
Harshvardhan Sapkal’s Attack: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर महायुती सरकारवर तीव्र हल्लाबोल केला,
Farmer : राज्यात दररोज सरासरी 6 शेतकरी आत्महत्या करीत असून, सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला.
Nevasa Incident: नेवासा तालुक्यातील बाबासाहेब सरोदे यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली, सरकारच्या निष्काळजी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
Mumbai News:शेतकरी कर्जमाफीवरुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री, महायुतीवर हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर युती सरकारचा सपकाळ यांनी समाचार घेतला.
महायुती सरकार हे शेतकरीविरोधी आहे. अदानी, अंबानीच्या फाईलवर सह्या करणाऱ्या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या हाताला शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर सही करण्यास लकवा मारतो काय? असा संतप्त सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
राज्यात दररोज 6 शेतकरी आत्महत्या करीत आहेत, परंतु महायुती सरकारला त्याचे काहीच सोयरसुतक नाही. राज्यातले सरकार फक्त गेंड्याच्या कातडीसारखे निगरगट्टच नाही तर नाही तर आंधळे, मुके व बहिरे आहे. या सरकारला भ्रष्टाचारापुढे शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही, अशी खंत सपकाळ यांनी व्यक्त केली आहे."शेतकऱ्यांनो, या निर्ढावलेल्या सरकारच्या भरवश्यावर राहू नका, आत्महत्या करू नका, तुमच्या मुलाबाळांचा, कुटुंबियांचा विचार करा,” असे आवाहन सपकाळ यांनी केले आहे.
अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलमध्ये बनवलेल्या व्हिडिओत सरोदे म्हणतात, “कर्जमाफी होऊन कर्जमुक्त होईल या आशेवर मी जगत होतो, या सरकारमध्ये गोरगरिब शेतकऱ्यांसाठी काहीच नाही म्हणून माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली”. हे ऐकून मन सुन्न झाले पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, व अजित पवार यांना याचे काहीच वाटत नाही. आजही ‘योग्यवेळी शेतकरी कर्जमाफी करु’, असे निर्लज्जपणे सांगितले जाते पण ही योग्यवेळ किती शेतक-यांचा बळी घेतल्यावर येणार आहे? असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.
बाबासाहेब सरोदे यांच्या सारखे शेतकरी दररोज जीवन संपवत आहेत, मायबाप सरकारच्या मदतीच्या आशेवर जगणारा गोरगरिब शेतकरी सरकारने केलेल्या फसवणुकीमुळे निराश आणि हताश झाला आहे. शेतीसाठी लागणारे बी, बियाणे, खते, डिझेल भाजपा सरकारने महाग केले, शेतमालाला भाव नाही, निसर्गही साथ देत नाही. वर्षाला ६ हजार रुपये तोंडावर मारून शेतकऱ्यांसाठी खूप काही केले अशा गप्पा मारणारे हे भाजपा युतीचे सरकार फक्त मलई खाण्यात मग्न आहे.
Q1: हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर कोणत्या मुद्द्यावर टीका केली?
A1: शेतकरी कर्जमाफी न दिल्याबद्दल सपकाळ यांनी सरकारवर टीका केली.
Q2: राज्यात दररोज किती शेतकरी आत्महत्या करतात?
A2: सरासरी 6 शेतकरी दररोज आत्महत्या करतात.
Q3: बाबासाहेब सरोदे यांनी आत्महत्येपूर्वी काय म्हटले?
A3: सरकार गोरगरिब शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही, म्हणून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी व्हिडिओत सांगितले.
Q4: सपकाळ यांनी शेतकऱ्यांना कोणते आवाहन केले?
A4: आत्महत्या न करता कुटुंबाचा विचार करा, असे त्यांनी आवाहन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.