MSRTC Diwali Ticket Price Hike: अतिवृष्टीच्या फटक्यात एसटी महामंडळाचा 20 दिवसांसाठी मोठा निर्णय; एक हजार 100 कोटी रुपयांच्या महसूलाचं 'टार्गेट'

ST Corporation Announces 10% Temporary Fare Hike for 20 Days During Diwali : एसटी महामंडळाने दिवाळीच्या तोंडावर हंगामी भाडेवाढीचा निर्णय घेतला असून, त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
MSRTC Sets ₹1,100 Crore Revenue Target; 20-Day Decision Amid Rain
MSRTC Sets ₹1,100 Crore Revenue Target; 20-Day Decision Amid RainSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra ST bus temporary fare increase : राज्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पुराचा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याला खूप मोठा फटका बसला आहे. शेतकरी अन् सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहेत. दिवाळी तोंडावर आहे. शेतकरी म्हणतोय, आमच्यावर चिखल खालण्याची वेळ आली आहे.

या पूरस्थितीचा एसटी महामंडळाला देखील बसला आहे. उत्पन्नात घट झाली आहे. ही भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने दिवाळीत हंगामी भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीमुळे महागाईचे संकेत असतानाच, एसटी महामंडळाच्या हंगामी भाडेवाढ सर्वसामान्यांच्या खिशावर ताण टाकणारी आहे.

दिवाळीच्या तोंडावर हा निर्णय घेताना एसटी महामंडळाने दहा टक्के हंगामी भाडेवाढीवर शिक्कामोर्तब केली आहे. ही भाडेवाढ दिवाळीपुरतीच असणार आहे. ही भाडेवाढ 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर, अशी वीस दिवसांसाठी असेल.

या भाडेवाढीमुळे महामंडळाच्या तिजोरीत सुमारे एक हजार ते एक हजार 100 कोटी रुपयांचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे. या भाडेवाढीमुळे राज्यातील (Maharashtra) नागरिकांचा एसटीचा लांबपल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार आहे.

दिवाळीच्या (Diwali) सुट्ट्यांमध्ये अनेक कुटुंबे नातेवाइकांकडे बाहेरगावी जातात, पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे बेत आखतात. दिवाळीला जोडून आलेल्या सुट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांची घोषणा करते. दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्नवाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करते.

MSRTC Sets ₹1,100 Crore Revenue Target; 20-Day Decision Amid Rain
Eknath Shinde Dussehra Rally : एकनाथ शिंदेंना 'आझाद' साथ देईना; लाखभर खुर्च्यांची ऑर्डर रद्द, चिखलावर अंथरलेलं कार्पेट खराब, पाण्यासाठी पंप लावले, शेवटी वेगळा पर्याय...

गर्दीच्या हंगामात राज्य परिवहन प्राधिकरणाने 30 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यास एसटी महामंडळाला मान्यता दिली आहे. गर्दीच्या हंगामात तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ केली जाते. यंदा देखील 10 टक्के हंगामी भाडेवाढ केली जाणार आहे. साध्या, विठाई, शिवशाही, निमआराम बसकरिता ही भाडेवाढ लागू असणार आहे. मुंबई (Mumbai)-पुणे मार्गावर शिवनेरीकरिता भाडेवाढ लागू असणार नाही.

MSRTC Sets ₹1,100 Crore Revenue Target; 20-Day Decision Amid Rain
Bhaskar Jadhav : दापोलीचं कृषी विद्यापीठ भास्कर जाधवांच्या रडारवर; अधिवेशन गाजवण्यासाठी पहिला मुद्दा मिळाला

गाड्याच्या प्रकारानुसार दर...

गाडीच्या प्रकार, सध्याचे दर अन् दिवाळी काळात तिकिटाचे दर कंसात दिले आहेत. साधी (मिडी, साधी) 10.05 (11.05), जलद (10.5) 11.05, निमआराम 13.65 (15), साधी शयनआसनी 13.65 (15), साधी शयनयान 14.75 (16.25), एसी शिवशाही (आसनी) 14.20 (15.65), एसी जनशिवनेरी (आसनी) 14.90 (16.40).

मार्गानुसार दरात असे बदल...

मार्गानुसार तिकीट अंदाजित दर असून, मार्ग, सध्याचे तिकीट आणि कंसात दिवाळीतील असणारे तिकीट खाली देत आहेत. परळ-कोल्हापूर (साधी) 640 (700), मुंबई-मालवण (शिवशाही) 1 हजार 300 (1 हजार 400), मुंबई-जळगाव (स्लीपर) 1 हजार 100 (1 हजार 250), मुंबई-छत्रपती संभाजीनगर (साधी) 800 (900), मुंबई-सोलापूर (साधी) 750 (850), मुंबई-जालना (साधी) 800 (900) मुंबई-लातूर (साधी) 900(1000), मुंबई-सांगली (साधी) 730(800), मुंबई-रत्नागिरी (साधी) 600 (700).

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com