संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले, आरोप करणे विरोधकांचे कामच आहे. ते बोलणारच आहेत. बीडच्या घटनेवर दोन दिवस चर्चा झाली. त्यामुवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देणार होते. मी सभागृहात उपस्थित राहिल्यास त्यांची अडचण होऊ शकते. आज फडणवीस यांनी या प्रकरणावर सविस्तर उत्तर दिले आहे. पोलिस तपास करत आहेत त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल.
छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नसल्याचे समात परिषदेचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. आंदोलन करत ते अजित पवारांवर राग व्यक्त करत आहेत. अजित पवारांच्या विरोधात होणाऱ्या या आंदोलनाचा निषेध राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे. तसेच मी स्वतः स्वतः समीरदादा भुजबळ यांच्या संपर्कात आहे तर, राज्याचे प्रांताध्यक्ष छगन भुजबळसाहेब यांच्या संपर्कात असल्याचे देखील चाकणकर यांनी सांगितले.
कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज विधानभवनात मराठी माणसाला मारहाण झाल्याचे पडसाद उमटले होते. मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, असे फडणवीस विधानभवनात सांगितले होते. मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, माजोरड्यांचा माज उतरवणार, अशा इशारा फडणवीस यांनी दिला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारणीची उद्या (शनिवारी) पुण्यात बैठक होत आहे. पक्षातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पक्ष संघटना आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचीही याच विषयावर पुण्यात उद्या बैठक होत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत राज्यसभेत केलेल्या विधानावरुन काँग्रेसने आज मंत्रालयाबाहेर आंदोलन केले. अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शहा यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलक करीत होते.
बीड, परभणी या घटना गंभीर आहेत, या प्रकरणात फक्त पोलिस अधिकाऱ्याची बदली करुन उपयोग नाही, त्याच त्यांचा दोष नसावा, यामागे कोण आहे, याचा तपास करणं गरजेचे आहे. महाराष्ट्रात अशा घटना का होत आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे, राज्याला गृहमंत्री नाही, त्यासाठी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात पुढाकार घ्यावा, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. राहुल गांधी यांच्या गुन्हा दाखल होणे ही चुकीची आहे, ही वेदनादायक घटना आहे, देशातील विविध भागाकरुन संसदेत आपले प्रश्न सोडविण्यासाठी येथे येतात. पण संसदेचे कामकाज होत नाही.
कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण झाल्याचे पडसाद आज विधानभवनात उमटले. मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. कुणाच्या काळात मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला, असा प्रश्न करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला टोला लगावला. मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, माजोरड्यांचा माज उतरवणार, अशा इशारा फडणवीस यांनी दिला. मराठी माणसाला चीड आणणारी ही घटना आहे, असे फडणवीस म्हणाले.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोका लावू, असे सांगितले असून एसआयटी चौकशी करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अधिवेशनात फडणवीस यांनी दिलेल्या निवेदनावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी समाधान व्यक्त केले आहे. उद्या माझ्या भावाच्या तेरावा आहे. त्यापूर्वी आरोपींना जेरबंद करा, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी फडणवीसांकडे केली आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच सतोष देशमुख यांच्या हत्येबाबत फडणवीस हे सभागृहात निवदेन देत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची माहिती फडणवीस सभाग़हाला देत आहेत. आरोपी वाल्मिक कराड याच्या विरोधात पुरावे मिळाले तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. कराड याने दोन कोटीची खंडणी मागण्याची धमकी दिली होती, असा आरोप आहे, या प्रकरणातील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी आढळल्यास त्यांच्यावर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्यात येईल. एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, देशमुखांच्या कुटुंबियांनी 10 लाखांची मदत सरकारकडून करण्यात येईल, असे फडणवीसांनी सांगितले. या प्रकरणात मास्टरमाईंड कोणीही असला तरी कारवाई करणारस असा शब्द फडणवीसांनी दिला.
परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात निवेदन देत आहेत. या प्रकरणी 51 जणांना ताब्यात घेतले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. सोमनाथ सूर्यवंशी हे कायद्यांचे शिक्षण घेत होते, ते जाळपोळ करीत असल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यांना न्यायालयीन कोठडीत त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोमनाथ यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाला नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत सरकारकडून केली जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.
ताम्हिणी घाटात बसला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. माणगाव पुणे मार्गावरील ताम्हीणी घाटात प्रवाशांनी भरलेली बस रस्ता लगत पलटली. या बसमधील अनेक प्रवासी जखमी होते, तर दोनपेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यु झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ताम्हिणी घाटातील वॉटरफॉल पॉईंटजवळ हा अपघात झाला. ही ट्रॅव्हल्सची बस चाकणवरून वीरवाडीला (महाड) लग्नाला चालली होती. दोन महिला, दोन पुरुषांचे मृतदेह बाहेर काढले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात हल्ले वाढले आहेत. संविधान वाचवण्यासाठी झगडावं लागत आहे. मराठी माणसाला हद्दपार करण्याचं कारस्थान सुरु आहे, मराठी माणसाला कमजोर करण्याचे काम भाजप करीत आहे. मुंबईचे गुजरातीकरण करण्याचे काम सुरु आहे, असा आरोप राऊतांनी आज केला. ते माध्यमाशी बोलत होते. कल्याणमध्ये परप्रांतियांनी मराठी माणसावर केलेल्या हल्ल्यांवरुन राऊत संतापले. मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसांची माफी मागावी, असे राऊत म्हणाले. मुंबईचे गुजरातीकरण करण्याचे काम सुरु असल्याचा आरोप राऊतांनी केला.
संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उद्या (शनिवारी) परभणी दौऱ्यावर आहेत. ते सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या अवमान प्रकरणासह सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलिसांच्या मारहाणीतील मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पवार हे शनिवारी परभणीत येत आहेत.रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते विजय वाकोडे यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करणार आहेत. त्यानंतर खासदार फौजिया खान यांच्या निवासस्थानी दुपारी ते पत्रकार परिषद घेणार आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू आणि सरपंच सतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्राचे राजकारण पेटलं आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यावरुन सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धारेवर धरलं. विविध आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत.यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सभागृहात उत्तर देणार आहे. संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सरपंच देशमुख यांची हत्या अत्यंत निर्घृणपणे करण्यात आली आहे. आमदार सुरेश धस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात याबाबत आवाज उठवला आहे. देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव आले आहे. वाल्मिक कराड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत.सभागृहात आमदार क्षीरसागर, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी केली आहे. सूर्यवंशी आणि देशमुख प्रकरणावर फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.
विधाससभेत पहिल्यांदाच निवडणूक आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-विर्तक लढवले जात आहे. काही दिवसापूर्वी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसह शरद पवारांची भेट घेतली होती. आता शरद पवार यांचे आमदार असलेल्या रोहित पवार यांनी अजितदादांची भेट घेतल्यामागे काय कारण आहे, अशी विचारणा करण्यात येत आहे. याबाबत खुद्द रोहित पाटलांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या मतदारसंघातील काही कामानिमित्त आपण अजितदादांची भेट घेतल्याचे रोहित पाटलांनी सांगितले. शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार सलील देशमुख यांनीही अजितदादांची भेट घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.