शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी थोड्याच वेळात EVM संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि वकील अभिषेक मनू सिंघवी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील पराभूत उमेदवार देखील उपस्थित राहणार.
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती.या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे. या हत्येच्या प्रकरणी तपास करताना पुणे पोलिसांना मोठं यश आलं असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.त्यांची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरु आहे.पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे अशी या ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.अद्याप हत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही.
बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, या मागणीसाठी मारकडवाडी येथेे ग्रामस्थांनी आंदोलन उभारले आहे. महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मारकडवाडीला भेट दिल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशााध्यक्ष नाना पटोले यांनी आज मारकडवाडीला भेट दिली. ग्रामस्थांशी चर्चा केली. "आपले मत कुणाले गेले हे समजण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, " असे सांगत नाना पटोले यांनी ईव्हीएमवर टीका केली. मारकडवाडीकरांनी या विरोधात उभा केलेल्या लढ्याला त्यांनी सॅल्यूट केला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी संवाद साधला. त्यानंतर आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, राम सातपुते यांची सभा झाली. सभेत सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांचा समाचार घेतला. निवडणुकीत विरोधात काम केले आणि आता भाजप नेत्याचे पाय धरत आहेत. ही डबल ढोलकी चालणार नाही. रणजितसिंह मोहिते पाटील थोडी जरी लाज शिल्लक असेल तरी राजीनामा द्या.
व्हाट्सअपवर गोष्टी टाकणं बंद करा. मी चांगल्या चांगल्यांना धडा शिकवला आहे. आमच्या कार्यकर्त्याला मारलं, जर आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या तर मी धमकी देणार नाही भर चौकात मारू," अशी धमकी राम सातपुते यांनी दिली.
मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी आशिष चेंबुरकर, सुनील प्रभू हे दाखल झाले आहेत. ठाकरे गटाचे इतर नेतेही या बैठकीसाठी मातोश्रीवर काही वेळेत येणार आहेत. आगामी महापालिका निवडणूक, हिवाळी अधिवेशन, तसेच बेस्टच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्या संदर्भातील रणनीती या बैठकीत ठरवली जाण्याची शक्यता आहे.
उद्योगपती गौतम अदानी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. सुमारे दीड तास ही बैठक सुरु चालली अशी माहिती आहे. अदानी-फडणवीस यांच्यातील बैठकीत विकास कामांवर चर्चा झाल्याचे समजते.
पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करुन खून केल्याची घटना ताजी असतानाच केज तालुक्यात अशाच प्रकार झाल्याची माहिती समोर येत आहे. मस्साजोग येथे सरपंचाचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, या घटनेमुळे केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.संतोष देशमुख असं सरपंचाचे नाव आहे. त्यांचा मृतदेह केज परिसरात आढळला आहे. समाजकार्यात सक्रीय असलेले संतोष देशमुख हे तालुक्यात अनेकांना परिचित होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मस्साजोग ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार मिळवून दिले आहे.
कुर्ल्यातील बस अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा बसमध्ये तब्बल 60 प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघातातील मयत व्यक्तींच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बुद्ध कॉलनी येथे काल (सोमवारी) रात्री अपघात झाल्याने पोलिसांनी कुर्ला स्टेशनजवळील बस स्टॉप तात्पुरत्या स्वरुपासाठी बंद केला आहे. यामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, माजी परराष्ट्र मंत्री, एसएम कृष्णा (वय 92) यांचे आज निधन झालं. बंगळुरू येथील निवासस्थानी आज पहाटे पावणेतीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते अनेक दिवसांपासून ते आजारी होते. ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. गेल्या वर्षी त्यांना पद्वविभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. काँग्रेसमधून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री हीच त्यांची ओळख आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू आणि प्रियांक खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘ईव्हीएम’वर नको बॅलेट पेपरवर मतदान घ्या, यासाठी लढा उभारणारे मारकडवाडी गाव सध्या देशभर चर्चेत आले आहे. शरद पवार यांच्या मारकडवाडी भेटीनंतर आता भाजपने आपल्या मोर्चा या गावाकडे वळवला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत सकाळी साडेदहा वाजता येथे सभा घेणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी मारकडवाडी ग्रामस्थांशी संवाद साधला होता. त्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या सभा येथे होत आहे. दुपारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही मारकडवाडी ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यभरातून महायुतीने 230 हून अधिक जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीचा दारून पराभव झाला. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आघाडीतील नेते सातत्याने ईव्हीएम बाबत शंका उपस्थित करत आहेत. ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी आता कोर्टात धाव घेणार आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाता आघाडीतील पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक दिल्लीत होत आहे. हे सर्व पराभूत उमेदवार शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. आज (मंगळवार) या उमेदवारांना घेऊन शरद पवार अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडे जाणार आहेत. त्यानंतर याचिका दाखल करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.