Leopard pet status controversy : बिबट्याला पाळीव प्राणी दर्जा देण्याची अजब मागणी; विजय वडेट्टीवारांनी 'पंजा'च मारला! रवी राणांना घरी चार-पाच बिबटे पाळण्यासाठी द्या!

Vijay Wadettiwar Criticises Ravi Rana Demand to Give Leopards Domestic Animal Status : आमदार रवी राणा यांनी बिबट्यांच्या अजब मागणीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
Ravi Rana Vs Vijay Wadettiwar
Ravi Rana Vs Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Ravi Rana Vs Vijay Wadettiwar : राज्यातील विविध भागात बिबट्यांनी उच्छाद घातला आहे. वनविभागाने बिबट्यांना पकडण्यासाठी राज्यातील शेकडो भागात पिंजरे लावले आहेत. काही बिबटे अडकले आहेत, तर काही पिंजऱ्याजवळ येऊन मागे फिरत आहेत.

बिबट्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला असून, ही समस्या केंद्रापर्यंत पोहोचली आहे. यातच अमरावतीमधील आमदार रवी राणा यांनी बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा देण्याची अजब मागणी केली. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपचे (BJP) समर्थक आमदार रवी राणा यांनी बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या, अशी अजब मागणी केली. रवी राणा यांनी ही मागणी थेट वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केल्याने यावर आता टीका होऊ लागली आहे.

रवी राणा म्हणाले, "विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्येही बिबट्याचाच विषय प्रामुख्याने चर्चे आहे. अमरावती असो, नागपूर (Nagpur) असो, मुंबई असो शहरी भागात ज्याप्रमाणे बिबटे येत आहेत, ते पाहता आता बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा दिला पाहिजे. यासंदर्भात मी स्वत: वनमंत्री गणेश नाईक यांनी भेट घेतली आहे." बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा, अशी मागणी केली आहे.

Ravi Rana Vs Vijay Wadettiwar
Bribery Case Maharashtra : दोन महिन्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडून कौतुक अन् तिथलाच पोलिस निरीक्षक लाचेत अटकेत...

'बाबा आमटे यांनी त्यांच्याकडील वनांमध्ये बिबटे पाळले, अनेक ठिकाणी खासगी वनांमध्ये बिबट्यांचं पालन पोषण सुरू आहे. वनताराच्या माध्यमातून अनेक वन्यप्राण्यांना संरक्षण दिलं जात आहे. अनेकांच्या घरात खतरनाक जातीचे कुत्रे पाळले जात आहेत. त्याचप्रमाणे बिबट्यांचं लहानपणापासून पालन केलं, तर बिबटेसुद्धा सुरक्षित राहतील आणि माणसंसुद्धा सुरक्षित राहतील आणि मोठ्या प्रमाणावर नसबंदी करावयाची आवश्यकता भासणार नाही,' असा सल्ला आपण वनमंत्री गणेश नाईक यांना दिल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले.

Ravi Rana Vs Vijay Wadettiwar
Krishi Vidyapeeth recruitment : खुशखबर! लागा तयारीला, 11 हजार 350 पदे भरणार

आमदार रवी राणा यांच्या या अजब सल्ल्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, "आमदार रवी राणा यांनी बिबट्याला पाळण्याची परवानगी द्यावी, अशा त्यांच्या मागणीनुसार, सर्वप्रथम राणांच्या घरी चार-पाच बिबटे पाळण्यासाठी द्यायला हवेत." त्यांच्या अनुभवावरून सत्ताधारी पक्षातील प्रत्येक आमदाराला दोन बिबट्या दत्तक देता येतील, असाही खोचक टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com