
वालचंदनगर (पुणेः) : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून निकाल जाहीर झाला आहे. सभासदांनी पवार जाचक यांच्या युतीच्या पॅनेलवर विश्वास ठेवून श्री जय भवानीमाता पॅनेलकडे एकहाती सत्ता दिली.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय मेळाव्यात पृथ्वीराज जाचक हेच आगामी पाच वर्षे छत्रपती कारखान्याचे नेतृत्व करतील, असे जाहीर केले होते. या निवडणुकीचे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अजित पवार व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची युती झाल्यामुळे निवडणूक एकतर्फी होईल असे चित्र निर्माण झाले होते.
अजित पवार, क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रेय भरणे व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या पॅनेलच्या श्री जय भवानीमाता पॅनेलच्या २१ उमेदवारांनी श्री छत्रपती बचाव पॅनेलच्या उमेदवारांचा पराभव करु एकहाती सत्ता मिळवली आहे.
अजितदादांना शेतकरी मेळाव्यात केलेल्या घोषणेमुळे पृथ्वीराज जाचक हेच कारखान्याचे अध्यक्ष होणार हे निश्चित झाले आहे. निवडणूकीपूर्वीच अजितदादांनी जाचक यांचे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर केले होते, आता त्यांच्या नावाची घोषणा करणे एवढीच औपचारिकता बाकी असल्याचे बोलले जाते.
गट नंबर - १ पृथ्वीराज साहेबराव जाचक ( ११६९४), अॅड.शरद शिवाजी जामदार (१०५२९),
गट नंबर-२ रामचंद्र विनायक निंबाळकर (१०९२९) , शिवाजी रामराव निंबाळकर (१०४३१)
गट नंबर -३ पृथ्वीराज श्रीनिवास घोलप (९६७२) , गणपत सोपाना कदम ( ९२९७) .
गट क्रमांक- ४ प्रशांत दासा दराडे (१११८०), अजित हरिश्चंद्र नरुटे(११०९०) , विठ्ठल पांडुरंग शिंगाडे ( १०२३५)
गट क्रमांक - ५ अनिल सिताराम काटेे ( ११७८९), बाळासाहेब बापुराव कोळेकर (११७६८ ) , संतोष शिवाजी मासाळ (१०३०५)
गट क्रमांक - ६ कैलास रामचंद्र गावडे (११८३२), निलेेश दत्तात्रेय टिळेकर (११५६३) सतीश बापुराव देवकाते (११२६१)
सुचिता सचिन सपकळ (१०३८४)
माधुरी सागर राजापुरे (१०७७४)
तानाजी ज्ञानदेव शिंदे ( ११३५८)
मंथन बबनराव कांबळे ( ११५११) -
भटक्या विमुक्त जाती डॉ.योगेश बाबासाहेब पाटील (११८४३)
ब वर्ग - अशोक संभाजी पाटील ( २८०)
गट नंबर - १ संजय साेमनाथ निंबाळकर ( ४८५०) , प्रताप मोहन पवार (४१९७)
गट नंबर - २ संग्रामसिंह दत्तात्रेय निंबाळकर ( ५१६५) , महादेव बाळू सिरसट (३९५७)
गट नंबर - ३ करणसिंह अविनाश घोलप (६९६१) , तानाजी साहेबराव थोरात (४७२१)
गट नंबर - ४ बाबासाहेब भगवान झगडे (४९४०), राजेंद्रकुमार बलभिम पाटील (४८६०)
गट क्रमांक - ५ रवींद्र भिमराव टकले (५४८२)
गट क्रमांक - ६ नितीन अशोक काटे (५४३४) )
सिता रामचंद्र जामदार (४२८५)
पद्मजा विराज भोसले (४५४५)
संदीप वसंतराव बनकर ( ५१६७)
बाबासाहेब कांबळे ( ४९६१
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.