
कुर्ला येथे बेस्ट बस अपघात दुर्घटना घडली होती.आता या प्रकरणी बसचालक संजय मोरेच्या जामीन अर्जाला पोलिसांनी विरोध दर्शवला आहे. आरोपी मोरेला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाऊ शकतो अशी भूमिका पोलिसांनी सत्र न्यायालयात मांडली आहे. याप्रकरणात बसमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता असा आरटीओचा अहवाल आला आहे. तसेच मोरे दारू प्यायला नसल्याचं फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आला असल्याची माहिती पोलिसांची कोर्टात दिली आहे. 9 डिसेंबरला झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला, तर 40 हून अधिक पादचारी जखमी झाले होते.
Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यानंतर विरोधकांकडून सातत्याने मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विचारणा केली असता विखे-पाटील म्हणाले, एसआयटी चौकशीचा अहवाल येऊ द्यात. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
Mumbai News : दौर्यात स्वागताला कुणीही पुष्पगुच्छ आणू नका, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यासोबतच दौर्याच्या वेळी पोलिस दलाकडून देण्यात येणारी मानवंदनेची प्रथा माझ्या दौर्यात बंद ठेवण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, एसपी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांना कळविले आहेत.
Pune News : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख (पुणे) या पदावर पदोन्नती झाली आहे. साताऱ्याचे कलेक्टर जितेंद्र डुडी हे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत. तर संतोष पाटील यांची बदली सातारा जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे.
Mumbai News : मंत्रालय सुरक्षा आढावा संदर्भात बैठक पार पडली. यावेळी आता मंत्रालयात फेस आयडीद्वारे प्रवेश मिळणार आहे. ज्या मजल्यावरील परवानगी मिळेल, त्याव्यतिरिक्त इतर मजल्यावर जाता येणार नाही. ज्या विभागात काम, तिथेच मिळणार प्रवेश. आता अभ्यांगतांना इतर ठिकाणी जाता येणार नाही. मंत्रालय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. क्युआर कोड असणार तो स्कॅन करावा लागणार आहे. जवळपास पुढील दोन महिन्यात ही सिस्टिम कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर सांगितले.
Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुरुवारी एसआयटीचे पथक केजमध्ये दाखल झाले आहे. पथकाचे प्रमुख बसवराज तेली हे केजला पोहोचले असून ते या ठिकाणी सुरु असलेल्या तपासाचा आढावा घेणार आहेत. मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची तेली घेणार आहेत. दरम्यान धनंजय देशमुख व एसआयटीचे इतर अधिकारी यांच्यात केज येथील शासकीय विश्रामगृहात चर्चा सुरू आहे. धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांच्या हत्येची बसवराज तेली यांना माहिती देणार आहेत.
Beed News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तपास चक्रे जोरात फिरली आहे. वाल्मिक कराड याच्या हत्येनंतर आता मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या शोधण्यासाठी CIDची 7 पथके देशभर रवाना झाली आहेत. यापूर्वी तो एका प्रकरणात फरार असताना तो नेपाळला गेला होता. हाच धागा घेऊन तो आताही नेपाळला गेला असेल, अशी शक्यता लक्षात घेऊन तपास सुरु आहे.
कल्याण पूर्वेतील 13 वर्षीय मुलीच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी कल्याण न्यायालयाच्या बाहेर नागरिकांचे मानवी साखळी बनवत हातात पोस्टर घेत गवळी याचा निषेध व्यक्त केला. विशाल गवळीला फाशी द्या! अशी मागणी हत्या झालेल्या मुलींच्या कुटुंबियांनी केली. जज साहब बच्ची के हत्यारो को फासी दो! अशा आशयाची पोस्टर नागरिकांच्या हातात होते. विशाल गवळी आणि साक्षी गवळी यांची सात दिवसाची पोलीस कोठडी संपली होती. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना आणखी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. सुनावणी दरम्यान पीडित मुलीच्या आई आणि वडील देखील न्यायालयामध्ये हजरहोते. न्यायालयामध्ये आई-वडिलांची साक्ष नोंदवली.
“आमचा पक्ष म्हणजे कार्यकर्ते तयार करण्याचा कारखाना आहे. शिवसेनेची बस रिकामी होते नाही. बसच्या पुढल्या दारातून उतरले की मागच्या दारातून लोकं परत चढतात, आमची बस भरलेलीच आहे. राजन साळवी यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. पराभवानंतर ते थोडे अस्वस्थ आहेत, राजकीय जीवनामध्ये एखादा पराभव वाट्याला येतो, पराभव पचवायची हिंमत नसेल तर त्याने स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मानू नये," असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. राजन साळवी ठाकरे गट सोडणार, यावर ते माध्यमाशी बोलत होते.
New Delhi : राजधानी नवी दिल्ली येथे वीर सावरकरांच्या नावानं कॉलेजची उभारण्यात येणार आहे. उद्या (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन होणार आहे. मोदी उद्या पूर्व आणि पश्चिम दिल्लीमध्ये दिल्ली विद्यापीठाअंतर्गत दोन कॅम्पसचे भूमिपुजनही करणार आहेत.दिल्ली विद्यापीठाच्या एका कॉलेजचे नाव विनायक दामोदर सावरकर असणार आहे. दिल्ली विद्यापीठात या अगोदरच उत्तर आणि दक्षिण असे दोन कॅम्पस आहेत. नव्यानं पूर्व आणि पश्चिम अशा दोन कॅम्पसची निर्मिती केली जाणार आहे. यामधील एका कॉलेजला सावरकर यांचं नाव दिलं जाणार आहे. याबाबत दिल्ली विद्यापीठाने निर्णय घेतला होता. त्यानुसार द्वारका आणि नजफगढ भागात तीन कॉलेजची निर्मिती केली जाणार आहे, यामध्ये एक विधी महाविद्यालयात असणार आहे
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडी करीत आहे. या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार आहेत. यावरुन सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धारेवर धरले आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरुन प्रशासनावर हल्लाबोल केला आहे.
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर उशिरा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज दुपारी होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार हे राज्याच्या बाहेर असल्याने ते बैठकीला उपस्थित राहणार नाही, असे समजते. याबाबतचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आगामी स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुकीचे लागले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आता 7, 8 आणि 9 जानेवारी रोजी मुंबईतील निरीक्षकांची बैठका होणार आहेत. महानगर पालिका निवडणकीच्या रणनितीसाठी पदाधिकाऱ्यांकडून ठाकरे आढावा घेणार आहेत.
खातेवाटपानंतर आज मंत्रिमंडळाची बैठक दुपारी बारा वाजता सुरु होणार आहे. या बैठकीबाबत बुधवारी मंत्र्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या महत्वाच्या बैठक काय निर्णय होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. शंभर दिवसांचा आढावा, आणि एसटी महामंडळ गैरव्यवहार यावर बैठकीत चर्चा होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.