
जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचं उद्धघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.वंदे भारत रेल्वेला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही पहिली वंदे भारत रेल्वे काश्मीरसाठी रवाना झाली आहे. येत्या काही दिवसात चिनाब पुल हा पर्यटकांचे केंद्र बनेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केले.
Shivsena: शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील सर्व प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. सुधाकर बडगुजर यांची पक्षातून ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर प्रथमच नाशिकमधील नेते उध्दव ठाकरे यांच्या भेटीला जात आहेत. सुधाकर बडगुजर यांच्या जागी दत्ता गायकवाड यांची शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. दत्ता गायकवाड यांच्यासह जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, वसंत गीते, सुनील बागुल आणि अन्य नेते 'मातोश्री'कडे रवाना झाले आहेत.
किल्ले विशाळगडावर कुर्बानीसाठी प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून कुरबानीसाठी परवानगी दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. विशाळगडावर कोणताही सण आणि उत्सव साजरा होणार नाही, अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर तातडीने सुनावणीस देण्यास नकार दिला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यांच्यातील युतीबाबत सध्या कुठलीही चर्चा नसल्याचे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. रोज सकाळी नऊ वाजता भोंगा वाजविण्याचा प्रस्ताव तयार करावा, असा टोला त्यांनी खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला.
अमेरिकन सरकारच्या नवीन विधेयक ‘वन बिग ब्युटीफुल बिल’वरून ट्रम्प आणि मस्क यांच्यातील शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. दोघांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. मस्क यांना 150 अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले आहे.भारतीय चलनानुसार हे नुकसान 12,88,069 कोटी रुपयांचं आहे. गुरुवारी टेस्लाच्या शेअर्सचे मूल्य 14% कोसळले आणि मस्क यांना एकूण 150 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठीची निवडणुकीत रंगत वाढत आहे. निवडणुकीच्या रिंगणात राजकीय नेते, माजी संचालक आणि स्थानिक मान्यवर उमेदवार म्हणून उतरले आहेत. अर्ज छानणीमध्ये १५४ अर्जांपैकी १४ अर्ज बाद झाले आहे. निवडणुकीच्या रिंगणात १४० उमेदवार आहेत. २९ जून रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
Mumbai News: मिठी नदीतील गाळ काढण्याचा घोटाळा प्रकरणी मुंबईत अनेक ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सकाळी छापेमारी केली. आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराची कथित चौकशी ईडीचे अधिकारी करीत आहेत. नदीच्या स्वच्छता प्रकल्पाशी संबंधित कथित आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचारात झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी ईडी अधिकाऱ्यांनी बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाच्या मुंबईतील घरावर टाकला छापा टाकला आहे
Pune: उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या पस्थितीत पुणे जिल्हा परिषद येथे शिवराज्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. किल्ले रायगडावर सहा जून तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून दीड लाख शिवभक्त गडावर दाखल होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.