teacher recruitment : राज्यातील आठ हजार शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर! चौकशीचे आदेश; पगार थांबणार, मोठा घोटाळा उघड होणार?

Political News : या शिक्षकांच्या मान्यतेसह संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
Teacher
Teacher Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरतीसाठी 22 जून 2017 पासून पवित्र पोर्टल सुरु करण्यात आले होते. या संगणकीय प्रणालीमार्फत शिक्षकांची पदभरती आवश्यक होती. मात्र, सात ते आठ हजार पदांची भरती पवित्र पोर्टलशिवाय झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता विभागीय उपसंचालकांच्या माध्यमातून या सर्वांची पडताळणी होणार आहे. या शिक्षकांच्या मान्यतेसह संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलशिवाय भारती झालेल्या या आठ हजार शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर आले असून त्यांची पगार थांबण्याची शक्यता आहे.

शिक्षक भरतीसाठी 22 जून 2017 पासून पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. मात्र, पोर्टल काही दिवस अकार्यान्वित असतानाही राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये सुमारे आठ हजार शिक्षकांची भरती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या शिक्षकांच्या मान्यतेसह संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत पडताळणी करण्याचा मोठा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

Teacher
Teacher's Recruitment: शिक्षक भरतीसाठी 'हे' नियम पाळावेच लागतील! खासगी, सरकारी संस्थासाठी राज्य सरकारचा नवा अध्यादेश

राज्यभरात सात ते आठ हजार पदांची भरती पवित्र पोर्टलशिवाय झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नागपूरमध्ये 650, नाशिकमध्ये 800 तर अन्य जिल्ह्यांमध्ये देखील शेकडो शिक्षकांच्या (Teacher) शालार्थ आयडीचा घोळ समोर आला आहे. त्यानंतर राज्यातील 17 हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील तीन लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी केली जात असून यासाठी राज्य सरकारकडून चौकशीसाठी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘एसआयटी’ नेमली आहे.

Teacher
Teacher Verification : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ! 3 लाख कर्मचाऱ्यांची कुंडली तपासणार; SIT ॲक्शन मोडमध्ये!

उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीला या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. समितीच्या माध्यमातून प्रत्येक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता, संस्थेचा रुजू रिपोर्ट, शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश, शालार्थ आयडी अशा कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.

Teacher
TET Exam News: TET परीक्षेतून मिळणार दिलासा! नोकरीवरील टांगती तलवार दूर होणार; कुणाला मिळणार सूट

त्यासोबतच 22 जून 2017 पासून पवित्र पोर्टलशिवाय भरती झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी विभागीय उपसंचालक व दोन शिक्षणाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची समिती नेमली जाणार आहे. 15 मे 2026 पर्यंत समितीने त्यांचा अहवाल शासनाला सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे.

Teacher
Chandrakant Patil News: प्राध्यापक भरती कधी होणार? चंद्रकांतदादांनी सांगितली तारीख

पवित्र पोर्टलशिवाय खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरती करण्यात आली आहे. राज्यात सात ते आठ हजार पदांची भरती पवित्र पोर्टलशिवाय झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांची आता विभागीय उपसंचालकांच्या माध्यमातून या सर्वांची पडताळणी होईल, असे माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. श्रीराम पानझडे यांनी सांगितले.

Teacher
Chandrakant Patil News: प्राध्यापक भरती कधी होणार? चंद्रकांतदादांनी सांगितली तारीख

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com