Jitendra Awhad : आव्हाडांनी पेललं मिटकरींचं आव्हान, 1 लाख बक्षीस देणार का?

Amol Mitkari Vs Jitendra Awhad : दोन दिवसांपूर्वी मिटकरींनी जितेंद्र आव्हाडांना आव्हान दिलं होतं. ते आव्हाडांनी स्वीकारलं आहे.
Amol Mitkari Jitendra Awhad
Amol Mitkari Jitendra Awhad sarkarnama
Published on
Updated on

केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिलं. यानंतर आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव आणि 'तुतारी वाजवणारा माणसू' हे चिन्ह शरद पवार गटाला दिलं होतं. "दिल्लीच्या तख्ताला भीती वाटणारा तुतारीचा आवाज असेल," असं विधान आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी केलं होतं, तर "आव्हाडांनी तुतारी फुंकून दाखवावी, 1 लाख बक्षीस देतो," असं आव्हान अजित पवार गटातील आमदार मिटकरींनी दिलं होतं. हे आव्हान आव्हाडांनी पेललं आहे. ( Jitedra Awhad Amol Mitkari Latest News )

Amol Mitkari Jitendra Awhad
SadaBhau Khot News : सदाभाऊ खोतांनी केली भाजपची गोची? धैर्यशील मानेंसमोरच केलं मोठं विधान

आव्हाड काय म्हणाले होते?

"शिवरायांना नमन करून तुतारी वाजवत, रायगडावरून सुरुवात करणार आहे. दिल्लीच्या तख्ताला भीती वाटणार तुतारीचा आवाज असेल," असं आव्हाडांनी म्हटलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर मिटकरी म्हणाले, "एक तुतारी द्या मज आणुनी फुंकी जी मी स्वप्राणाने... आमचं जितेंद्र आव्हाड यांना चॅलेंज आहे, त्यांनी तुतारी उचलून फुंकून दाखवावी. आपल्याकडून 1 लाखाचं बक्षीस घेऊन जावं. फक्त अट अशी आहे, आवाज तुतारीतून आला पाहिजे. तुतारीला कालपासून मार्केट आहे. पण, हरकत नाही. विषारी तुतारी वाजवायला माणूस आहे."

Amol Mitkari Jitendra Awhad
Maratha Reservation : जरांगे पाटलांचा थेट मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना इशारा; 'त्याला' आवर घाला अन्यथा...

अमोल मिटकरींचं आव्हान जितेंद्र आव्हाडांनी स्वीकारलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते रायगडावर 'तुतारी' चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. यानंतर जितेंद्र आव्हाडांनी तुतारी उचलून वाजवली आहे. जितेंद्र आव्हाडांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एकप्रकारे आव्हाडांनी मिटकरींचं आव्हान पेललं आहे. त्यामुळे अमोल मिटकरी जितेंद्र आव्हाडांना १ लाख रुपये बक्षीस देणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Amol Mitkari Jitendra Awhad
Sharad Pawar News: शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा जनता 'कडेलोट' करणार; तटकरेंवर टीकास्त्र

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते रायगडावर 'तुतारी' चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार राजेश टोपे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

R

Amol Mitkari Jitendra Awhad
Manoj Jarange Patil : राज्यभर रास्ता रोको, जरांगे पाटील 'सगेसोयरे'वर ठाम; भाजप नेत्यानं सुनावलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com