MSRTC 1500 New Buses: आषाढी एकादशीला एसटी महामंडळ 'मोठं गिफ्ट' देणार; 1500 नव्या 'लालपरी' महाराष्ट्रभर धावणार

MSRTC to Launch 1500 New 'Lalpari' Buses Across Maharashtra: आषाढी एकादशीबरोबरच गणपती उत्सव आणि दिवाळीमध्ये प्रवाशांना नव्या बसेसमधून प्रवास करण्याचा आनंद लुटता येणार आहे.
New Lalpari bus
New Lalpari busSarkarnama
Published on
Updated on

MSRTC Lalpari 2025: एसटीच्या ताफ्यात दाखल होत असलेल्या लालपरीला चांगली पसंती मिळत आहे. तब्बल चार वर्षांनी एसटीने नवीन 2640 लालपरी बसेस घेतल्या. त्यापैकी 31 विभागात मिळून तब्बल 1500 एसटीच्या ताफ्यात दाखल झालेले आहेत.

उर्वरित बसेस ऑगस्ट अखेरपर्यंत मिळतील असा अंदाज आहे अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आषाढी एकादशी बरोबरच गणपती उत्सव आणि दिवाळीमध्ये प्रवाशांना या नव्या बसेस मधून प्रवास करण्याचा आनंद लुटता येणार आहे.

एसटीने पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणामध्ये तयार बसेस पुरवठादार कंपनीकडून घेतलेल्या आहेत. एसटीने घेतलेल्या या तयार बसेसची बांधणी ही एसटीने यापूर्वी बांधलेल्या बसेस पेक्षा वेगळी आणि चांगली असल्याचे मत एसटीच्या (State Transport) अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. दोन बाय दोन, अशी ऐसपैस आसन क्षमता असलेल्या या बसेस लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी चांगल्या असल्यामुळे सर्व बसेस या लांब पडण्यासाठी वापरण्याचे निश्चित केले आहे.

प्रवाशांची पसंती

लांब पल्यावर मार्गस्थ (Roads) बिघाडाचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. राज्यातील 251 आगारांना प्रत्येकी 10 बसेस याप्रमाणे या नव्या बसेस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पुशबॅक आसने, चार्जिंगची सोय, रिडींग लॅप, फोल्डींगचे दरवाजे, न वाजणाऱ्या खिडक्या असं अत्याधुनिक सोयीने नटलेली एसटीची नवी लाल परी प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. तब्बल 92% भारमानासह लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या नव्या लालपरीचे मार्गस्थ बिघाडाचे प्रमाण जवळपास शून्य आहे.

New Lalpari bus
BJP Shiv Sena clash : महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर; मंत्री महाजनांनी वादाला फोडलं तोंड, भाजपसाठी काळ वाईट...

परिवहन मंत्र्यांचं 'लालपरी'साठी आवाहन

खाजगी बसचालकांची स्पर्धा करायची असेल तर आम्हालाही त्यादृष्टीने सेवा द्यावी लागेल. आपला प्रवासीवर्ग दुसरीकडे वळू नये यासाठी आम्हाला इतरांप्रमाणे स्पर्धेत उतरावे लागेल. प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त अशी लालपरी आहे. प्रवाशांनी जास्तीत जास्त पसंती लालपरीला द्यावी, असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं.

New Lalpari bus
Justice Yashwant Verma : रोकड प्रकरणात न्यायाधीश वर्मांसमोर दोनच पर्याय; राजीनामा की, महाभियोग!

बसेसचे वितरित

पुणे- 60, ठाणे- 55, रत्नागिरी- 50, बुलढाणा- 45, धाराशिव- 40, गडचिरोली- 65, पालघर- 35, जळगाव- 60, सोलापूर- 60, अहिल्यानगर- 75, सातारा- 65, छत्रपती संभाजीनगर- 35, मुंबई- 35, बारामती- 25, अकोला- 35, नागपूर- 45, नाशिक- 85, सिंधुदुर्ग- 35, सांगली- 55, यवतमाळ- 55, बीड- 54, अमरावती- 35, हिंगोली- 10, नांदेड- 68, परभणी- 62, गोंदिया- 10, कोल्हापूर- 65, चंद्रपूर- 15, जालना- 58, लातूर- 20, रायगड- 30, भंडारा- 10, धुळे- 25, वर्धा- 25.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com