
दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचारी भरती प्रक्रियेवरून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भरती प्रक्रियेवर थेट आक्षेप घेतला आहे.
आगामी आशिवेशनात हा विषय मांडण्याची शक्यता असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
Ratnagiri News : तळकोकणातील दापोली कोकण कृषी विद्यापीठाची नोकर भरती वादाच्या भोवऱ्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया ही पारदर्शक नसून यात आर्थिक व्यवहार झाला असल्याचा संशय आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी थेट विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवले आहे. तसेच या भरती प्रक्रियेला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी केलीय. मात्र या पत्रासह मागणीला केराची टोपली दाखवत विद्यापीठ प्रशासनाने माळी, पहारेकरी अशा पदांचे नियुक्तीपत्र उमेदवारांना दिले आहे. यामुळे हा मुद्दा आता आणखी चिघळण्याची शक्यता असून ही भरती प्रक्रियाचा मुद्दा आगामी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.
दापोली कोकण कृषी विद्यापीठाने विविध पदांसाठीची कर्मचारी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ज्यात विविध पदांसह माळी, पहारेकरी अशा पदांच्या जागा आहेत. दरम्यान या भरती प्रक्रियेच माळी, पहारेकरी पदाच्या नियुक्त्या देण्यात आल्या आहे. ज्याला प्रकल्पग्रस्तांचा अक्षेप असून ज्या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत, त्या मर्जीतील लोकांना दिल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांचा आहे. तसेच त्यांनी या भरती प्रक्रियेत गुणांची पेन्सिलने खाडाखोड केल्याचेही म्हटलं आहे.
प्रकल्पग्रस्तांनी याबाबत, उमेदवार निवड करताना गुणांची पेन्सिलने खाडाखोड करून घोळ घालण्यात आला आहे. जे गूण पेन्सिलने लिहले ते गुणपत्रिकेत आलेच नाहीत असा दावा प्रकल्पग्रस्तांचा आहे. तसेच ज्या उमेदवारांनी अचूक उत्तरे दिली, कामाची कुशलता दाखवली त्यांनाच डावलण्यात आले. ज्यांना कामाचा अनुभव आहे त्यांना प्राधान्य न देता ज्यांचा अनुभव नाही अशांना नियुक्त्या दिल्याचा दावा देखील प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
याचमुद्द्यावरून भास्कर जाधव यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात भूमिका घेत पत्रव्यवहार केला आहे. त्यात त्यांनी भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा करताना आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवत ही भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र प्रशासनाने काही नियुक्त्या दिल्या आहेत. यावरून आता हा मुद्दा तापण्याची शक्यता असून तो आगामी अधिवेशनात पटलावर येण्याची शक्यता आहे. यामुळे आता ज्या अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेत गुणांची खाडाखोड केलीय अशा अधिकाऱ्यांचे आता धाबे दणाणले आहेत.
दरम्यान या भरती प्रक्रियेवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी गंभीर आरोप केले होते. त्यांनी, या भरती प्रक्रियेचा सारा खेळ एका राजकीय पुढाऱ्याच्या घरी, विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या संघनमताने होत आरोप केला होता. ज्याला प्रकल्पग्रस्तांनी दुजोरा दिला असून याची माहिती देखील कुलगुरू डॉ. संजय भावे यांना देण्यात आली आहे. त्यामुळे आता दापोली परिसरात तो राजकीय पुढारी कोण? अशा चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत.
प्र.१: दापोली कृषी विद्यापीठात कोणत्या भरतीवरून वाद निर्माण झाला आहे?
उ: कर्मचारी भरती प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला आहे.
प्र.२: कोणत्या आमदारांनी या भरतीवर आक्षेप घेतला?
उ: उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला.
प्र.३: भास्कर जाधव यांचा आरोप काय आहे?
उ: त्यांनी भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि अन्यायावर प्रश्न उपस्थित केला आहे.
प्र.४: हा मुद्दा कुठे मांडला जाण्याची शक्यता आहे?
उ: आगामी आशिवेशनात हा मुद्दा मांडला जाऊ शकतो.
प्र.५: या वादामुळे काय परिणाम होऊ शकतो?
उ: राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, भरती प्रक्रिया थांबवली जाऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.