज्यात राहुल गांधी यांना न्यायालयाने सावरकरांबद्दल अधिक माहिती मिळावी यासाठी याचिकेची प्रत वाचण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.
Maharashtra Politics News : शिंदेंचे शिलेदार शिरसाट आणि गायकवाड मोठ्या अडचणीत; फडणवीसांसह शिंदेंनीही झापलं!
एकानाथ शिंदेंचे शिलेदार आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट चांगलेच अडचणीत आले आहेत. गायकवाड यांची कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण आणि मंत्री शिरसाटांचा बेडरुममधला पैशांची बॅग असलेल्या व्हिडीओ व्हायरल झाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन्ही नेत्यांना वॉर्निंग दिली आहे. तर शिंदेंनी देखील या दोन्ही नेत्यांना झापलं आहे. तर चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका. बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल, असा थेट इशाराच शिंदेंनी या दोन्ही नेत्यांना दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.