
राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यावर साडेचार महिन्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे आज मंत्रीपदाची शपथ घेत आहेत. भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
धनंजय मुंडे यांच्याकडे असणारं अन्न व नागरी पुरवठा खातं छगन भुजबळ यांना दिले जाणार असल्याचे समजते. धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या खात्यावर नाराज छगन भुजबळ यांचं फडणवीस यांनी पुनर्वसन केले आहे. यावर वाह फडणवीस वाह ! अशा खोचक शब्दात दमानिया यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जाणार? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ? असा काय नाईलाज आहे ? असा सवाल दमानिया यांनी फडणवीसांना केला आहे.
दमानिया म्हणाल्या, "भुजबळ यांच्या विरोधात मी लढले, पहिल्यांदा चीफ जस्टीस समोर उभं राहून लढले. त्यांच्यावर एफआयआर झाली, अडीच वर्षे ते जेलमध्ये होते. ते बाहेर येत असताना आम्ही धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढलो. धनंजय मुंडेंची दहशत बाहेर काढली. मला जेव्हा आज कळले छगन भुजबळ यांचा शपथविधी होत आहे. तेव्हा मला खूप राग आला,"
धनंजय मुंडे गेल्यावर परत त्या जागेवर भुजबळांवर जर तुम्ही संधी देत असाल तर असा त्रास जनतेला का देत आहात? आमच्या सारखा लोकांना त्रास देतात, जे भ्रष्टाचारा विरोधात लढत आहेत. तुम्ही आम्हाला संदेश देतात का की आमचं तुम्ही काही बिघडवू शकत नाही. मला खरा हा प्रश्न पडलाय की हा लढा पुढे चालू ठेवू की नाही? असे दमानिया यांनी म्हटलं आहे.
किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची
खालच्या घोषणा आठवतात ?
“भ्रष्टाचारीयो पर कारवाई के लिए, अब की बार ४०० पार”
“भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम”
हा आहे का तो बडा कदम ? ही ती कारवाई ?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.