Rahul Patil Joins Mahayuti: पुढचे पुढे बघू! राहुल पाटलांचे महायुतीत स्वागत; चंद्रदीप नरकेंसोबत पॅचअप?

Rahul Patil welcomed in Mahayuti: मी पाच वर्षे विरोधात होतो, म्हणून मी थांबत बसलो नाही. काँग्रेसमध्ये त्यांची काय अडचण झाली. हे आमदार सतेज पाटील यांनाच विचारावे. त्यांची काय कुचंबना झाली हे सतेज पाटील यांनाच अधिक माहीत.
Rahul Patil
Rahul PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: राहुल पाटील हे महायुतीत येत आहेत. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचे अधिकार आहेत. राहुल पाटील यांच्यामुळे महायुतीलाच ताकद मिळणार आहे. त्यांची अडचण आम्हाला काहीच नाही. पण महायुतीत येण्यापूर्वी त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत. भविष्यात होणाऱ्या राजकारणावर आत्ताच बोलायला नको. पुढचे पुढे बघू, त्यांना मी पारंपारिक विरोधक वाटतोय हा त्यांचा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत ते त्यांना समज देतील. त्यांनी महायुतीत चांगले काम करावे, अशा शब्दात आमदार चंद्रदीप नरके यांनी राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाला शुभेच्छा दिल्या आहेत.

महायुती म्हणून सर्व निवडणुकांना यापुढे सामोरे जाणार आहे.जिथं शक्य आहे, तिथे एकत्र जिथे शक्य नाही तिथं स्वतंत्र लढण्याचा विचार झाला आहे. स्थानिक परिस्थितीचा अहवाल आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना देऊ. कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जायचं याबाबत निर्णय होईल, मात्र राहुल पाटील यांचं अशा पद्धतीचे वक्तव्य म्हणजे महायुतीला बाधा आणण्याचा प्रयत्न आहे.

विरोधी आघाडीला पोषक वातावरण करून देण्यापेक्षा त्यांनी संयमाने घ्यावे, असा सल्ला आमदार नरके यांनी राहुल पाटील यांना दिला. प्रशासकीय पातळीवर कोणतीही कामे अडत नाहीत, जे नियमात आहेत ती कामे लवकर होतात. मी पाच वर्षे विरोधात होतो, म्हणून मी थांबत बसलो नाही. काँग्रेसमध्ये त्यांची काय अडचण झाली. हे आमदार सतेज पाटील यांनाच विचारावे. त्यांची काय कुचंबना झाली हे सतेज पाटील यांनाच अधिक माहीत. आगामी काळात सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत. आमच्या दृष्टिकोनातून या सर्व निवडणुका महायुती म्हणून लढण्याचे ध्येय आहे. जिथं तिथं महायुतीचा झेंडा लागावा यासाठी आमचा प्रयत्न आहे.

Rahul Patil
Parliament Security Breach: संसद भवनात घुसण्याचा प्रयत्न; एकाला अटक

सहकारात राजकीय हस्तक्षेप म्हणता येणार नाही. आपल्या कार्यकर्त्याला जिथे जिथे संधी देता येतील तर ती संधी उपलब्ध करून देण्याचा महायुतीच्या नेत्यांचा प्रयत्न असल्याचे आमदार नरके यांनी स्पष्ट केले. भोगावती सहकारी साखर कारखान्याला एनसीडीसी मधून कर्ज हवं होतं त्याला माझे संमती पत्र आहे. त्यावेळी मी विरोधक म्हणून विरोध केला नाही. माझ्या मतदारसंघातील सभासद त्यामध्ये आहे. तो कारखाना जिवंत राहिला पाहिजे ही माझी भूमिका आहे.

राहुल पाटील आता आमच्या महायुतीमध्ये आहेत, त्यांना निंदक कसे म्हणणार, माझ्या गुड बुक मध्ये येण्यासाठी त्यांनी महायुतीमध्ये चांगले काम करावे. आमच्या पक्षात निंदक होणे चुकीचा आहे त्यांनी महायुतीसाठी काहीतरी करावे आणि अशी वक्तव्य टाळावीत, असेही आमदार नरके म्हणाले.

तत्कालीन परिस्थिती वेगळी होती, त्यानुसार तो निर्णय झाला होता. आता महायुतीतील परिस्थिती वेगळी आहे.महायुती म्हणून गोकुळच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत त्यामध्ये महाडिक देखील असणार आहे, असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com